जगातील संपूर्ण देशांची माहिती
जगात अनेक देश आहेत. या प्रत्येक देशाची माहिती आपल्याकडे नसते. आपल्याला जर प्रत्येक देशाची सविस्तर माहिती लागणार असेल तर या पीडीएफ मध्ये आपल्या सोयीसाठी देण्यात आली आहे. या पीडीएफ चा उपयोग सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी व शालेय विध्यार्थ्यांना प्रोजेक्ट कार्य करण्यासाठी महत्वाचे ठरेल.
भारत किंवा भारतीय गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
'भारत नावाचा अर्थ ' भारत हे नाव कसे पडले याबद्धल मतभेद आढळतात. जैन अनुश्रुतिनुसार भगवान ॠषभदेवाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. त्यावरून भारत हे नाव पडले असे सांगण्यात येते. ॠग्वेदकालीन सिंधू प्रदेशातील सर्वश्रेष्ठ टोळी भरत होती. तिच्या नावावरून भारत हे नाव पडले असेल असेही समजण्यात येते. 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय.
भारतीय द्वीपकल्प अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराने वेढलेला आहे. हिंदी महासागरात तमिळनाडूच्या जवळ श्रीलंका हा शेजारी देश आहे. पश्चिम बंगाल ते त्रिपुरा पर्यंत घोड्यांच्या नाल्याच्या आकारात बांगलादेशास वेढलेले आहे. पूर्वेस म्यानमार आहे तर पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा चीनला भीडल्या आहे. सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यंच्यामधील प्रदेशात भूतान हा देश आहे. सिक्कीम व उत्तरांचल ह्या राज्यांच्या मध्ये नेपाळची सीमा उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांना लागते. उत्तरांचल पासून पुन्हा उत्तरेकडे लद्दाख पर्यंत चीनची सीमा आहे. काश्मीर मधील सियाचीन हिमनदीपासून ते गुजरात राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेकडे पाकिस्तानची सीमा आहे.
प्रशासनाच्या सोयीकरता राजकीयदृष्ट्या भारताचे २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश असे विभाग पाडण्यात आले आहेत.सर्व राज्ये आणि दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशांत निर्वाचित सरकारे आहेत; तर इतर केंद्रशासित प्रदेशांत केंद्र शासननियुक्त प्रशासनाद्वारे राज्यकारभार चालतो.
गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्रामधील मुंबई या शहराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेली एक कमानवजा इमारत आहे. एक मुख्य रुंद कमान आणि बाजूला चिकटून दोन कमी रुंदीच्या कमानी असे या बांधकामाचे स्वरूप आहे. अपोलो बंदराच्या (आता शिवाजी महाराज बंदर-गुजराथीत पालवा बंदर) भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे. भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली.
टिप्पण्या