मैत्रीण
मैत्रीण
एक तरी मैत्रीण असावीचारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी....!
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा.....!
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर...!
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचा सुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा.....!
एक तरी मैत्रीण असावी
चांदणी सारखी
मैत्रीच्या आकाशात मैत्रीचे दिवे
मावळले म्हणजे...
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात.....!
प्रत्येक कॉलेजबाहेर असतो एक कट्टा
सुट्टी लागताच कोलेजला पडतो बिचारा एकटा
वावरत असते तरुणा
होऊन तिथे दंग
अनेक रंग मिसळुन मिळतो
कट्ट्याला त्याचा रंग....!
चहा दोघात मारायचा असतो
सिग्रेट चौघातून फुंकायची असते
अभ्यासाच्या विषयाला मात्र
इथे नेहेमीच बंदी असते.....!
सिगरेटचा ब्रॅन्ड असतो
प्रत्येकाचा आपला आपला
हिरवळीचा विषय मात्र
सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा....!
प्रोफेसर चा उल्लेख
तो ने करायचा इथे असतो नियम
कित्येक पिढ्या आल्या गेल्या
कट्टा मात्र कायम.....!
वेगळी भाषा असते इथली
वेगळे असतात कायदे
सिनीअर्स बरोबर चकाट्या
मारायचे असतात येथे फायदे....!
नापास हौउन यायला इथे
नसते कधी बंदी
दर वर्षी येतात इथे
नवे नवे पंछी....!
निवांत बसावे इथे मित्रांशी बोलत
विश्वस्त इथे फुलपाखरे मोजत
नसतो कट्टा साधासुधा असते एक कॉलेज
कट्या शिवाय कॉलेज आम्ही मानत नाही कॉलेज....!
माझे अश्रु पुसून तिनं
आमच्या सुखात हसावं
कधीतरी वाटतं यार
आपलंही कुणीतरी असावं.....!
टिप्पण्या