लिप वर्ष व अधिकमास
*लिप वर्ष व आधिकमास का गणले जातात ?
*सुर्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पुर्ण करण्यास 365.256363004 एवढे दिवस म्हणजेच 365 दिवस, 5 तास 48 मिनिटे आणि साडे 47 सेकंद लागतात*. त्यातील आपण वर्ष म्हणून 365 दिवसच घेतो. आता शिल्लक राहतात 5 तास 48 दिवस आणी साडे 47 सेकंद
हा शिल्लक वेळ भरून काढनेसाठी दर चार वर्षांनी एक दिवस जादा घेतला जातो . तो दिवस भरून काढणे साठी वर्षात 366 दिवस घेतले जातात. त्यालाच आपण *लिप वर्ष* असे म्हणतो. तो दिवस म्हणजे 29 फेब्रुवारी .
एक दिवस म्हणजे 24 तास परंतू शिल्लक 5 तास 48 दिवस आणी साडे 47 सेकंद या वेळातून 4 वर्षात 23 तास 15 मीनीट व 10 सेकंदच पुर्ण होतात म्हणजेच 45 मिनीट 50 सेकंद जादा वेळ गणली गेली .
100 वर्षात 25 लिप वर्ष होतात. *या पैकी 24 लिप वर्षात साधारणत: 18 जादा तास गणले जातात ते कमी करण्यासाठी शतकीय वर्ष हे लिप वर्ष गणले जात नाही*
पुन्हा असा घोळ येतो की 18 तासासाठी एक दिवस कमी केला म्हणजेच सधारणत: 24 - 18 = 6 तास कमी पडले . मग ते भरून काढणे साठी 400 वे शतकीय वर्ष हे लिप वर्ष गणले जाते म्हणजे 4 * 6 =24 चा एक दिवस भरून निघतो .
1 ) ज्या वर्षाला 4 ने भाग जाईल ते वर्ष लिप वर्ष म्हणून गणले जाईल
जसे की 1904 , 1908 , 1920.......
2 ) परंतु ज्या वर्षाला 100 ने भाग जाईल त्याला लिप वर्ष ग्रहित धरू नये. त्यालाच आपण शतकीय वर्ष म्हणतो.
जसे की 1100 , 1300 , 1400 , 1500.......
3 ) परंतु जर एखाद्या वर्षाला 4 आणी 100 म्हणजेच 400 ने भाग जात असेल तर त्याला मात्र लिप वर्ष ग्रहित धरावे. जसे की 1200 , 1400 , 2000 , 2400 .....
जर लिप वर्ष मानले नसते तर वर्षातला एक दिवस शिल्लक राहीला असता व तो दिवस जादा जादा होत. काही वर्षांनी संपुर्ण ऋतुचक्रच बिघडले असते व डिसेंबरला उन्हाळा आला असता.
*जसे हे ग्रेगेरिअन म्हणजेच इंग्रजी महीन्यांसाठी आहे तसेच मराठी महीन्यासाठी देखिल आहे*
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.
महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. तर उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
शकसंख्येतून १६६६ वजा करून येणाऱ्या उत्तराला १९ने भागावे. बाकी ३ उरल्यास चैत्र, ११ उरल्यास वैशाख, १० उरल्यास ज्येष्ठ, ८ उरल्यास आषाढ, १६ उरल्यास श्रावण, १३ किंवा ५ उरल्यास भाद्रपद आणि २ उरल्यास आश्विन महिना हा अधिकमास असतो, असे मकरंद ग्रंथात सांगितले आहे. *मार्गशिर्ष , पौष आणी माघ* महीण्यात अधिकमास येत नाही.
अधिकमास हा फक्त चंद्राधारीत पंचांग वापरणार्या राज्यातच पाळला जातो. परंतू आसाम , ओरीसा , केरळ , तामिळनाडू या राज्यात सुर्याधारीत पंचांग वापरले जाते त्यामुळे या राज्यात अधीक मास पाळला जात नाही.
टिप्पण्या