मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

शहाणपण म्हणजे काय ?

 शहाणपण : 


                मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करणे सामान्यपणे केला जात नाही. सर्व समस्यांना व सर्व दुःखांना जे मूळ कारण असते ते न शोधता अन्य फालतू कारणांचा शोध घेत राहणे म्हणजे प्रत्यक्षात 'साप साप' म्हणून भुई धोपटण्यासारखेच आहे. असे करण्याने समस्या सुटत तर नाहीतच उलट त्या अधिकच चिघळत जातात. जीवन विद्येच्या दृष्टिकोनातून शहाणपणाचा अभाव हे सर्व समस्यांचे व दुःखांचे मूळ कारण आहे. शहाणपण हे अमृत जीवनाला अत्यंत आवश्यक असून सुद्धा ते मिळण्याची व्यवस्था कुठेही केलेली दिसत नाही ही मोठी खेदाची गोष्ट होय. पोरांना व थोरांना जे शिक्षण व शिकवण दिली जाते त्यात शहाणपण देण्याची व्यवस्था नसते. अनुभवातून शहाणपण मिळते ते शहाणपण मिळवण्यासाठी माणसाला उभे आयुष्य घालवावे लागते. इतके करून सुद्धा मिळविलेले ते शहाणपण इतरांना उपयोगी पडत नाही. कारण; ते इतर लोक सुद्धा अनुभवातून शहाणपण मिळण्याची वाट पाहत असतात; म्हणून शहाणपण नेमके कशात आहे? व ते मिळवण्याचा मार्ग काय? हे समजणे आवश्यक आहे

* माणसाच्या सर्व दुःखाला प्रमुख कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव हे होय.
* दुसऱ्यांच्या अनुभवाने शिकतात ते खरे शहाणे, स्वतःच्या अनुभवाने शिकतात ते दीड शहाणे, व कोणाच्या अनुभवाने न शिकणारे ते पेंडगावचे शहाणे.
* शहाणपणाचा दुष्काळ हेच दुनियेत दुःखाचा सुकाळ होण्याचे एकमेव कारण होय.
* समाजाची सुरेख धारणा करण्याचे अतुल सामर्थ्य फक्त एकाच गोष्टीत आहे व ते म्हणजे 'शहाणपण'. म्हणून शहाणपणाचा अभाव हाच अधर्म असून शहाणपणाचा प्रभाव हा खरा धर्म होय.
*Fools worship blind faith while wise worship wisdom.
* शहाणपण हे एकच गोष्ट असे आहे की ज्याने समाजाची सुरेख धारणा होऊ शकते. म्हणून शहाणपण हाच खरा धर्म होय. स्वतः सुखाने जगून इतरांना सुखाने जगू देण्यात खरे शहाणपण आहे.
* स्वतःचा अहंकार ऐकण्यात व दुसऱ्यांचा अहंकार जपण्यात खरे शहाणपण आहे.
* शहाणपण ही एकच गोष्ट अशी आहे की जे मानवी जीवनात सर्व समस्या सहज सोडवण्यास समर्थ ठरते.
* खरे शहाणपण शुभ नियती निर्माण करण्यात आहे, आणि शुभचिंतन व ईश्वर चिंतन करून शुभनियती निर्माण करता येते.
* तोडणे आहे सोपे तर जोडणे आहे कठीण, कारण तोडायला अक्कल लागत नाही पण जोडायला मात्र शहाणपण लागते.
* शहाणपण शिकविण्यास शहाणपणा लागते हे खरेच पण शहाणपण मिळविण्यात खरे शहाणपण असते हे त्याहूनही खरे.
*Wisdom is heaven, Wisdom is paradise, Wisdom is God,  Wisdom is kingdom of happiness.
* जे शहाणपण माणसाला त्यांच्या तारुण्यात मिळणे आवश्यक असते ते शहाणपण त्याला त्याच्या वृद्धावस्थेत अगदी शेवटी शेवटी सुचते हीच मानवजातीची खरी शोकांतिका आहे.
* शहाणपण हाच नारायण व तोच आहे सत्यनारायण.
* शहाणपण विश्व धर्माचे स्वरूप असून समाजाची सुरेख धारणा करून त्याला शांती सुख देण्याचे सामर्थ्य या "शहाणपणात" आहे. म्हणून धर्म या कल्पनेतून शहाणपण वजा केले तर धर्म म्हणून काही शिल्लकच राहत नाही. व जे उरते ते केवळ कर्मकांड होय.

                                                                               -श्री वामनराव पै.

          वरील लेखाचे अवलोकन करून ते आपल्या आचरणात आणावे हाच या लेखाचा मुल उद्देश आहे. आपली मतमतांतरे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. व पुढील अश्याच पोस्ट, शैक्षणिक व इतर अपडेट मिळविण्यासाठी ब्लॉगला फॉलो करा. व आवडल्यास इतरांनाही शेअर करा.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा