मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

या खुर्चीखाली दडलय काय ?

            मित्रोहो ! भारत हा एक लोकशाही असलेला विशाल खंडप्राय देश आहे. भारतातील राज्य घटना म्हणजे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना होय. परंतु सध्याच्या राजकीय व सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक घडामोडींना लक्षात घेतल्यास असे दिसून येते कि जगातील सर्वात मोठी राज्यघटना असलेला हा लोकशाही व्यवस्थेचा देश आज धोक्यात येत आहे. आणि शोकांतिका म्हणजे या देशाच्या नेतृत्व करणाऱ्या कोणालाही याचे सोयरसुतक नाही. आजच्या राजकीय वातावरणाला वेगळेच वळण दिले जात आहे; नव्हे ते मिळत आहे. लोकशाही देशात ह्या घडामोडी घडणे हा स्वाभाविक विषय आहे. पण या स्वाभाविक विषयाला ज्यावेळेस आपल्या देशाचे हित जोपासायला वेळ नसतो त्यावेळी हा चिंतेचा विषय होतो.

         आज राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर गल्ली-गल्लीत राजकीय पक्ष उदयाला येत आहेत. ज्यांना खायची अक्कल नाही तेही नवीन राजकीय पार्टी उभी करत आहेत. स्वतःच्या नावाची पताका फिरवत आहेत. सरळ चाललेल्या कामात तोंड घालत आहेत, व त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला घर चालवता येत नाही अशा नेत्याच्या मागे सारे गाव फिरत आहे. मग होत काय हा नेता थेट स्विस बँकेत खाते खोलण्यापर्यंत मजल मारतो व आपल्या मरेपर्यंत खुर्ची ताब्यात ठेवतो. आणि मारण्याच्या अगोदर त्याचे कॅलेंडर असतेच ते त्या खुर्चीला चिटकवून जातो. म्हणजे हा कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणूनच मारतो. अख्ख आयुष्य ज्याने मातीत घालवले तो मातीतच मारतो आणि ज्याने माती कधी पहिलीच नाही तो खुर्ची सांभाळतो. या आपल्या निर्लज्ज पणामुळे आपल्यावर पुन्हा गुलामगिरीची पाली येईल यात नवल नाही.

          कोणताही नेत्याचा इतिहास पहा, असे कधी ऐकायला मिळणार नाही कि तो नेता सर्वसामान्यसाठी मेला. तो या सर्वसामान्य नागरिकाच्या सोबत असल्याचा फक्त आव आणतो. कारण त्यामागे पण त्याचे राजकीय हित असते. या देशातील 80 % आंदोलने हे राजकीय खेळ खेळण्याकरिता केले जातात. एकमेकांची जिरवण्यासाठी केले जातात. हे सर्वमान्य सत्य आहे, हे आम्हाला पटते पण ते डोक्यात शिरत नाही. आमची बुद्धी दुसऱ्याकडे गहाण पडलेली असते. आम्ही व्यस्त असतो आंदोलनामध्ये आणि लोणी काढण्यात आणि खाण्यात व्यस्त असतात राजकारणी. एक भडकावतो तर दुसरा शांत करण्याचा पवित्र घेतो. या अतिशय खालच्या दर्ज्याचे राजकारण या देशात चालते. आणि म्हणूनच जग आपल्याला मागास म्हणूनच पाहतात. जपान सारख्या देशात अनेक अडचणी येऊन, अनेक संकटे येऊन तो देश आज जगात तंत्रज्ञात पुढे आहे मग आम्ही काय शेण खातो. आमच्या देशाला विशाल क्षेत्र लाभलेले आहे, खनिज संपत्ती लाभलेली आहे, विशाल युवा वर्ग आहे, मग आम्ही मागे का? याला कारण म्हणजे आमच्यातील स्वार्थी राजकारण आणि राजकारणी, जातीय हिंसेने पिडीत्व, धर्ममार्तंडांनी निर्माण केलेला भूलभूलया, जातीव्यवस्थेवर आधारलेले राजकारण अशी अनेक कारणे आहेत.

           येथील राजकीय न्र्त्याला जेवादी खुर्ची प्रिय आहे तेवढी सामान्य जनतेची, या देशाची अजिबात पडलेली नाही. हे आम्ही सर्रास विसरून जातो. राजकारण्यांचे खरे रूप आपण पाहत नाही. त्याकडे दुर्लक्ष करतो व ते याचा पुरेपूर फायदा घेतात. मित्रांनो नेते आपल्यासाठी आहेत. आपण त्यांच्यासाठी नाहीत. त्यांना आपण निवडून दिले आहे त्यांनी आपल्याला निवडलेले नाही हे समजून घ्या. फालतू कोणी सांगितले आणि रस्त्यावर उतरले तर या देशाचे परिणामी तुमचे वाटोळे करून घ्याल. याचे उत्तम उदाहरण तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत कोणालाही बहुमत न मिळाल्यामुळे कोणत्याही एका पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. म्हणून येथे फक्त खुर्ची साठी जवळजवळ तीन महिने वाद चालले. आणि आजही येथे राजकीय वाद सुरूच आहेत. ज्या पक्षाच्या जोरावर मोठे झालेत ते खुर्ची साठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत. का तर तेथे त्यांना खुर्चीचे गजर मिळाणार आहे. अरे जे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत, ज्यांना एकनिष्ठता माहित नाही त्यांना तुम्ही आपला नेता निवडतात. यापेक्षा दुर्दव्य ते कोणते असेल? अरे अमेरिकेच्या इतिहास जरा पहा त्यात कोणताही राजनेता दोनपेक्षा जास्त काळ राष्ट्राध्यक्ष पदावर राहिलेला नाही. आणि म्हणूनच तो देश आज महासत्ता आहे. आम्ही फक्त स्वप्नच पाहायचे महासत्ता होण्याचे. आजच्या घडीला महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे. प्रत्येक राजकीय नेता येतो नवीन कर्ज घेतो आणि आपली फुशारकी मारतो. मी हे दिले, मी ते दिले. आपण बाकीच्यांना हे कुठे कळतंय कि याच्या बापाचे काय जातंय. प्रत्येकजण फक्त कर्ज करून जातो. व या मातीला कर्जाच्या खाईत लोटून निघून जातो. ते फेडायचे नाव कोणी घेत नाही. असेच जर चालू राहिले तर हे महाराष्ट्र आपल्या बापाचा समजून हे विकायलाहि कमी करणार नाहीत.

       या खुर्चीच्या राजकारणासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आवाज उठवणाऱ्याला हळूच बाजूला केले जाते. म्हणजे सत्य सर्वांपर्यंत पोहचू दिले जात नाही. या खुर्चीखाली नेमक दडलय काय हेच काळात नाही. फक्त निवडणूक जिंकणे येथील राजनेत्याची पात्रता असते. तो अंगाठेबाहादूर असला तरी चालतो. एकदा का तो निवडून आला म्हणजे मग ती खुर्ची त्याची विकत घेतली जाते. मला कोणत्याही राजकारणाशी अथवा राजकीय पक्षाशी घेण देण नाही. परंतु जी सर्वसामान्यांना फसवण्याची कारस्थाने चालू आहेत ती बंद ब्व्हावीत. व योग्य मार्गाचा अवलंब करून विकासाची कामे करावीत. विधान परिषदेतील सत्र जनतेच्या पैशांनी चालते, मात्र चर्चा व भानगडी राजकारणाच्या होतात मग जनतेच्या हिताची चर्चा, विकासाचे आराखडे काय घरात एकांतात करणार आहेत काय ? वेळेचे आणि स्थळाचे भान ठेऊन कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असो त्याला पूर्ण सहकार्य करून राजकरण केले पाहिजे. निवडणूक फक्त निवडणुकी पुरतीच मर्यादित असली पाहिजे. तो विषय पाच वर्ष पूर्ण बंद ठेऊन सर्व्यांनी मिळून मिसळून विकासाची कामे केली पाहिजेत. तरच हा देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल. देशाची संपत्ती विकून महासत्ता होण्याची स्वप्न जर पाहत असाल तर हवेत कागदाचा महाल बांधण्यासारखे होईल.

       देश तुमचा आमचा आहे. राजकारण्यांचा एकट्याचा अथवा राजकारणचा नाही. म्हणून त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन हातभार लावला पाहिजे. नुसते घोषणा देऊन हा देश परिवर्तीत होणार नाही,. त्यासाठी आपले सर्वस्व देण्याची ताकद असायला पाहिजे. आणि हि ताकद ज्याच्याकडे आहे, हे बलिदान ज्याला देता येईल त्यानेच राजकारणात पडावे. त्यानेच नेतेगिरी करावी. नुसती भरती होऊन या देशाचे वाटोळे करू नये. हीच अपेक्षा असेल. वरील आर्टिकल मध्ये भाषा जरी थोडी अवघा असली तरी कोणत्याही नेत्याला वैयक्तिक बोलले नाही. यामुळे फक्त विचार करून परिवर्तन आणण्याचा हेतू आहे. तरी आपण आपल्या समंजस बुद्धीने युगी अर्थाने हे समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद !



          हे विचार माझे स्वतःचे असून त्याला सर्वच सहमत असतील असे नाही. परंतु विचार करण्यासारखे तथ्य त्यात आहे. ते समजून घ्यावे. कोणत्याही राजकारणासाठी अथवा इतर कायदाकीय प्रवृत्तीसाठी याचा वापर करता येणार नाही. आपली काही सूचना असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कळवावी.

 -योगेश जाधव 
उच्च मध्य. शिक्षक, लेखक, ब्लॉगर 

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा