अहिराणी भाषा संवर्धन
आहिराणी भाषा : इतिहास,महत्व व त्याची काळानुरूप संवर्धन करण्याचे उपाय.
खान्देशनी मायबोली म्हणजे आहीराणी भाषा शे. आहिराणी भाषा म्हणजे मायनं पांघरून शे. आहिराणी भाषांना इतिहास तसा भलताच जुना शे. अजिंठा, सातपुडा डोंगररांगा, वाघुर नदीना खोल भाग, गुजरातना डांग जिल्हामा राहणारा अहिर लोकेसनी भाषा म्हणजे आहिराणी. जयगाव, धुय, कन्नड, कयवन, सटाणं, मालेगाव, नंदुरबार, गुजरात न काही भागमा आहिराणी भाषा बोलावस. या भाषावर गुजराती आणि मराठी भाषांना बराच प्रभाव शे. म्हणजे आहिराणी भाषांना बराच शब्द या भाषासमाईन येयल शेतस. या भासले जवळ जवळ पाच हजार वारीसना इतिहास शे. या भाषामा पाहिजे तीतलं साहित्य लिखेल नही. पण पारंपारिक साहित्य देखले भेटस. इ.स. १२०६ सालले चाईसगाव तालुकाना पतन गावमा आहिराणी भाषना शिलालेख सापडेल व्हता. महानुभाव पंथसना साहित्यमा पण या भाषांना बराच शब्द देखावतस. ज्यानं त्यानं भागमा या भाषांना शबद बोलांनी पध्दत न्यारी न्यारी शे. त्यामुळे या भाषांना बराच प्रकार देखावतस. या भाषामा जोडशबद जास्त येयल शेतस.
आहिरणी भाषा आपण घरमातूनच शिकतस. तिले शिकानासाठे कोठे जावानी गरज नही. हाई पण एक भाषा शे, पण आपण चार जनमा उभा राहिसन बोलणं का लोके आपले हासी देतस. हाईमातर चुकीनं शे. अरे भाषा म्हणजे समाजना संपर्कांन माध्यम शे ते हुशारी देखाडानं साधन नही. हाई आमले समजी लेनं पडीन. यासाठे आपले साहित्यसंमेलन भराईसन लोकेसले अहिराणी भाषान महत्व पटाडी देनं पडीन. या भाषामा जीतली आपुलकी अन माया शे तितली माले कोणतीच भाषामा देखावस नही. आहिराणी भाषा वापरीसनच माले मना माय-बाप धाकलानं मोठं करं, पण मना डिग्रीवर काई यांना परिणाम देखावत नही. म्हनिसन सांगस भाषा हाई फक्त संपर्कानं माध्यम शे ते हुशारी देखाडानं नही. म्हणीसन या भाषांना वापर करतांना अजिबात शरमावानं नही. आपणच जर या मायबोलीले विसरी जासूत तर त्या भाषानं अस्तित्व मिटी जाई. म्हणीसन या भाषाले वाचाडान साठे जास्तीत जास्त जितालाबी करता येतीन तीतला उपाय कारले पाहिजे.
कोणतबी शासन कार्यालय जर खानदेशना विस्तारमा व्हईन तर त्या कार्यालयना कामे दुसरी भाषामा चालतस व्हतीन ते चालू द्या. पण लोकेसशे बोलतांना स्थानिक भाषांना वापर कराले पाहिजे. असा नियम कराले पाहिजे. यानामुळे तठला लोकेसले बी त्या अधिकारी बद्दल आपुलकी वाटीन अन त्याले सांगेल सर्व लवकर कयीन. कोठे बी जाशात ते अहिराणी संगे लई जा. ज्या लोके तुमले हासी देतस त्यासले त्या भाषानं महत्व समजाई द्या. ती आपला अभिमाननी गोट शे हाई समजाडी द्या. ज्या मायना आधार ली सन धाकलानं मोठा व्हयनूत तिले विसरीसन कसं चालीन. भाषा पण मायच शे तिले पण आपुलकीतून वाढावा.
आहिराणी भाषामा साहित्य निर्माण कराले पाहिजे. त्या साहित्यानं गावोगाव प्रदर्शन भरावाले पाहिजे. या परदशनमा ज्या नवीन गोष्टी व्हतीन त्या मासिकमा प्रसिध्द करले पाहिजेत. नवीन शब्दसले अहिराणी भाषानी स्वीकाराले पाहिजेत. या भाषाले खरच टीकाळानं व्हईन ते नवीन भाषांना शब्दसनी गाठभेट लेवाले जोईजे. कायनुसार बदलांनी गरज त्यामा शे. आहिराणी भाषांना शब्दकोश सारखा ग्रंथ तयार कराले पाहिजेत. बाकींना जसा पेपर येतस तसा अहिराणी भाषाना पेपर काढीसन लोकेसले वाचाले द्या. अहिराणी साहित्य निर्माण कराले प्रोत्साहन द्या. न्यारा न्यारा प्रकारना खेळ, गाना, साहित्य, गोष्टी यासना परिचय एकसावा लोकेसले करी देवानी गरज शे. तवय कोठे समजीन लोकेसले की मनी भाषा पण महान शे. त्यासले त्यासन मन मोकळ कराले जागा द्या. त्यासले तवय वाटीन नई मनी भाषा खरच वाचाडाले पाहिजे. कारण बराच जणीसले लिखणं ऱ्हास, बोलणं ऱ्हास पण त्यासले अहिराणी शिवाय काहीच येत नही. त्यासना साठे हाई योजना चांगली शे. गावोगावना लोकेसले साहित्य लिखामा जोडी लेवाले जोईजे. त्यासना मा लपेल ज्या गुण शेतस त्या देखाले भेटतीन. अन त्यासले बी अनभक वाटीन.
अहिराणी भाषामा कथा, कादंबऱ्या लीखले जोईजेत. ज्यानामुळे अहिराणी भाषामा नवीन शब्दसनी भर पडीन. आणि मनी अहिराणीले नवीन जनम भेटीन. शायमा पण पोऱ्याले काई समजस नही तवय त्याले त्याना भाषामा सांगानी पध्दत चालू कराले पाहिजे. कारण त्याले त्याना भाषामा जीतलं समजीन तितलं त्याले बाकींना भाषामा समजाव नही. जे पण आपले करता येईन ते या भाषांना साठे कराले पाहिजे. तवय कोठे मनी अहिराणी भाषाले टिकाडता येईन. घरमा सुध्दा बोलतांना पोरेसले लोके इंग्रजीमा बोलाले लावतस ते चांगलं शे. पण, त्याना बरोबर आपली अहिराणीमा त्याले काय म्हणतस ते त्याले सांगाले जोईजे. मनी अहिराणीले तुमना पुस्तकनं एक पान पण दिध तरी मनी अहिराणी जगीन. अन त्यान महत्व लोकेसले समजीन पण. याना बरोबर हाई पण ध्यानमा ठेवाले जोईजे, कोणतीबी भाषा परिवर्तनीय / बदलणारी ऱ्हास अन त्याना स्वीकार ज्या भाषानी करा तीच भाषा टिकतांना आपले दिखस. हाईपण ध्यानमा लेवाले जोईजे. देखा मी तुमले मनी अहिराणी ना साठे कवी सुभाष तात्यांना भाषा मा विनंती करस.
देखा गड्यावन मी कोठे बी जास ते
मनी अहिराणी संगे लई जास.....
तुमना सारखा लोके हासी देतस
मी शरमाई जास .....!
मनाच खान्देशमा मनाच अहिराणी माणूस
मनीच अहिराणी ले हालाई ऱ्हायनात अन
पराई जातनी इंग्रजीले फुस्लाई पटलाई बलाई ऱ्हायना....!
थंडा पाणीना आणि उन्हा पाणीना मे बठीन का दादावन ?
मन नादान लेकरू टुपूटुपू तुमना शायना वट्टा चढी उनं ...
त्याले इंग्रजी पुस्तक देखाडीसन तुमी भेमकाडी दिनं.
म्हणीसन सांगस,
मनी अहिराणी माय नी हालायी झुई
माले बोलता उना नही पहिला शबद आई....
माले वाडे लावामा व्हयनी तिनी काडी,
मना कंठमा फुटना पहिला शबद माडी ......!
बोट धरिनी मायना मी शिकनु चालानं ...
मना संगे चाली उनं अहिराणी बोलणं .....
मनी अहिराणीले मी शायमा लई गऊ ...
टिंगल करेत पोरे मी शरमाई गऊ ....
छडी मास्तरनी मारी उना हातवर वय
मनी अहिराणी रडणी तिले उनी कय.....!
बयजब्री यासनी माले इंग्रजी कयाडी
मनी अहिराणी ले यासनी शायमान पयाडी .....
म्हणीसन सांगस दादावन,
मम्मी ले माडी म्हणाई गे व्हईन ते नादान लेकरूना कानमा मारू नका,
Daddy ले बाप म्हणाई गे व्हईन ते बुठडं त्यानं धरू नका......
पोऱ्यानी जात शे मायनी बोली बोलना व्हई ...
हातवर चटका त्याना ठेऊ नका
आमनी अहिराणी भाषाना शबद तुमना भाषांना अंकुर शे,
कमी वयमा त्याले खोडू नका...!
मायवर आंडोर म्हणाई गे व्हईन ते मायवर डोया काढू नका....
पाहुणासना समोर खिजाईसन वट्टावर त्यासले धाडू नका ,
माठ ले म्हातनी म्हणाई गे व्हईन ते बायकोले गाई देऊ नका ....
गावठी गावंढळ म्हणीसन इज्जत कोणी लेऊ नका ....!
म्हणीसन सांगस,
या खान्देशना मातीले पवित्र कुकूना मान शे,
अन माले जान शे,
म्हणीसन तुमी ज्या मातीवर जोडा घालीन चालतस ती माती आमना शेतकरी कपायले लावतस.
या मातीमाना पार्ट माले देखणा शेतस इतिहासना पानेसवर लिखना शेत,
तुमना बालगंधर्व माले लिखता उना नही पण पंडित तात्यांनी लिखेल शे,
खराखादिना राजा मी देखेल नही पण तामासामातला मी देखेल शे....
तुमनी मंगळागौर लिखाई गई मनी कानबाई कोठे लिखायनी नही ....
तुमना इतिहासना पानेसवर मनी गौराई कोठे देखायनी नही .....!
तुमना सत्यनारायण बसाडा आमना भालेदेव तुमी बसाडा नही ...
सात दिनना दही तूप ना दिवाच कोणले देखाडा नही ....
म्हणीसन मनी अहिराणी माले बोलू द्या,
अहिराणीमा साहित्य शे तेनं दारन माले खोलू द्या,
जमजम तुमना पुस्तकसना पाने भरू द्या
मनी गरीब अहिराणीले एक पान उरू द्या .....
एक पान उरू द्या ......
(कविता कोपी पेस्ट )
धन्यवाद !
लेखन : योगेश आर जाधव.[ BA D.T.ed , MA B.Ed ]
उच्च माध्यमिक शिक्षक, सुरत, गुजरात.
टिप्पण्या