चालु घडामोडी
चालु घडामोडी.
🌼 भारतातही करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारं ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगी
🎓 करोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
🎓 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. करोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे.
🎓 डेक्सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे. या औषधामुळे मृत्यू दर कमी होत आहे. करोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. महत्वाचं म्हणजे हे औषध स्वस्तात उपब्ध होतं.
🌼अटल पेन्शन योजनेला ५ वर्षे पूर्ण
» ९ मे २०२० रोजी अटल पेन्शन योजनेला ५ वर्षे पूर्ण झाली.
» ९ मे २०१५ रोजी या योजनेची सुरुवात झाली होती.
» या योजनेंतर्गत आत्तापर्यंत एकूण २,२३,५४,०२८ एवढी नोंदणी झाली.
» १८-४० वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो.
» सहभागी नागरिकाला वयाच्या ६० वर्षानंतर १००० ते ५००० रुपये किमान पेन्शन देण्यात येते.
» तसेच पेन्शन धरकाचे निधन झाल्यास त्याच्या पती/पत्नीस आजीवन पेन्शन देण्यात येते.
» २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकत्ता येथून ही योजना सुरु केली.
🍀🍀भारत-चीन संघर्षात अमेरिका घेणार उडी?; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांची मोठी घोषणा🍀🍀
📌आशिया खंडातील चीनची वाढती दादागिरी पाहून अमेरिकेनंही आता कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युरोपमधून आपलं सैन्य काढून आशिया खंडात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं जर्मनीमधून आपलं सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
📌जर्मनीमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या ९ हजार ५०० सैनिक अमेरिका आशिया खंडात तैनात करणार आहे. सध्या भारत चीन सीमेवर तणाव आहे आणि अशा परिस्थितीत अमेरिकेकडून हे पाऊल उचललं जात आहे. दुसरीकडे व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स आणि दक्षिण चीन महासागरातही चीनकडून धोका आहे.
📌भारत आणि आग्नेय आशियासाठी चीन धोका बनला असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं. "भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारख्या आशियाई देशांना चीनकडून धोका आहे. या धोक्याकडे पाहता अमेरिका जगभरात आपल्या सैन्याच्या तैनातीचा आढावा घेत आहे आणि त्यांना अशा प्रकारे तैनात करत आहे की गरज पडल्यास ते पीपल्स लिबरेशन आर्मीचा सामनाही करू शकतील," असं पॉम्पिओ यावेळी म्हणाले. जर्मन मार्शल फंडच्या ब्रुसेल्स फोरम २०२० मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
🔴चीनच्या लष्कराचा सामना करणार
"आम्ही अशा प्रकारे सैन्य तैनात करू की पीएलएचा आम्हाला सामना करता येईल. हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे आणि आम्ही त्यास सामोरे जाण्यासाठी सर्व संसाधनं उपलब्ध असल्याचं सुनिश्चित करू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार सैन्याच्या तैनातीचा आढावा घेण्यात येत असून या योजनेंतर्गत अमेरिका जर्मनीमधील जवानांची संख्या ५२ हजार वरून २५ हजारांवर आणणार आहे," असंही पॉप्मिओ यांनी स्पष्ट केलं.
🍀🍀सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग दिन: 27 जून🍀🍀
📌दरवर्षी 27 जून या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) दिन’ साजरा केला जातो.
📌कोविड-19 महामारीमुळे कमकुवत झालेल्या MSME उद्योग क्षेत्राला बळकटी आणण्याच्या उद्देशाने उद्भवलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 2020 साली “फर्स्ट रिसपॉन्डर्स फॉर सोशिएटल नीड्स” या विषयाखाली एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये जगभरातल्या MSME उद्योगांचा सहभाग होता.
काही तथ्ये
📌आंतरराष्ट्रीय लघू व्यवसाय परिषद (ICSB) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण उद्योगांपैकी औपचारिक आणि अनौपचारिक MSME उद्योगांचे एकूण प्रमाण ही 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, ज्यामधून जवळपास 70 टक्के रोजगार उपलब्ध होतो आणि जागतिक GDPच्या 50 टक्के या क्षेत्राचा वाटा आहे.
📌वाढत्या लोकसंख्येला काम देण्यासाठी 2030 सालापर्यंत 600 दशलक्ष रोजगारांची आवश्यकता असणार आहे; ज्यामुळे MSME क्षेत्राचा विकास करणे हे बर्याच सरकारांची उच्च प्राथमिकता ठरीत आहे.
📌उदयोन्मुख बाजारपेठेत, बहुतेक औपचारिक रोजगार लघू आणि मध्यम उद्योगांद्वारे निर्माण केले जातात, जे 10 पैकी 7 रोजगार निर्माण करतात.
📌लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये वार्षिक गुंतवणूकीची वाढ 1 लक्ष कोटी डॉलर एवढी झाल्यास शाश्वत विकास लक्ष्यांकडे प्रगती होण्याच्या दृष्टीने अयोग्य लाभांश मिळणार.
🍀🍀“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” यात भारत सहभागी🍀🍀
📌“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी (Global Partnership on Artificial Intelligence अर्थात GPAI किंवा Gee-Pay)” याची स्थापना करण्यासाठी भारत सरकार अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मेक्सिको, न्यूझीलंड, कोरिया, सिंगापूर यासारख्या आघाडीच्या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समूहामध्ये सहभागी झाला आहे.
📌मानवी हक्क, सर्वसमावेशकता, विविधता, नवसंशोधन तसेच आर्थिक वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence -AI) तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्ण विकास आणि वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) हा अनेक हितधारकांचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे.
📌“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) एका सचिवालयाद्वारे व्यवस्थापित केली जाणार आहे, ज्याचे यजमानपद पॅरिस या शहरातली आर्थिक सहकार व विकास संघटना (OECD) तसेच मॉन्ट्रियल (कॅनडा) आणि पॅरिस (फ्रान्स) या शहरांमध्ये असणारी तज्ञांची दोन केंद्रे हे भूषवतील.
🔴ठळक बाबी
📌सहभागी देशांचा अनुभव आणि विविधता यांचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आसपासची आव्हाने आणि संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
📌हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्राधान्यक्रमांवर आधारित उपक्रमांना सहाय्य करून कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सिद्धांत आणि कृती यांच्यातले अंतर कमी करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असणार आहे.
📌भागीदार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने GPAI कृत्रिम बुद्धिमतेच्या जबाबदार उत्क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, नागरी समाज, सरकारे आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणणार.
📌GPAI कोविड-19 विषाणूच्या विद्यमान जागतिक संकटाला चांगला प्रतिसाद देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा लाभ घेता येऊ शकतो, हे दर्शविण्यासाठी कार्यपद्धती विकसित करणार.
📌भारताने अलिकडेच राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संकेतस्थळ सुरू केले आहे; तसेच विकासाला पूरक मानवी दृष्टिकोनाचा समावेश आणि सबलीकरणासह शिक्षण, कृषी, आरोग्य सेवा, ई-कॉमर्स, वित्त पुरवठा, दूरसंचार इत्यादी विविध क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ उठवण्यास सुरवात केली आहे. संस्थापक सदस्य म्हणून GPAIमध्ये सामील झाल्यामुळे समावेशक वाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुभवाचा फायदा घेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक विकासात भारताला आता सक्रियपणे सहभागी होता येणार.
Follow me on blog for daily updates and more other information.
:-
https://yogeshjadhave.com
टिप्पण्या