जग : स्वरूप व समज
जग : स्वरूप व समज
सर्वसाधारण लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन Negative म्हणजे नकारात्मक असतो. जग नाशिवंत आहे, असार आहे, भ्रामक आहे, मिथ्या आहे अशा विकृत दृष्टिकोनांतून जगाकडे पहिले जाते. जन्माला येणे म्हणजे जगाच्या बंदिखान्यात येऊन पडणे, अशीच लोकांची विकृत धारणा होऊन बसलेली आहे. वास्तविक, परमेश्वराने निर्माण केलेले हे जग सुंदर व सुरेख असून ते अधिक सुंदर व सुरेख करण्यासाठी परमेश्वराने माणसाला बुद्धीचे वरदान दिलेले आहे.
जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या :
*"ब्रह्म सत्य जगन् मिथ्या" अशी बडबड व वटवट करणाऱ्या पंडितांना दुपारी बारा वाजता पोटातील जठराग्नी उग्र स्वरूप धारण करू लागला की, "भूक सत्य व बाकी सर्व मिथ्या" असा "ब्रम्ह साक्षात्कार" होतो.
*जग विष्णुमय आहे आणि म्हणूनच ते मिथ्या नसून मिठ्ठा आहे.
*ज्याप्रमाणे साप आपली जुनी कात टाकून नवीन कात धारण करतो त्याप्रमाणे हे जग जुने रूप टाकून नित्य नवीन रूप धारण करीत असते. म्हणून जग हे मिथ्या नसून नित्यनूतन आहे.
*"जग म्हणजे वेड्यांचा बाजार" ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती होय.
*अंतःकरणातील पांडुरंगाच्या रंगात रंगून गेलेला जीव जेव्हा जगाकडे पाहतो तेव्हा तेच जग त्याला श्रीरंग दिसते.
*"ब्रम्ह सत्य जगन् मिथ्या" या सिद्धांतांचा भावार्थ असा की ब्रम्ह हे नित्य असून जग हे नित्यनूतन आहे.
*गज का जगदीश हा प्रश्न पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. स्टूल दृष्टीला जग दिसते तर सूक्ष्म दृष्टीला जगदीश (परमेश्वर ) दिसतो.
*कल्पनेकडून जगाकडे पहिले तर ते कल्पनारूप आहे. व म्हणून मिथ्या; वस्तूकडून जगाकडे पहिले तर ते वस्तुरूप आहे व म्हणून ते सत्य होय.
*सर्व विश्वाची धारणा एका खांबावर झाली आहे, तो खांब म्हणजे प्रेम.
*"वाढे वाढे अक्कल वाढे" असे घडले असते तर या जगाचे नंदनवन झाले असते, परंतु प्रत्यक्षात मात्र "वाढे वाढे अक्कल पुढे" असे घडत राहिल्यामुळे या जगाचे वाळवंट होण्याची दाट शक्यता आहे.
*जे दिसते ते असतेच असे नाही व जे असते ते दिसतेच असेही नाही.
*'जे नाशिवंत ते असत्य व मिथ्या' हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे, कारण जे नाशिवंत असे समजण्यात येते ते स्वरूपतः ब्रम्ह असल्याने त्याचे रूप नित्यनूतन असते.
या लेखाविषयी आपले मत जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आतापर्यंत आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! नवीन पोस्ट पाहण्यासाठी ब्लॉगला फॉलो करा.
टिप्पण्या