मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

दिनविशेष

 दिनविशेष :

                    जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:

उदाहरणार्थ :-

  • जागतिक किडनी दिवस : मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार
  • जागतिक हास्यदिन : मे महिन्यातला पहिला रविवार
  • आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा) : जूनमधला तिसरा रविवार
  • जागतिक पालक दिवस : जुलै महिन्यातील शेवटचा रविवार
  • अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
  • सप्टेंबर अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार??????????
  • पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार
  • जागतिक तत्त्वज्ञान दिन : नोव्हेंबरमधील तिसरा गुरुवार
  • जागतिक युवा दिन : बारा जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती
  • जागतिक औद्योगिक सुरक्षादिन : चार मार्च
  • जागतिक महिला दिन : आठ मार्च

              खालील पीडीएफ मध्ये संपूर्ण वर्षाचे दिनविशेष दिले आहे. हे दिनविशेष शालेय कामात व शैक्षणिक परीक्षेसाठी महत्वाचे ठरू शकते. 


आभार !

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा