कवितासंग्रह - प्रकाशवाटा
नमस्कार रसिक मित्रांनो ! माझा पहिला कविता संग्रह ‘प्रकाशवाटा’ आपल्या हाती देतांना खूप आनंद होत आहे. आपण हा कवितासंग्रह वाचण्यास रुची दाखवली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. या कवितासंग्रहात मराठी, अहिराणी, हिंदी अशा विविध भाषेतील स्वलिखित कविता संग्रहित आहेत. दैनंदिन जीवनातील वास्तव व जगण्यातील रहस्य, तसेच स्वानुभवातून उमगलेले जीवन वलय मी येथे शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच गोष्टी आपण जाणत असून देखील त्यातून मार्ग काढतांना चुकीचा पाउल पडण्याची भीती नाकारता येत नाही. यातील काही कविता अशा परिस्थितीत आपल्याला एक प्रकाशाची वाट नक्की दाखवेल अशी आशा आहे. भाषा मृदू वापरण्याचा नक्की प्रयत्न केला आहे; तरीदेखील काही ठिकाणी सत्य मांडत असतांना ती अवजड होताना वाटत असेल तर त्याबद्दल वाचकांची आधीच माफी मागतो. परंतु मला सांगावयाचे सत्य व त्यामागील माझी प्रमाणिक भूमिका नक्की समजून घ्याल अशी आशा आहे.
या कवितासंग्रहातील कविता चालीवर देखील म्हणता येतील. त्यातील काही मी माझ्या युट्युब वर देखील टाकल्या आहेत. समाज शिक्षण, कौटुंबिक शिक्षण, जीवन शिक्षण, प्रेमरंग, वास्तविक जीवनातील विसंगतता, मनोरंजन, भावुकता, निसर्ग, सौंदर्य, मित्रता, मानवता अशा कितीतरी पैलूंना सोबत घेवून शब्दांची केलेली गुंफण आपल्या समोर देतांना खूप आनंद होत आहे. या काव्यसंग्रहातील कविता वाचून आपला प्रतिसाद मला नक्की कळवा. काही सुधारणा असतील तर तेही मला सांगा. आपल्या सूचनांचा स्वीकार करून त्यात योग्य तो बदल नक्की केला जाईल.
या काव्यसंग्रहातील कोणताही मजकूर लेखक / कवी च्या लेखित परवानगी शिवाय प्रसिध्द करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
सर्व रसिक वाचकांना खूप खूप शुभेच्छा व मनापासून धन्यवाद ! एकदा हा काव्यसंग्रह नक्की वाचवा ! गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.
- योगेश आर. जाधव
प्रकाशक
जाधव पब्लिकेशन, सुरत, गुजरात.
लेखक /कवी : योगेश आर. जाधव.
वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Click here
टिप्पण्या