मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

राजकारणाचा जांगडगुत्ता

राजकारणाचा जांगडगुत्ता

            मित्रहो,  भारतीय राजकारणाला खूप जुना इतिहास आहे. या राजकारणाची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. या देशात खूप अनुभवी नेतेही होऊन गेलेत. ज्यांची स्वप्ने आधुनिक राजकारणातील नेते पूर्ण नाही करू शकले. आज भारतातील राजकारण म्हणजे एक चिंतेचा विषय झाला आहे. येथे नवीन नेते व पक्ष तर जन्माला येतात. परंतु नवीन विकासाची गाथा जन्माला येत नाही. कारण येथील राजकारणी जनतेला सत्यापासून दूर ठेऊ इच्छितो. कारण ज्यादिवशी या जनतेला सत्य गवसेल त्यादिवशी येथील राजकारण्यांना आपली राजकारणाची पोळी भाजता येणार नाही हेच खरे आहे .
            आज प्रत्येक निवडणुकीत एकच एक मुद्दा बनवला जातो. लोकांना भावनिक करून त्यांची मते मिळवण्यात येथील राजकारणी सफल होतात. त्यामुळे त्यांना अधिक काही मेहनत करण्यची गरजच भासत नाही. दोन गटात भानगडी लावणे व त्या भानगडी स्वतः सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे. म्हणजे नेता शाबूत व जनता आपल्या भ्रमात गुरफटलेली असते. अशा हीन राजकारणाची नेहमीच चीड येते. राजकारण्यांची पोरे पैशाच्या जोरावर सुटतात तर गरीबाची पोरे यात वर्षानुवर्षे जेल मध्ये सडतात. म्हणजे कार्यकर्ता कधी मोठे स्वप्ने पाहतो ती तशीच विरून जातात. येथील राजकारण्याच्या नावावर हजारो केसेस असल्या तरी तो राजकारण लढू शकतो व जी चूक आपण केलीच नाही, खोटे फसवले गेले आहेत अशा बिचाऱ्या गरिबांच्या पोरांना साधी नोकरी सुध्दा मिळत नाही. यापेक्षा कोणते वाईट दिवस असतील?
              देशात आज कोट्यावधी लोकं अशी आहेत कि ज्यांना एकवेळचे खाणे सुध्दा जेमतेम मिळते. तो देश या लोकांची भूक भागवण्याऐवजी कोट्यावधी रुपये पुतळे, धार्मिक स्थळे, स्थापत्य निर्मिती, मनोरंजन यात खर्च करतो. अतोनात पैसा जेथे गरज नाही तेथे खर्च करतो. विरोध पुतळे किंवा धार्मिक स्थळांना नाही; विरोध आहे अशा कृरतेच्या प्राधान्यक्रमाला. या देशात एखादे नाव बदलण्यासाठी, एखाद्या स्थळाला आपले नाव देण्यासाठी, आपली प्रतिष्ठा उंचावण्यासाठी आंदोलने होतांना दिसतात. तीच आंदोलने विकासासाठी का होतांना दिसत नाहीत ? गलिच्छ राजकारण करून संसद सभागृहामध्येही हे राजकारण खेळतांना दिसतात. मग यांच्या डोक्यात कुठे विकासाची कामे दिसतात? फक्त एक मारल्याचे नाटक करतो तर दुसरा मार खाण्याचे. यात मात्र सर्वसामान्याला खरे काय ते कळत नाही. भानगडी लावणारे एकाच ताटात खतात व त्यांच्यासाठी भानगडी करणारे व एकमेकांशी वाईट होणारे नेहमी साठी आपले शत्रू निर्माण करत फिरतात. यासारखे दुर्भाग्य या देशाचे कोणते असू शकते?
             याचे नाव द्या, त्याचे नाव द्या असं आज सर्रास चालेले आपण समजात पाहतो. पण ज्यांच्या नावाचा तगादा आपण लावून ठेवलेला आहे त्याच्यातील एक तरी गुण आपण अंगिकारला का ? मग हे दिखाव्याचे राजकारण करून आपण काय सिध्द करू इच्छित आहात? भारत कर्जबाजारी झाला तरी चालेल पण येथील राजकारणी व नेत्यांना हाय लेव्हलचे ट्रान्सपोर्ट आणि हाय लेव्हलच्या सुविधा पाहिजेत. यासाठी करोडोंचे कर्ज घेतले जाते. मग या देशात राहणाऱ्या लोकासाठी या देशाच्या तिजोरीत पैसा का नाही? येथील जनतेला फसवून त्यांना गरीब व सर्वसामान्य जीवन जगण्यास भाग पडणाऱ्या येथील सरकार काय साध्य करू इच्छित आहे? जेथे जनतेला अधिकार व स्वातंत्र्य खूप मिळाले पण फक्त कागदोपत्रीच ! प्रत्येक क्षेत्रात फक्त राजकारण्यांचे वर्चस्व असतांना दिसते. देशात जवळ जवळ सर्वच संस्था व आस्थापने हे राजकारण्यांचेच आहेत. मग बाकीच्यांचे काय ? तर यांना सरकार तुटपुंजी कर्जमाफी , कर्ज, त्याच्या हफ्त्याची वसुली, कार्यवाही इत्यादी इत्यादी देते व तात्पुरते खुश करते. आणि आपणही यात खुश होऊन जगतो. कर्ज घेणे व ते न फेडता मरणे, कसाही मेला तरी तो कर्जापोटीच मरतो. या पध्दतीने फक्त लुटीचा प्रयत्न येथे होतो. म्हणून येथील सरकार सोबत येथील जनताही याला कारणीभूत ठरते.
           राजकारणासाठी व राजकारणापोटी लोकांनी आपली बुद्धिमत्ता गहाण ठेवून आपले सर्वस्व विकून टाकले आहे असंच म्हणावे लागेल. कारण येथील राजकारणाचा स्तर एवढा खालावलेला आहे की, या देशाचे अस्तित्व, त्याची गनिमा, प्रतिष्ठा, विकासाची दिशा, जनतेचे हित, लोकशाहीची मूळ संकल्पना हे केवळ नावालाच उरलेले आहे. नको त्या गोष्टीला प्राधान्य देवून व नको तेथे तोंड खुपसून सत्ताधारी व विरोधी पक्ष नको ते धिंगाणे घालतात. मग यांना जनसेवेची कुठे पडलेली दिसते? स्वतःच्या खुर्ची पेक्षा येथील राजकारणाला काहीही मोठे नाही. त्यासाठी देश गहाण ठेवावा लागला तरी यांना त्याचे सोयरसुतक नाही. अशा फालतू राजकारणाला पूर्णविराम कधी मिळणार ?
              वरील विवेचनावर थोडा तरी विचार करावा. व खऱ्या राजकारणाचा मतितार्थ समजून भविष्याला सावरण्याचा प्रयत्न करावा. राजकारणाने माणसाला निर्माण केले नाही, माणसाने राजकरण निर्माण केले आहे. हे जरा निट समजून घ्या व त्यासाठी आपलीच माणसं विसरून जाऊ नका. नाहीतर या देशाला पुन्हा गुलामीचे जीवन जगावे लागेल यात शंका नाही.
धन्यावद !

- योगेश आर जाधव
शिक्षक, लेखक, ब्लॉग कन्टेन राईटर

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा