G.K for all exam :today's update.
🔰 भिडेवाडा , पुणे : ०१/०१/१८४८
🔰 महारवाडा , पुणे : १५/०१/१८४८
🔰 हडपसर , पुणे : ०१/०९/१८४८
🔰 ओतूर , पुणे : ०५/१२/१८४८
🔰 सासवड , पुणे : २०/१२/१८४८
🔰 आल्हाटाचे घर , पुणे : ०१/०७/१८४९
🔰 नायगाव , सातारा : १५/०७/१८४९
🔰 शिरवळ , सातारा : १८/०७/१८४९
🔰 तळेगाव ढमढेरे , पुणे : ०१/०९/१८४९
🔰 शिरूर , पुणे : ०८/०९/१८४९
🔰 अंजीरवाडी , मजगाव : ०३/०३/१८५०
🔰 करंजे , सातारा : ०६:०३:१८५०
🔰 भिंगार : १९/०९/१९५०
🔰 मुंढवे , पुणे : ०१/१२/१८५०
🔰 चिपळूणकर वाडा , पुणे : ०३:०७:१८५१
🔰 नाना पेठ , पुणे : ०१/१२/१८५१
🔰 रास्ता पेठ , पुणे : १७/०९/१८५१
🔰 वेताळ पेठ , पुणे : १५/०३/१८५१ .
🔰लव्ह जिहाद विरोधात योगी सरकारने केला कायदा; अध्यादेशाला मंजुरी
🔶उत्तर प्रदेश कॅबिनेटने ‘लव्ह जिहाद’विरोधातील अध्याधेशास आज मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारीत केला गेला.
🔶अध्यादेशानुसार धर्मपरिवर्तन करण्यास जबरदस्ती करणाऱ्यास एक ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपये दंड असणार आहे. तसेच, अल्पवयीन व अनुसूचित जाती / जमातीमधील महिलांच्या धर्मांतरणासाठी तीन ते दहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड असणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
🔶तसेच, अनेकांचे जबरदस्ती धर्मांतरण केल्याप्रकरणी अध्यादेशात तीन ते दहा वर्षे कारावसाच्या शिक्षेसह ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीस धर्मांतरण करून विवाह करायचा असल्यास, त्याला दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी परवानगी घ्यावी लागणार आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.
🔶उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावलं उचलली आहेत. काही दिवसांअगोदरच या संदर्भात राज्याच्या गृहमंत्रालयाने कायदे व विधी विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला होता.
🔶लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा या अगोदरच दिलेला आहे.
🔶'अलाहाबाद न्यायालयानं निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे.
🔶सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशारा देत आहे, जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.”
🔴 पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय “TX2 पुरस्कार” मिळाला
✍उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आणि उत्तरप्रदेश वन विभागाने आंतरराष्ट्रीय किर्तीचा “TX2 पुरस्कार” जिंकला.
🔴 ठळक बाबी....
✍केवळ 4 वर्षांमध्ये वाघांची संख्या दुप्पट केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे.पिलीभीत व्याघ्र प्रकल्पात केवळ 4 वर्षांमध्ये 40 वाघांची वाढ झाली.पिलीभीत व्याघ्र प्रकल्प उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत आणि शाहजहांपूर या जिल्ह्यांमध्ये आहे.भारतात एकूण 13 व्याघ्र प्रकल्प आहेत.
🔴 “TX2 पुरस्कार” विषयी...
✍TX2 पुरस्काराची स्थापना 2010 साली झाली. हा एक वार्षिक पुरस्कार आहे.वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठणाऱ्याचा सन्मान करण्याच्या हेतूने या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
✍संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP), ग्लोबल टायगर फोरम (GTF), आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN), वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF), कन्झर्व्हेशन अश्यूअर्ड/टायगर स्टँडर्ड्स आणि लायन्स शेअर या संघटना पुरस्काराचे भागीदार आहेत.
🔰उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती
🔶केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.
🛑ठळक बाबी ...
🔶परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयाने “उमंग इंटरनॅशनल” अॅपमार्फत भारत सरकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत.ही आवृत्ती अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या निवडक देशांसाठी तयार करण्यात आली आहे.
🔶अॅपमार्फत भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, अनिवासी भारतीय, परदेशातले भारतीय पर्यटक यांना भारत सरकारच्या सेवांचा कोणत्याही वेळी लाभ घेता येणार.उमंग अॅपवर उपलब्ध असणाऱ्या भारतीय सांस्कृतिक सेवांमुळे भारताला जागतिक पातळीवर नेण्यास मदत होणार आणि परदेशी पर्यटकांमध्ये भारताला भेट देण्याविषयी आवड निर्माण होणार.
🛑उमंग अॅपविषयी...
🔶“उमंग” (UMANG - युनिफाईड मोबाईल अॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गवर्नन्स) मोबाईल अॅप हा भारत सरकारचा एकल, एकात्मिक, सुरक्षित, बहुविध, बहु-भाषी, बहु-सेवा मोबाईल अॅप (सुपर-अॅप) आहे. अॅपमार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागाच्या उच्च प्रभावित सेवा प्रदान केल्या जातात.
🔶उमंगची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) यांनी केली आहे. त्याचे लोकार्पण 23 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते.
🔶“उमंग” अॅपने तीन वर्षे पूर्ण केली असून 2000 पेक्षा अधिक सेवांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अॅपवर सध्या 2039 सेवा (88 केंद्रीय विभागाच्या 373 सेवा, 27 राज्यांच्या 101 विभागाच्या 487 सेवा आणि 1179 सेवा उपयोगिता बिल देयके) उपलब्ध आहेत आणि यात निरंतर वाढ होत आहे.
🔰डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, बायडेन यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण.
🔶अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.
🔶अमेरिकेतील निवडणुका होऊन तीन ते चार आठवडे उलटले असून डोनाल्ड ट्रम्प निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास वारंवार व्यक्त करत होते. निकाल आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे.
🔶निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही डोनाल्ड ट्रम्प अजिबात पराभव मान्य करत नव्हते. यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गही निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या हाती निराशाच आली. अशा परिस्थितीत अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत.
🔶डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला (General Service of Administration) सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा असं सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.
🔰 South Asian Association for Regional Cooperation 🔰
🤝 स्थापना : 8 December 1985
🏛 मुख्यालय : काठमांडू ( नेपाळ )
👥 दस्य देश : ८
📌 भारत 🇮🇳
📌 पाकिस्तान 🇵🇰
📌 अफगाणिस्तान 🇦🇫
📌 नेपाळ 🇳🇵
📌 बांगलादेश 🇧🇩
📌 श्रीलंका 🇱🇰
📌 मालदीव 🇲🇻
📌 भूतान 🇧🇹
🔰 सार्क राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची आकडेवारी 🔰
📌 लोकसंख्या : २१.३%
📌 सकल गृह उत्पन्न : १.३%
📌 निर्यात : ०.९%
📌 आयात : १.०%
📌 अन्नधान्याचे उत्पादन : ९.७%
📌 आंतरविभागीय व्यापार : ३.४%
🛑 कर्नाटक राज्यात 31 वा जिल्हा- विजयनगर
◆ कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने कर्नाटक राज्यात 31 वा जिल्हा तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
◆ विजयनगर हा नवा जिल्हा असणार आहे.
◆तो उत्तरेकडील बल्लारी जिल्ह्यातून वेगळा करण्यात येणार आहे.
🛑 मूत्रपिंड
🔰 माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो.
🔰 मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात.
🔰 उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते.
🔰 अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
🔰 दरम्यान, यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती.
🔰 अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती दिली. आपणास कळविताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे.
🔰 आज २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे, असे फैजल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Thanks for visit my blog !
टिप्पण्या