अहिराणी भाषेतील म्हणी
अहिराणी हि बोली भाषा असून त्यातील बोलीचे वैशिष्ट्ये लक्षात घेतले तर त्या भाषेतील आपलेपणा लक्षात येईल. मराठीत जशा विविध म्हणी असतात तशाच अहिराणी भाषेतील म्हणी देखील असतात. म्हणी म्हणजे मानवी जीवनातील अनुभव सत्य असते. त्यात काहीतरी अनुभव सत्य सांगितलेले असते. म्हणी ह्या देखील भाषेला समृध्द करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. आपल्या ला ओळख करून देण्यासाठी अहिराणी भाषेतील काही म्हणी येथे संग्रहित केल्या आहेत.
खानदेशी (अहिराणी) ही खानदेश प्रदेशातील बोलली जाणारी भाषा आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचा काही भाग आणि नाशिक जिल्ह्याच्या कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांत ती बोलली जाते. या भूप्रदेशातील लोक अहिराणी बोलत असले, तरीही वाचन आणि लेखन यांसाठी प्रमाण मराठीचा वापरण्याचा कल आढळतो. खानदेशीचे दोन बोलीभाषा आहे — अहिराणी आणि डांगरी.
जुन्या खानदेश परीसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत[१]. खानदेश परिसरातील अहिरांच्या वास्तव्यामुळे, सत्तेतील त्यांच्या प्राबल्यामुळे, त्या परिसरातील सर्वांच्या बोलीवर अहिराणी बोलीची छाप पडली. यातून खानदेशाचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद झाले आहेत. प्रदेशानुसार बागलाणी, नंदुरबारी, खाल्यांगी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात. खानदेशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापाटिदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी, असे असल्याने खानदेशी ही संकल्पना अहिराणी ह्या संकल्पनेहून विशाल आहे.
अहिराणी म्हणी खील पीडीएफ मध्ये पहा :
टिप्पण्या