मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

GSEB HSC MARCH 2023 मराठी - उत्तरपत्रिका

   एच एस सी (HSC) बोर्ड परीक्षा मार्च- 2023 : गुजरात बोर्ड

उत्तरपत्रिका

दि: 24/03/2023                        विषय : मराठी (003)                          गुण : 100

      विभाग A{ गद्य आधारित }

*खालील प्रश्नांची हेतुलक्षी उत्तरे लिहा :                                                 04

1) पंथनिष्ठाच्या / चक्रधर स्वामी

2) रघुनाथ विनायक हेरवाडकर

3) महात्मा फुले

4) डॉ. बाळ फोंडके

*खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :                                        04

5) हिरड्या बेहड्याचा गुळाळा दिला.

6) लष्करातील एक उन्मत हत्ती सुटला व त्यांच्या डेऱ्याकडे चालत आला.

7) सटवा  तेल्याने  ‘अरे रोड्या तू हितंच तप घालत बस. आरं म्हातारा मरणाचं वझं घिऊन बाजारात हिंडतय.’ अशी वार्ता बापूला दिली.

8) सिसोदेवंशाचा

*खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा :  [कोणतेही तीन ]            04

9)            प्रस्तुत प्रश्न वर्षा अडालजा यांच्या ‘अंकुर’ या पाठातून घेतलेला असून त्यात हरिदास व शोभा यांच्या जीवन परिचयाची ते ओळख करून देतात. वृध्दांच्या समस्या  ते  या  पाठातून  आपल्याला पटवून देतात..हरिदास हे कसल्याश्या नोकरीवर असतात. त्यांना लव व कुश असे दोन मुले असतात.त्यांना  उच्च शिक्षणासाठी त्यांनी भरपूर खर्च केला. अशातच त्यांची नोकरीवरून निवृत्ती झाली व त्यांनी लव ला अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले.त्यासाठी खर्च होणार होता. म्हणून च हरीदासांनी लवच्या शिक्षणासाठी आपले भरुचचे घर विकून टाकले.

10)            प्रस्तुत प्रश्न द.मा.मिरासदार यांच्या ‘निद्रादेवीची आराधना’ या पाठातून घेण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या झोपेच्या विविध तऱ्हांचे वर्णन केलेले आहे.एकदा लेखक मित्राबरोबर पोहायला जातो. व मित्राच्या घरीच झोपला. झोपतांना मित्रा ला चार-साडेचारला उठवायला सांगितले. वडील येण्याच्या अगोदर मला घरी जायला पाहिजे. तेव्हा  मित्राने  होकार दिला. मित्राने लेखकाला वेळेवर उठवण्याचा प्रयत्नही केला.हाका मारल्या,गदागदा हलविले, पण लेखक जागे झाले नाहीत. मग त्याने कागदाची सुरळी करून लेखकाच्या पायाच्या बोटांच्या फटीत अडकवली. आणि काडी ओढून  ती  सरळ  पेटवून दिली. सुरळी पेटली. जळत जळत बोटाला चांगला जोरदार चटका बसला.तेव्हा लेखकाला जाग आली.पायाच्या बोटातून नुसता धुरच निघतांना दिसला.तेव्हा फार घबराहट झाली. आपला  पाय  एकाएकी  कशाने  पेटला  हे काही क्षणा पर्यंत कळलेच नाही.अशा प्रकारे लेखकाला झोपेतून उठवण्यासाठी त्याच्या मित्राने अघोरी उपाय केला.

*खालील कोणत्याही दोन प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा :                           08

11)            प्रस्तुत प्रश्न साधना आमटे यांच्या ‘आमचे आनंदवन’ या पाठातून घेण्यात आला आहे. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हे आश्रम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावापासून तीन किमी. अंतरावर वसलेले आहे. येथे  दाट झाडी आणि पूर्णतः जंगल परिसर असल्यामुळे  येथे  विविध ऋतूत  विविध  अनुभव  येत असत. येथील वातावरण प्रत्येक ऋतूत एक वेगळाच सुखद अनुभव देत असे. त्यातीलच बाबांचे पावसाळा या ऋतूवर विशेष प्रेम होते.

              त्या काळी विदर्भात चांगला पाऊस पडायचा.अलीकडे हे प्रमाण कमी कमी झाले आहे.परंतु तेव्हा चंद्रपूर,भंडारा नागपूर या जिल्यात भरपूर भात पिकायचा. पावसाळा  एक  मोठे  संकट  घेऊन  आमच्यासमोर उभे करायचा. बिळांत पाणी घुसल्यामुळे मोठमोठे उंदीर घराचा आसरा घ्यायचे.  व  त्यांच्या  मागावर  साप  यायचे. पाण्याने  साचलेल्या  डबक्यांतून  बेडकांचा आवाज व मच्छरांचे थवेच्या थवे असायचे. कमी  गळणारा  कोपरा  पाहून  पलंग सरकविले जायचे. एवढ सर्व असून सुध्दा बाबांचे या ऋतूवर विलक्षण प्रेम असायचे,आणि अजूनही आहे.  ते म्हणत की, निसर्गशक्तीचे तांडव याच ऋतूत अनुभवता येते.विजांचे लोळ आकाशा तून धरेवर उतरायला लागले की,बाबा मला घेऊन फिरायला बाहेर पडत असत. झोपडी पासून काही अंतरावर एक छोटेसे तळे होते. पावसाळ्यात ते तुडूंब भरत असे. त्याच्या  काठावर  पाण्यात पाय टाकून बसलेला एक मोठा वटवृक्ष होता. या तळ्याकाठच्या पाय वाटेवरून आम्ही बऱ्याच वेळा जात असू.

           अशा प्रकारे बाबांना धाडसाचे जास्त आकर्षण असल्यामुळे त्यांना नेहमी पावसाळा ऋतू जास्त आवडायचा.असे लेखिका सांगते

12)             प्रस्तुत प्रश्न वासंती मुझुमदार यांच्या ‘हादगा’ या पाठातून घेण्यात आलेला आहे. या पाठात लेखिका अश्विन महिन्यातील नवरात्रीच्या  वेळी  येणाऱ्या भोंडला  हादगा  उर्फ  भुलाईच्या  सोहळ्याविषयी  लेखन करतात.भारतातील सणवार कसे संस्कृतीशी निगडीत आहेत. व त्यांचा काळानुसार कसा नामशेष होत आहे  हे  लेखिका येथे पटवून देते.पूर्वीच्या भारती य समाजाने निसर्गाशी किती जवळीक साधली होती हे समजते. हादग्याचा सण व त्यातील विविधता लेखिका येथे चित्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.

            झकुळीचा  हादगा  दोन  दिवसांचा  असायचा. तसा  हादगा  म्हटला म्हणजे नऊ दिवसांचा पण; झकुळीकडे नवरात्रीच्या पहिल्या  दिवशी  आणि  शेवटच्या  दिवशी  हा  हादगा  असे. मग  बाकी  दिवस हा हादगा झोपा काढतो की काय असे वाटायचे. लेखिकेने तर  या हादग्याला मनातल्या मनात एक नावही देवून टाकले होते. ते म्हणजे ‘आळशी हादगा’. झकुळी नवरात्रीच्या शेवट च्या दिवशी भातुकलीही उरकवून घेई. पहिल्या दिवशीची खिरापत केल्याचे तुकडे आणि शेवटच्या दिवशी साखरफुटाणे असायचे. असल्या  खिरापातीमुळे  की  काय जास्त  मुली  झकुळीच्या  हादग्याकडे फिरकत नसत. झकुळीकडच्या भातुकलीला सुध्दा तिची भावजयीनं उप्पीट केलेलं असायचं. ‘रोज रोज कोण खिरापत करणार?  बस  की आता कवतिक.’असं म्हणत तिची भावजयी रडत खडत  ते  उप्पीट  करायची. भातुकलीला  देखील  पाच-सात  जणीच  नाचायला  येत असत.अंधाऱ्या सोफ्यावर मध्ये झोपाळा व त्याच्या एका बाजूला एवढ्या जणींचा फेर  सहज  मावत  असे. पण  एवढ्या  कमीत  कमी  मुलीत नाचायला उल्हास वाटत नसे. झकुळीच्या ते लक्षात यायचे.व तिचा चेहरा उतरायचा. तिची पांढरट गोरी मुद्रा आणखीनच फिकी पडायची.झकुळीला आई-वडील  नव्हते. झकुळीकडे  सर्वांसारखा  हत्तीचा  कागद नसायचा. एका पाटावर नदीतले वाळूचे खडे मांडून त्यालाच ती ‘हादगादेव’ म्हणून पूजा करायची. त्यांच्या घरी तशी रीतच होती. अशा प्रकारे झकुळीकडचा हादगा सर्वांपेक्षा वेगळा असायचा.तसंच तिच्या वहिनीने तसे बजावले होते की,मुलींनी खिरापत नाही  ओळखली  तर  त्यांना ती द्यायची नाही. पण, तिला तशी  खिरापत बनवताच यायची नाही. जसं आहे त्यात झकुळी आपला आनंद करत असे. असे लेखिका सांगते.

                                  विभाग B   { गद्य आधारित }

*खालील प्रश्नांची हेतुलक्षी उत्तरे लिहा :                                                 04

13) संत तुकाराम महाराज

14) रामजोशी

15) कवी यशवंत / यशवंत दिनकर पेंढरकर

16) वाळूचा प्रियकर

*खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :                                         04

17) विठ्ठलाला

18) वैराची

19) आठवणींच्या कळ्या आणि अश्रूंची भिनलेली त्या कळ्यांची पाने.

20) पंच महाभूतांचे विराट,विक्राळ स्वरूप पहिले आहे.आणि हे पाहून माणूस अधिक व्यथित व व्याकूळ होत होता.

*खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा :  [कोणतेही तीन ]            04

21)              प्रस्तुत प्रश्न संत जनाबाई यांच्या अभंगातून घेतलेला असून त्यातून त्यांची विठ्ठलाशी असलेली एकरूपता दिसून येते. ते विठ्ठलाला मंदिरात बोलवत आहेत. त्यांनी  विठ्ठलाच्या  स्वागतासाठी  गुलालाची  रांगोळी  घातली  आहे.  तसेच  पुष्पांची  शेज तयार केलेली आहे. विठ्ठलाच्या स्वागतासाठी त्यांनी अर्धरात्री पर्यंत समया तेवत ठेवल्या आहेत.गळ्यामध्ये मोत्यांची माळ गळ्यात  मोत्यांची माळ घातली आहे. व जनाबाई आतुरतेने विठ्ठलाची मंदिरात वाट पाहत आहे.

22)          प्रस्तुत प्रश्न ‘बिरसा मुंडा’ या भुजंग मेश्रामांच्या कवितेतून घेण्यात आलेला आहे. कवी कवितेच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीची ओळख पक्की  ठेवत आदिवासी उपेक्षित अस्मितेला वाचा  देत बंडाची हाक देण्यासाठी बिरसा मुंडाला आवाहन करीत आहे. कवी म्हणतो, मी  कधी  कधी  जेव्हा  आश्रमशाळांमध्ये  जातो; तेव्हा मुले विचारतात, ‘काका बिरसा मुंडा कुठे राहतो?’ मला त्यांच्या स्वप्नाळू भाषेत उत्तर सांगता येत नाही. त्यामुळे  मी  एक  बयान  टाळणारा  त्यांच्या न्यायालयातील आरोपी होतो.

*खालील कोणत्याही दोन प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा :                           08

23)            प्रस्तुत प्रश्न ‘दमयंती-स्वयंवर’ या रघुनाथ पंडितांच्या आख्यान काव्यातून घेतलेला आहे. या काव्यात नलराजा व राजहंस यांच्यातील संवाद आलेला आहे. त्यात  नलराजाने  एका  राजहंसाला  पकडल्यावर  त्या  हंसाने  नलराजाला सांगितलेल्या आदर्श राजांच्या लक्षणांची चर्चा आली आहे. राजा आपल्याला सोडणार  नाही  याची  जाणीव  झाल्यावर  राजहंस त्या नलराजाला सांगू लागला की,हे राजा तुझ्या घरी आलेल्या हंसाची तू जर हिंसा करून तुझ्या हाताची धन्यता मनात असशील.तर हा तुझ्याच दरबारात झालेला पक्षपात आहे.

           हे नलराजा तुझ्या पदोपदी वीरता भरली आहे. तुझ्याकडे खूप मोठी युध्दशक्ती आहे. तरी तू तुझ्या घरी आलेल्या निरपराध हंसाची हिंसा करत आहे.  ती  तुला  सुचलेली बुध्दी खोटी आहे. माझी कनकरूप काया पाहून तर तू माझे कौतुक करायला पाहिजे होते.पण तुला मला पकडण्याची दुर्बुध्दी कशी सुचली? तू थोर, कृपाळू आहेस. तू  मोठा दयावान राजा आहेस. तेव्हा तू मला सोडून दे. माझ्या घरी माझी आई म्हातारी आहे. तिला उडताही येत नाही. माझी पत्नी तर सातां दिवसांची नवप्रसव (बाळंतीण) आहे.त्यांना मी संकटात सोडून येथे आलो आहे. आणि  मी  तर  तुझ्या  हातात  सापडलो आहे. आता  मी काय करावे? काहीच  सुचत नाही. हे  राजा मी तुझ्या पायांवर माथा ठेवतो.आता तरी मला सोडून दे. कारण माझी व माझ्या कुटुंबाची स्थिती खूप विकल होऊन जाईल.

          अशा प्रकारे राजहंस नलराजाच्या हातातून सुटका करून घेण्यासाठी आपल्या करूण वाणीत आपली परिस्थिती व आदर्श राजाचे गुण सांगत आहे.

24)          प्रस्तुत प्रश्न सतीश काळसेकर यांच्या ‘...असं तर व्हायला नको होतं’ या कवितेतून घेण्यात आलेला आहे.कवी कवितेतून आपली इच्छा नसतांनाही आपल्या हातून कशा अनेक गोष्टी घडतात. व आपले आयुष्य नको असतांना कसे वळण घेते. याविषयी खंत व्यक्त करतो. कवीला आयुष्यात बरेच काही इतरांहून वेगळे करायचे असते. परंतु तो आयुष्याच्या भोवताल कसा वाहवत जातो हे कवी येथे सांगतो.

           कवी म्हणतो  आयुष्याला  भरजरी  वस्त्रे घालून मी नको त्याला झाकायला शिकलो आणि वेगवेगळे मुखवटे धारण केले. परंतु या चेहऱ्यामागचा खरा चेहरा मात्र हरवतच गेला. मला  गुपित मनात काही ठेवून बोलायचे नव्हते. कुणाशी कुठल्याही शब्दावर क्षणभर थांबायचे नव्हते.सगळं आयुष्यातल्या बऱ्यावाईटाचं हलाहल पचवून पूर्ण आभाळभर पसराय च होतं.आयुष्यात आपल्याला कोणतीच विरामचिन्हे नको होती.  कारण  सरळ  ध्येयाकडे  मला  प्रवास  करायचा  होता. परंतु  नको असलेली घरंगळ आयुष्यात आलीच. मला कोणालाही कमी जास्त लेखायचं नव्हतं. अगदी लहान  मुलांसारखं मला वावरायचं होतं.पण कुठून कुठपर्यंत आलो हे कळलेच नाही.  आयुष्यात  आपल्या भोवती  अंधार  आवळत  जाणाऱ्या  भिंतीही नको होत्या. म्हणून विशाल खिडक्या निर्माण केल्या. परंतु त्यावरही  साठीषण्मासी पडद्यांच्या कानाती  वाढतच  गेल्या. आयुष्याभोवती नकळत एक गुढतेचं वलय निर्माण होत गेले, जे निर्माण व्हायला नको होतं.

                म्हणून आयुष्यात आपली पाळंमुळं कधीही विस्कटू देऊ नका.आयुष्यभर एकमेकांच्या सहवासात राहा.सोन्या सारख्या मानवी संबंधाचा ऱ्हास होऊ देऊ नका. आपसातले  अमानुष  व्यवहार  बंद  करून  सगळ्या  जीवशिवाच्या  नातेसबंधात उगवलेलं आर्थिक संबंधाचं तण निबर होण्याआधी कमी करा. परस्परांच्या  स्पर्शातून  आतील  संवेदनांना  बहर आणा. परस्परांच्या सावलीत राहून मानवी मनं स्वतंत्र करा.

         अशा  प्रकारे  आपली  शरीरं  मर्त्य  होण्याअगोदर  ते सजीव करण्याचा प्रयत्न करा. शरीराला निमित्तमात्र करून अध्यात्मिक मार्गाकडे  वळा. उगाच  शरीरांतच  गुंतून  राहून  विटा  जमवण्यातच आयुष्य घालू नका.एक माणुसकीचं वलय आपल्या आयुष्या भोवती निर्माण करावं असे कवी म्हणतो.

                                     विभाग C { व्याकरण }

*खालील पदांचा क्रम योग्य रीतीने लावून वाक्य पुन्हा लिहा :                  02

25) आम्हाला कितीतरी जातींचे बीपण दिलं पेरायला इथे.

26) परमेश्वराच्या ठिकाणी अनेकविध शक्ती आहेत. ( प्रश्नात विश्व शब्द येत नाही विध येतो)

*खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या लावून पुन्हा लिहा :                       02

27) तलवार  =  खड् ग  =  समशेर

28) अडचण  =  विपत्ती   = संकट

29) परिस्थिती   =  अवस्था  =  दशा

30) काळोख  =  अंधकार  =  अंधार ( प्रश्नात काळोख शब्द चुकीचा दिला आहे )

*खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावून पुन्हा लिहा :                        02

31) सद् गुण  - निर्गुण

32) आदर  - अनादर

33) सुसंगती  - कुसंगती

34) सुलभ  - दुर्लभ

*खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :                                          02

35) पतिव्रत्य

36) जगतनियंता / परमेश्वर

37) मुसळ

38) प्रेषित 

*खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास प्रकार लिहा :                01

39) निळे असे गगन   -  कर्मधारय समास

*कंसातील सूचनांच्या अनुसार वाक्य रुपांतर करा :                                  01

40) अर्थशून्य रूढी आता मोडून काढायला नकोत कां ?

*कंसातील सूचनानुसार वाक्य संश्लेषण करा :                                       01

41) ती मुलगी देखणी आहे ,पण कष्टाने तिचा चेहरा सुकला आहे.

*खालील अलंकाराची व्याख्या लिहून उदाहरण द्या :                               01

42) कवितेच्या  चरणांच्या  शेवटी, मध्ये, किंवा ठराविक ठिकाणी जी अक्षरे आली असतील, तसेच दुसऱ्या चरणाच्या शेवटी, मध्ये, किंवा ठराविक ठिकाणी ठराविक क्रमाने आली असल्यास यमक अलंकार होतो.

उदा. १)आला वसंत कविकोकिल हाही आला |

         आलापितो सुचवितो अरुणोदयाला ||

       २)जाणावा तो ज्ञानी | पूर्ण समाधानी |

          निःसंदेह मनी | सर्वकाळ ||

       ३)सुसंगत सदा घडो | सृजन वाक्य कानी पडो |

          कलंक मतीचा झडो | विषय सर्वथा न आवडो ||

       ४)रूप पाहता लोचनी | सुख झाले हो साजणी ||

( यापैकी एक )

*खालील वृत्ताचे उदाहरण देवून गण पाडा :                                           01

43) लहान  अभंगामध्ये  दोन  चरण असतात. प्रत्येक  चरणात सामान्यपणे आठ अक्षरे असतात. काही वेळा पहिल्या  चरणात  सहा किंवा सात अक्षरे असतात. दुसऱ्या चरणात  कधी  नऊ  तर  दहा अक्षरे असतात. एकनाथ व तुकाराम यांचे अभंग या प्रकारचे आहेत.

         उदा.      १) पतित तू पावना, म्हणविसी नारायण ||१||

                       तरि सांभाळी वचन, ब्रीद म्हणविसी जाण ||२||    

                                                               - संत कान्होपात्रा

                     २)मुखे बोले ब्रम्हज्ञान, मनी धन अभिमान ||१||

                        एसियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा ||२||  

                     ३)रूप पाहता लोचनी ,सुख झाले वो साजणी ||१||

                        तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा ||२||     - संत ज्ञानेश्वर

[ प्रश्न चुकीचा आहे . ]

*खालील वाक्यातील प्रयोग ओळखा :                                                 01

44) भाव कर्तरी प्रयोग / भावे प्रयोग

*खालील अशुध्द शब्द शुध्द करून लिहा :                                            01

45) आत्मरूप

46) कल्पवृक्ष

*खालील ग्रामीण शब्दांचा प्रचलित मराठी शब्द लिहा :                           01

47) म्हणजे

48) सगळीकडे

*खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा :                                                     01

49) काना डोळा करणे : दुर्लक्ष करणे.

      वाक्य : आमच्या बाई आमच्या शाळेतल्या अनुपस्थितीकडे नेहमी काना डोळा करत असत.

50) मनात दाटून येणे : खूप रडू येणे.

     वाक्य : झकुळीचा फिका पडलेला चेहरा पहिला की माझे मन दाटून येई.

*खालील म्हणींचा अर्थ लिहा :                                                           01

51) कष्ट करणाऱ्याला यश आणि संपत्ती मिळतेच.

*खालील शब्दांतील अर्थभेद लिहा :                                                    01

52) धन  = संपत्ती      घन  = मेघ, ढग

*खालील वाक्यात विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा :             01

53 )तिनं भाजीवाल्याला विचारलं, “गोड आहे ना रे बाबा ?”

                                    विभाग D [ आकलन ]      

*खालील कविता वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा :        05

54) मिकी माउस संवेदनशील असतो. त्याच्या प्रत्येक हालचालीवर कळत नकळत अनेक गोष्टी घडत असतात. एक वस्तू जणू सतत त्याच्या मार्गावर असते.म्हणून इकडून तिकडे, तिकडून इकडे,  खालून वर आणि वरून खाली त्याला सतत धावावे लागते.

55) मिकी माउस ला असलेले डोळे स्वप्न पाहणाऱ्या कवी प्रमाणे असतात. जगण्याविषयीचे ओतप्रोत प्रेम त्यात भासते. हे डोळे कधी उदास नसतात. थकलेले नसतात. ते नेहमी हसरे असतात. ते डोळे लहान अर्भकांसारखे झोपत, गुप्त पोलीसासारखे संकटाच्या मार्गावर असत. उंदराला डोळे असण्यापेक्षा त्या डोळ्यांनाच जणू एक उंदीर आहे असे ते डोळ्यांत भरत आणि बोलत असतात.

56) मिकी माउस चे कान सदा उभे असत. उंच रेडिओच्या एरियल सारखे तेज. कितीही लांबचे संकट त्या कानांना नेमके एकू येते. त्याची ती लांब शेपटी संकटाची वर्दी मिळताच ताठ होऊन जणू स्वतःचा विचार करी. गडबडीने पुढचे धोरण ठरविते.

57) वाँल्ट डिस्नेच्या रुपेरी पडद्यावरच्या उंदराला पाहत लेखक लहानाचा मोठा झाला आहे.

58) निरुपद्रवी उंदीर, स्वप्न पाहणारा उंदीर इ.

*खालील गद्य उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :                         05

59) अजिंक्य जनता विजयाचा ध्वज उंच धरायला सांगत / ललकारत आहे.

60) कवी संघटनेचा मंत्र जपायला सांगत आहे.

61) सगळे जवान / सैनिक भाग्यवान आहेत. त्यांनी देशासाठी रणांगणात हसत हसत युध्द केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरण हि जिंकले. व या मातृभूमीचा मान राखला .

62) सैनिकांच्या, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाची गाणी इतिहासाच्या पानोपानी घुमतील असे कवी सांगत आहे.

63) अजिक्य भारत, मातृभूचा पराक्रम इ.

*खालील उताऱ्याचे १/३ [ एक तृतीयांश ] सारांश लेखन करा:                   05 

64)                        ललित लेखनाची / लेखकाची वैशिष्ट्ये

               ललित लेखकाने विविध तह्रेची माणसे, स्थळे पहिली पाहिजेत व वाईट अनुभव संग्रहित करावेत. ललित लेखकाचे अवलोकनाचे क्षेत्र व्यापक असायला हवे. कृतीत विविधता व अनुभवत वेगळेपण असायला हवे. व्यक्ती, प्रसंग, अनुभव यांचा संग्रह असावा.  लेखकाच्या कल्पनेची झेप वाघासारखी पल्लेदार असावी.

*खालील परिच्छेद कालक्रमानुसार लावून पुन्हा लिहा:                             05

65) शोभा निघून गेली. गळ्याला मफलर गुंडाळून, काठी घेऊन ते बाहेर आले, पण एक तर पाय दुखत होता आणि एकटयाला करमेना. परत खोलीत येऊन पलंगावर बसले. आभाळ आल्यासारखं खोलीत अंधारल्यासारखं वाटत होतं. उठून खिडकी उघडावीशी वाटली, पण कालचा बी पेरण्यावरून झालेला प्रसंग आठवला आणि मन कडवट झालं.

                                          विभाग E [ लेखन ]

66)तुमच्या शाळेत आयोजित केलेल्या ‘विज्ञान दिन’ या विषयी अहवाल लेखन करा :                                                                                            05

                    अहवाल लेखन नियमानुसार मार्क मिळतील.

67)खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे १०० शब्दात गोष्ट तयार करा व योग्य शीर्षक द्या:                                                                                     05

शीर्षक :  ससा आणि कासव

               एका रानात ससा व कासव हे दोन्ही मित्र राहत असत. एकदा दोघीजणी सोबत खेळत होते. खेळता-खेळता ससा कासवाच्या संथ वेगाचा उपहास करू लागला. सशाला त्याच्या वेगावर गर्व झाला व तो हळूवार गतीने चालणाऱ्या कासवाची खिल्ली उडवू लागला. कासव शांतपणे त्याला म्हणाले, "मी हळुवार चालतो तर काय झालं, जर आपल्या दोघांमध्ये धावण्याची शर्यत लागली तर मी तुला हरवू शकतो." कासवाचे हे बोलणे ऐकून सशाला आश्चर्य वाटले. व तो त्याला म्हणाला, "काय विनोद करतोय.""विनोद नाही, मी गंभीर आहे. आणि मी खरोखर तुला हरवू शकतो" कासव म्हणाले. कासवाचे बोलणे ऐकून ससा हसत म्हणाला, "चल मग होऊन जाये दौड."धावण्याच्या शर्यतीचा मार्ग निश्चित करण्यात आला. जेव्हा जंगलातील दुसऱ्या प्राणी मित्रांना या शर्यती बद्दल कळाले, तेव्हा ते सर्वजण ही दौड पाहण्यासाठी एकत्रित झाले. दुसऱ्यादिवशी सकाळी सर्वजण जमले. नदीच्या किनार्‍यावर असलेल्या एका पर्वताला शर्यतीचे शेवटचे टोक निश्चित करण्यात आले व सांगण्यात आले की जो सर्वात आधी पर्वतावर पोहचेल तो विजयी होईल. दोघीजणी शर्यतीच्या रेषेवर उभे राहिले. एक, दोन, तीन बोलून शर्यत सुरू झाली. डोळ्याची पापणी पडेल तेवढ्यात ससा तेथून पळाला. कासव मात्र हळू हळू एक एक पाऊल टाकू लागले. जवळपास अर्ध्या पेक्षा जास्त अंतर पार केल्यावर सशाने मागे वळून पाहिले. पाहतो तर काय कासव दूरदूरपर्यंत दिसत नव्हते. इतक्यात त्याला नदीच्या बाजूला उगलेले हिरवे टवटवीत गवत आणि गाजरे दिसली. सशाने गवत आणि गाजरावर ताव मारला. पोटभर खाल्ल्यानंतर त्याने नदीतील थंडगार पाणी पिले. त्याने विचार केला की कासव तर अजून फार दूर आहे. मी या झाडाखाली थोडा वेळ आराम करतो जसे कासव जवळ येईल, तसा मी वेगाने पळत जाऊन शर्यत जिंकून घेईल. नदीवरून वाहणारा थंडगार वारा आणि झाडाच्या सावलीखाली सशाला गाढ झोप लागली. तो जोरजोरात घोरायला लागला. इकडे दुसरीकडे कासव संथ गतीने का होईना परंतु न थांबता चालत होते. ससा खूप वेळ झोपलेला राहिला.जेव्हा सशाला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. हळू हळू अंधार पडू लागले होते. त्याला शर्यतीची आठवण झाली आणि तो तुफान वेगाने पर्वताकडे पळत सुटला. परंतु पर्वतावर पोहचून पाहतो तर काय कासव आधीपासूनच तेथे उपस्थित होते. ससा शर्यत हरला होता. त्याला आपली चूक लक्षात आली व तो आपला मित्र कासवाची क्षमा मागत म्हणाला, "मित्रा मला माझ्या वेगाचा अभिमान झाला होता, आणि म्हणून मी तुला तुच्छ समजायला लागलो होतो. परंतु आता माझी चूक मला लक्षात आली आहे. तू न थांबता आपल्या ध्येयाकडे चालत राहीला आणि म्हणून तो विजयी देखील झालास. या जगात जो थांबला तो संपला म्हणून हळुवार का होईना  आपल्य मार्गाच्या दिशेने पाऊल टाकत राहायला हवेत.

बोध : आपल्या क्षमतेचा अभिमान बाळगू नये.

         यश प्राप्तीसाठी न थांबता निरंतर प्रयत्न करीत रहा.

किंवा

67)खालील कल्पनेचा विस्तार करा :

विद्या हे महाधन आहे

           विद्या असे धन आहे, ज्याचा उपयोग आयुष्यभर केला जाऊ शकतो.आपल्याला हवे तितके ज्ञान आपण मिळवू शकतो, कोणत्याही वयात शिक्षण घेता येते. विद्या प्राप्त करण्यासाठी कोणतीही मर्यादा नसते. विद्येने आपल्याला चांगल्या व वाईट गोष्टीत फरक करता येते. आपण चांगली मानवीय मूल्ये शिकतो. समाजात कसे वावरायला हवे हे आपल्याला विद्येमुळे कळते.आपण प्राप्त केलेल्या विद्येने आपल्याला कठीण परिस्थितींमध्ये मार्ग शोधता येतो. विद्या आपल्याला समाजात मान मिळवून देते. एका ज्ञानी व्यक्तीला एका श्रीमंत व्यक्तीपेक्षा समाजात जास्त आदर मिळतो. विद्येमुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढते,भविष्यातील पुढील वाटचालीसाठी आपण तयार होतो.आपला आत्मविश्वास वाढतो, आपण आत्मनिर्भर बनतो.विद्येमुळे आपली सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ति वाढते.विद्येमुळेच आपण जीवनात यश मिळू शकते.

           विद्या या धनाची आपल्याला रक्षण करण्याची गरज नसते. याउलट विद्या हीच आपले रक्षण करते. सर्व महा विभूतींनी देखील आपल्याला विद्या धनाची ख्याती आपल्याला पटवून दिली आहे.

खरंच, विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे.

68)खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर २५० शब्दात निबंध लिहा :      10

             निबंधात आपले लेखन, भाषा सज्जता, भाषेची मांडणी विरामचिन्हांचा वापर योग्य परिच्छेद अक्षर मुद्देसूदपणा, सुरुवात व योग्य समारोप शीर्षक या मुद्याना अनुसरून मार्क मिळतील.

******

प्रश्नपत्रिकेत काही चुका आहेत त्या अशा :

  • मार्च २०१९ च्या स्वरूप प्रमाणे पेपर येईल असे स्वरूप सांगितले गेले होते. त्यामुळे सविस्तर ला एक जास्तीचा प्रश्न द्यायला हवा होता. 
  • प्रश्नाची भाषा पुस्तकी भाषा पेक्षा वेगळी असल्यामुळे काही प्रश्न विद्यार्थ्याला समजले नाहीत.
  • समानार्थी शब्दात काळोख हा शब्द कालोख असा झाला आहे.
  • विरुद्धार्थी शब्दात जोड्या लावा असा प्रश्न विचारला आणि पर्यायच दिले नाहीत. स्वरूप नुसार ते आवश्यक ही होते.
  • शब्दसमूह मध्ये शब्दार्थातून काही स्पष्टीकरणे घेतले आहेत.
  • प्रश्न ४१ च्या सुचने मध्ये वाक्य संश्लेषण करा असा प्रश्न हवा होता तेथे पुन्हा वाक्य परिवर्तन करा असा प्रश्न पुन्हा दिला गेला .
  • प्रश्न ४३ च्या सूचनेत लहान अभंग हा पारंपारिक वृत्ताचा प्रकार आहे. त्याचे गण पडत नाहीत . तेथे लक्षण विचारले पाहिजे होते.
  • आकलन विभागात प्रश्न एक मार्क साठी असतो. म्हणून एक मार्कला जेवढे उत्तर अपेक्षित असते तेवढे अथवा त्यास्वरूपाचे प्रश्न हवे होते. 
             पेपर काढणाऱ्या शिक्षकांना व परीक्षा परिषदेला विनंती आहे की, पेपर चे स्वरूप लक्षात घेवून पेपर काढावा. अथवा काही बदल असल्यास विद्यार्थ्यांना तसे कळवले पाहिजे. पेपर मध्ये ऐनवेळी जो बदल केला गेला व ज्या चुका झाल्या आहेत त्या लक्षात घेवूनच विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा ही विनंती.


                 वरील उत्तरपत्रिका मध्ये काही बदल /अनवधानाने काही चुका  असल्यास कमेंट्स करून अवश्य कळवावे.

Share to all !

Thank You !

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा