डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आमचा संदेश
14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.
जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरी करून काय मिळवतो ?
मित्रहो, माझा हा प्रश्न वाचून कित्येकांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली असेल. परंतु माझा हा प्रश्न वाचून जरा विचार केला ना तर आपण महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या त्यांच्या अंगी असलेल्या अथवा त्यांनी सांगितलेल्या सत्मार्गाचा उजेड करण्यासाठी असतात. त्यांनी दिलेल्या विचारांची समाजात रुज्व्णूक करून नवीन सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी असतात. त्यांनी लिहून ठेवलेले विचार वाचून ते आचरणात आणायचे असतात. पण आम्ही केले काय ? वाचणं सोडून नाचण्यावर भर दिला. भलतीच गाणी लावून महापुरुषांच्या विचारांची विटंबना केली. काहींनी वाचले तर त्याचा खरा अर्थ लक्षात न घेता भलताच अर्थ डोक्यात भरला. जिथे संघटीत व्हायला सांगितले तिथे असंघटीत होऊन एकमेकांचा तिरस्कार करू लागले. हे समाज विघातक आहे हे आमच्या डोक्यात कधी येईल. आम्ही नाचणं सोडून वाचणं कधी चालू करू ? बाबासाहेबांसारखा विचारवंत महापुरुष या जगी पुन्हा जन्माला यावे असे जर वाटत असेल तर त्यांच्या विचारांची रुजवणूक आपल्या मुलांत व आपल्यांत प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांची पायमल्ली न होऊ देता ते अंगीकारायला शिकले पाहिजे. त्यांनी कधी कोणाशी भांडायला शिकवले नाही. कोत्याही धर्माचा वा जातीचा तिरस्कार केला नाही. मानव कल्याणासाठी पूर्ण आयुष्य झटले. माणुसकीचा रस्ता त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यावर चालायला सांगितले. काळोखाच्या ओझ्याखाली जगणार्यांना उजेडाचा रस्ता दाखवला, बुडणार्यांना मदतीचा हात देवून पैलतीराला नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे व त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालून आपली नौका पैलतीराला नेणे हे आपल्या हाती आहे. अन्यथा आपणच आपला घात करून घेणार व पुढील पिढीच्या उन्नातीलाही काळिमा फसणार यात शंका नाही. हि भावी पिढी देखील याचा दोष तुमच्याच माथी लोटणार आहे. म्हणून योग्य वेळी नीट समज देवून एकसंघ समाज घडवण्यासाठी पुढे आले पाहिजे.
बाबासाहेबांनी आपल्यासाठी दिलेला संदेश :
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय कायदेतज्ञ व स्वतंत्र भारताच्या राज्यभटनेचे शिल्पकार होय त्यांनी भारतात अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष सुरू करून दलित व मागासलेल्या लोकांचे आत्मभान जागृत करीत मानवी हा विषयीची, माणूसकीच्या मूल्यांविषयीची जाणीव सजग करीत एक सर्वव्यापी मानवतेसाठी लढा सुरू केला. त्यांनी 'मूकनायक' 'बहिष्कृत भारत' या सारख्या वृत्तपत्रातून दलित समाजाला नवी दिशा दाखवली. चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह सारख्या सत्याग्रहांतून दलित समाजाला त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली. डॉ. बबासाहेब आंबेडकरांनी इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र कायदा इ. विविध विषयावर इंग्रजी मराठी भाषेतून विपूल लेखन केले. 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मरणोत्तर देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित व इतर मागासलेल्या समाजाला जागृत केले. त्यांच्या मते शिक्षण है समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते व आपल्या आत्मविकासाचा तोच एक सन्माननीय मार्ग आहे हा विचार ते सतत आपल्या बांधवांच्या मनात विवचितात.
हे चहिष्कृत तरुण भारता, तू जर मनावर घेऊन हा आमचा संदेश ऐकशील, तर या अवनतीच्या पुरातून तू तरला जाशील; नाहीतर यातच तुझा अंत आहे. म्हणून जे कोणी समर्थ असतील त्यांनी पुढे होऊन बुडत असतील, त्यांना हात देऊन वरती काढून या उन्नतीच्या पैलतीरासनेतील तरी या विटाळरूपी डोहात बुडणान्यानों, तुम्ही आपल्या जुन्या रूढी च्या मगरमिठीतून निसटून आपणच आपला मार्ग सुधारा, नाही तर आपले हाल होतील. जे झाले ते गेले जे होणार ते जाणार म्हणून आज जिवंत असलेले तुम्ही चाललेली घडी वाया जाऊ न देता पुढे या आणि आपल्या ज्ञातबांधवास हात द्या व आपल्या बरोबरीने पुढे आणून जगामध्ये आपले नाव करून दाखवा. ज्याप्रमाणे अंधारातून उजेड, अशुभातून शुभ व निराशेतून दैवी आशा फुटते, तद्वतच आपल्या या अज्ञान समाजातून सज्ञान, अशक्ततांतून सशक्त बनून, प्रकाशमान दिवे होऊन आपापल्या ज्ञातबंधूस खरे मार्गदर्शक व्हा. आणि त्यास समाजातील, या जगातील खऱ्या आनंदाचा परामर्श देऊन त्या विधात्यास त्याच्या रूपकांचा नित्यशः होत असलेल्या अपमान दुःखाच्या भाराखालून अंशत: तरी दूर करण्याचा प्रयत्न करा. तो तुम्हाला दिलेल्या अचाट शक्तीला अलौकिक धैर्याला अजमावून पाहत आहे. तरी करणी करेगा तो नरका नारायण बन जायगा त्याच्या प्रिय भक्तांचे वचन खरें करून दाखवा.
मी अशक्त मी अज्ञान, मी कमी शिकलेला, माझ्या हातून काय होणार आहे ? मी कशाला या भानगडीत पडू? म्हणून हतधैर्य होऊ नका. जे आज तुम्हाला अवगत आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा. जे सत्य तुम्हाला दिसत आहे. ते आपल्या भावी पिढीला दाखवा. पूर्वजांच्या ज्या वेडगळ धार्मिक व सामाजिक रुढींमुळे तुम्ही या थराला पोहचला. तर तुम्ही तरी यातून निसटून जा आणि तेही नच साधल्यास निदान आपल्या भावी पिढीस तरी या अज्ञान बंधनापासून, कोल्या विचारांपासून सोडवा. व्यवहारांतील अनिष्ट जातिबंधनांच्या वरवंटावाखाली सापडू देऊ नका, आणि इतके समजून जर तुम्ही त्याकडे कानाडोळा केलात, तर आपल्या भावीपिढीच्या उन्नतीचा खून तुम्हीच केला, असे ते निःसंशय समजून तुम्हाला दोष देत राहील. म्हणून तुम्हावर पडलेल्या या जवाबदारीची योग्य वासलात लावून, मिळालेल्या संधीचा योग्य फायदा स्वतः घेऊन, आपल्या मागून येणारासहि त्यांचा संग्रह करून ठेवा.
आपल्यास अनुकरण करण्यास पूर्वजांचे कीर्तिरूप भांडवल आपणाजवळ नाही म्हणून मनस्वी आणि कार्याची पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही, तर आलेल्या परिस्थितीशी सारखा झगडत राहून त्यातूनच आपला मार्ग काढून स्वतःचा आणि आपल्या अनुयायांचा उद्धार करतात. म्हणून आपण आपल्या मागून येणाऱ्यास अनुकरणीय असे आपले शील बनवून त्याच्या उदाहरणाखाली परकीयांची चरित्रे आपणाइतकी स्फूर्तिदायक अगर चैतन्यप्रद होत नसतात हे सिद्ध करून दाखवा. कारण हृदयाची तार हालविणारे ममत्व किंवा आपलेपणा त्यांत नसतो. म्हणून जेणेकरून आपली चरित्रे आपल्या वंशज आदरणीय व अनुकरणीय होतील अशीच बनवा व त्याच करिता परमेश्वराने आपणांस या जगतामध्ये उत्पन्न करून लहानाचे मोठे केले आहे हे लक्षात ठेवा. आणि या त्याच्या उपकार फेडीस्तव, आपणांवरील अनिष्ट जातिबंधनाचे दडपण काढून आपणाबद्दल त्यास चाटत असलेली हळहळ शक्य ती कमी करून त्यास आनंदवून त्याचा आशिर्वाद मिळवा.
दुसरा आपल्या उद्धारार्थं धावून येईल ही फारसी आशा बाळगू नका. यदाकदाचित् जरी एखादा महात्मा प्रगट झाला तरी तो एकटा काय करणार ? तो आपणांस अशक्त पाहून थोडावेळ कडीखांदयावरून उचलून नेईल, हाताला धरून योग्य मार्गावरून चालवल, परंतु आपण नेहमी त्याच्याच मदतीवर अवलंबून राहिलो तर आपणच आपला घात करून घेऊ. कारण तो आपणास कुठवर मदत करणार? आपल्यास किती उचलून नेणार? त्याने दिलेल्या सवलतीचा अगर घडवून आणलेल्या परिस्थितिचा योग्य फायदा आपण करून घेणार नाही, तर त्याला आम्हीच पूर्ण जवाबदार ठरून आपल्याबरोबर आपल्या पुढील पिढीचाहि घात आपणच केल्याचे महत् पातक आपल्या शिरी येईल. म्हणून आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंधु या सायोक्तीप्रमाणे आपणच आपल्या उद्धारार्थं झटून, आपल्यावरील पिढीजात नव्हे, जन्मजात अन्यायाचे खंडन करून, आपल्यावरील अपमानाच्या परचक्रांतून सुटण्याचा प्रयत्न सर्व बहिष्कृत वर्गाने एकदिलाने, एकजुटीने करण्यास मागेपुढे पाहू नये. यातच आपला तरणोपाय आहे असे हा संदेश सांगत आहे. याचा प्रत्येक बहिष्कृत तरुण वधुभगिनींनी विचार करून आपल्या जन्माचे साफल्य, आपल्या हीनदीन जातिबंधूस उन्नत मागाँवर आणून करावे, म्हणून अंशतः तरी आपली चरित्रे आपल्या समाजास मार्गदर्शक करवून, उच्च व वरिष्ठ नीच व कनिष्ठ अशा जातींच्या भावना राष्ट्रहितास किती विमातक आहेत, हे आपल्यापेक्षा वरिष्ठ असे म्हणान्यास व त्याप्रमाणे आपणास व आपल्या समाजास सुचतात्मक लेखन त्याप्रमाणे वागविणान्यास, आपणांतील एकीकरणाच्या एकदीलजमाईने शरमवून आजपर्यंत आपल्यावर केलेल्या अन्यायाबद्दल कृतकर्माबद्दल पश्चाताप वाटावयास लावून आपल्या मातृभूमीच्या अर्भकांच्या केलेल्या अवहेलनेबद्दल आणि जगच्चालकाच्या रूपकांच्या केलेल्या अपमानाबद्दल वाईट वाटावयास लावून इत पर तरी आपल्या मातृभूमीच्या उद्धारार्थ झटण्यास भाग पाडले पाहिजे यातच आपले जन्मसाफल्य असून तेच आपल्या उन्नतीचे बीज होय. हे प्रत्येक बहिष्कृत बंधुभगिनीने लक्षात ठेवून वागावे.
बाबासाहेबांचा हा अनमोल संदेश आपल्या लक्षात आला असेल. त्याना काय अपेक्षित होते ? हे हि समजले असेल अशी आशा बाळगतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश शेअर करा. समाजात आपण एकटं काही करू शकत नसला तरी हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवून नक्कीच बदल घडवू शकतात. च्नागले विचार निहामी अमर राहतात हे येथे समजून घ्यावे. तसे आचरणात हि आणण्याचा प्रयत्न करावा. धन्यावद !
- योगेश जाधव
(शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राइटर, युट्युबर )
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
Follow on twitter : click here
टिप्पण्या