मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

LOVE प्रेम म्हणजे नेमकं काय ?

LOVE प्रेम म्हणजे नेमकं काय ?


                प्रेम ही भोगाची किंवा जबरदस्तीची गोष्ट नाही. प्रेम म्हणजे समजली तर भावना पहिले तर नाते म्हटले तर शब्द वाटली तर मैत्री.... घेतली तर काळजी... तुटले तर नशीब. .......पण मिळाले तर स्वर्ग असं म्हणतात की, प्रेमाने जग जिंकता येते. पण हे प्रेम निस्वार्थी असावे मग त्यात संपूर्ण जग मुठीत ठेवण्याची ताकद आहे. पूर्वीही लोक प्रेम करायचे व आताही प्रेम करतात पण फरक पडला तो एकमेकांच्या समजुतीत. मला रफींच्या दोन ओळी आठवतात.

पास बैठू तो बहल जायेगी

मौत भी आ जायेगी तो टल जायेगी।

               याला प्रेम म्हणतात. मैत्रीतला अतूट विश्वास असणे गरजेचे असते. जर विस्वास व एकदुसयाला समजून घेण्याची भावनाच नसेल तर ते प्रेम काहीच कामाचे नाही. कारण प्रेम हे जमली तर प्रीती नाहीतर प्रेत आहे. मुकेश यांच्या भाषेत प्रेम्संगायचे झाले तर

कोई जब तुम्हारा हृदय तोड दे.

तडफता हुआ कोई छोड दे. 

तब तुम मेरे पास आणा प्रिये...... 

मेरा घर खुला है, ही खुला ही रहेगा तुम्हारे लिये ।

               हे प्रेम आहे. प्रेम कधीच कुणाचा बळी मागत नाही. प्रेम हे फक्त एक दुसयासाठी तुम्ही केलेल्या त्यागाची परीक्षा आहे. अरे एखादी गोष्ट जर त्यागून किंवा सोडून समोरच्या व्यक्तीला आनंद होत असेल तर ते देणे किंवा निभवणे हे सुध्दा प्रेम आहे. अरे अथवा आपल्या आईला, तिने आपल्याला वाढवण्यासाठी तुम्ही लहान असल्यावर किती गोष्टी त्यागल्या होत्या तुमच्यासाठी. तिची इच्छा असतांनाही तिने बरेच पथ्य पाळले. हे सुध्दा तुमच्यावरील प्रेमापोटीच ! मग आपण या प्रेमाला एवढे हिंसक वळण का धावे ? प्रेम ही निस्वार्थ व पवित्रतेने निभावण्याची एक भावना आहे. त्यात कोणाचा जीव घ्यायचा नसतो किंवा द्यायचा नसतो. एवढ लक्षात ठेवा. प्रेम व हिंसा ह्या दोन्ही विरुध्द गोष्टी आहेत. त्यांची एकमेकांशी भेट होणे अशक्यच आहे. आणि जो कोणी ह्या हिंसकतेकडे वळत असेल ह्या त्याने कधी तुमच्यावर कधी प्रेम केलेच नाही असे समजावे. कारण प्रेम करणारा अगदी लहानात लहान गोष्ट सुध्दा जपून ठेवतो. त्यात स्वतःचा स्वार्थ तो कधीच पाहत नाही. नेहमी दुसऱ्याचा विचार करतो. मागील वर्षी या भारत भूमीच्या सुपुत्रांनी देशासाठी आपले कर्तव्य निभवत असतांना स्वतःचे प्राणार्पण केले. ते सुध्दा तुम्हा- आपल्यासाठी. हे खरे प्रेम आहे. या हिंसकतेला थांबवण्यासाठी हा एक लेख लिहिला आहे. त्याला वाचून तो प्रत्येकापर्यंत पोहचवा. व त्यावर विचार करा की खरच आपण प्रेम काय ते समजून घेतले का? अरे प्रेम तुटले तरी या मार्गाला जाऊ नका....

ये भी कुछ कम नही तेरा दर्द छुटने के बाद.....

हम अपने पास आये दिल तुटने के बाद...!

                   जरी एखाद्याच्या जीवनात अशा घटना घडल्या तरी त्यातून आपण काहीही हिंसा करणार नाहीत. व याच जिद्दीवर जीवन जगून दाखवाल व जगूही द्याल. कारण तुम्ही अनमोल आहात त्या तुमच्या आई वडिलांसाठी. कारण तुम्ही आता मोठे झाल्यावर प्रेम करत असाल पण, त्यांनी तुम्ही जन्म घेण्याच्या अगोदर पासून तुमच्यावे प्रेम केले आहे. त्यांच्या या अतूट प्रेमाला तडा देवू नका मित्रहो. शेवटी एकच लक्षात घ्या प्रेम ही एक जगण्याची उर्जा असते तिला अशी कुठेही व कोणत्याही मागनि वाया घालू नका.

लेखन: योगेश जाधव.

             Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा