मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

संगतीचे फायदे - तोटे

 संगती :


 जेवणात संघटनेचे महत्त्व अपरंपार आहे. या सत्याचा बोध न झाल्यामुळे माणसाच्या जीवनाला प्राय: अनिष्ट वळण लागत असते. संगती च्या बाबतीत पोरांनी जितके सावध असले पाहिजे त्याही पेक्षा अधिक सावधता थोरांनी बाळगली पाहिजे. थोरांना जर संगतीचे महत्व उमजले नाही तर पोरांना काय समजणार? संगती ही जीवणात निर्णयाक शक्ती आहे, याची पूर्ण जाणीव जर थोरांना झाली तरच ते पोरांना उत्तम संगती मिळण्याच्या बाबतीत प्रयत्नशील राहतील.
*जशी संगती तशी मती व जशी मती तशी गती.

*पूर्णं सत्यानाश करण्याचे किंवा सत्याचा साक्षात्कार करून देण्याचे विलक्षण सामर्थ्य संगतीत आहे.  म्हणून संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे.

* सज्जन व चांगल्या लोकांची संगत म्हणजे सुखी जीवनाशी मेळ असतो.  तर दुर्जन व व्यसनी लोकांची संगत म्हणजे प्रत्यक्षात विस्तवाशी खेळ असतो.

*  दुर्जन व व्यसनी लोकांची संगत मिळणे सहज व  टिकते  ही कायम,परंतु सज्जन व चांगल्या लोकांची संगत मिळणे कठीण व टिकणे त्याहूनही कठीण असते.

* चांगल्या लोकांच्या संगतीत आयुष्याचे सोने होते तर वाईट लोकांच्या संगतीत त्याची माती होते.

* संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीतच आहे..

* सत् चा चित् ने स्वीकार करणे म्हणजे सत्संग  होय.

* ज्यांच्यामुळे सत् चा  साक्षात संग  घडतो तो जाणावा सत्संग.

* संगत करण्यात माणसाने अत्यंत सावध असले पाहिजे कारण जशी संगती तशी गती किंवा अधोगती प्राप्त होते.

* जीवन हे संगीत आहे हे संत संगती शिवाय उमजत नाही.

* जीवणात संगीत किंवा विसंगती निर्माण करण्याचे सामर्थ्य संगतीत आहे.

* आपल्या मुलांना सजग लोकांची संगत मिळेल मिळेल अशी काळजी घेणे व त्याप्रमाणे चिकाटीने व्यवस्था करणे हे प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तव्य आहे.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा