मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

शासकीय योजना माहिती

 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना

 योजनेची कार्यवाही 1 june 2015

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 9 मे 2015 रोजी कोलकाता येथे सुरू करण्यात आली

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना एका प्रकारची दुर्घटना बीमा पॉलिसी असून ज्या अंतर्गत दुर्घटनेवेळी मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा रकमेसाठी क्लेम केला जाऊ शकतो

या योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्तींना लाभ घेण्यास पात्र राहतील

या योजनेत वार्षिक 12 रुपये हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आपोआप जमा होईल

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास अपंगत्व आल्यास एक लाख रुपये आंशिक अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये व अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची घोषणा केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या द्वारे 28 फेब्रुवारी 2015 रोजी 2015 16 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली

1 जानेवारी 2016 नुसार प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत 2200 पेक्षा अधि खातेदारांनी अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज केले ज्यातील 1200 खातेदारांना अर्थसहाय्य देण्यात आले

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही काही कालावधीनंतर प्रधानमंत्री जनधन योजनेची जोडण्यात येईल

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही एका वर्षासाठी असून पुढील वर्षासाठी की  रिन्यू करणे बंधनकारक राहील

पात्रता

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्तींना लाभ घेण्यास पात्र राहतील

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे राहील

जर एखाद्या व्यक्तीचे एक किंवा त्यापेक्षा अधिक बचत खाती आहेत तेव्हा अशी व्यक्ती कोणत्याही एका खात्याअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकतील

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेत सहभाग राहण्याचे मार्ग

प्रत्येक वर्षी एक जण अगोदर फॉर्म भरणे फॉर्म भरल्यानंतर बँक हप्ता रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यातून वजा करून घेतली जाईल

दुसरा मार्ग दोन ते चार वर्षाचा लॉन्ग टाइम रिस्क कव्हरेज आहे

यास ग्राहकाने पसंती दिल्यास हप्ता रक्कम प्रत्येक वर्षी बँक स्वतः लाभार्थ्यांच्या खात्यातून वजा करून या खात्यावर जमा करतो

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज बँक विमा कंपनी किंवा ऑनलाइन या मार्गांनी प्राप्त करता येईल

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही प्रथम SBI द्वारे लागू करण्यात आली नंतर ती खाजगी बँक व एलआयसी बरोबर जोडण्यात आली आहे

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना समाज होण्याची निकष

लाभार्थ्यांचा वयाच्या 70व्या वर्षी पॉलिसी समाज बंद करण्यात येईल

जर हप्त्याची रक्कम वेळेवर जमा करण्यात आली नाही तर बँक किंवा विमा कंपनीमार्फत पॉलिसी बंद केली जाऊ शकते

जर एखाद्या लाभार्थ्याची बँकेत दोन बचत खाती असतील व तो दोन्ही खात्यामार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी असेल तर अशा लाभार्थ्यांना एकाच खाते अंतर्गत लाभ प्राप्त होईल

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना 80C कलमाअंतर्गत करमुक्त आहे परंतु जर विमा पॉलिसी अंतर्गत एक लाख रुपये देण्यात आले व फॉर्म 15G किंवा 15 H जमा नाही करण्यात आला तर एकूण उत्पन्नातून 2% TDS कापण्यात कमी करण्यात येईल

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने बरोबर अटल पेन्शन योजना व जीवन ज्योति योजना सुरू करण्यात आली

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेस 2015 16 पासून सेवाकरातून 100% सूट देण्यात आली आहे

*स्टार्टअप इंडिया स्कीम

स्टार्टअप इंडियाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 15 ऑगस्ट 2015 रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी करण्यात आली

स्टार्टअप इंडियाची सुरुवात 16 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात करण्यात आली

योजनेचा उद्देश

नवउद्योजक प्रोत्साहन देणे व रोजगार निर्मिती घडवून आणणे

स्टार्टअप इंडिया योजनेची कार्यवाही DIPP अंतर्गत करण्यात येईल

स्टार्टअप इंडिया म्हणजे अशी कंपनी बौद्धिक व तंत्रज्ञान मालमत्तेच्या आधारावर नवनवीन उत्पादने व सेवांचे व्यापारीकरण व आधुनिकीकरण करते

स्टार्टअप इंडिया योजनेची वैशिष्ट्ये

उद्योजकांसाठी सरकारी नियम आणि बंधने कमी करणे

लघुउद्योग निर्मितीतील परवाना राज व परकीय गुंतवणूक अडथळे समाज करणे

रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी शाश्वत आर्थिक वृद्धीला चालना देणे 

देशातील महिला उद्योजकांची प्रोत्साहन देणे

टिप्पण्या

Have any doubt ?
Emotions
Copy and paste emojis inside comment box
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा