मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

आरक्षणाचा राजकारणासाठी उपयोग करणे घृणास्पद

आरक्षणाचा राजकारणासाठी उपयोग करणे घृणास्पद

कोणालाच आरक्षण देण्याची गरज नाही,अन; द्यायचेच असेल तर या प्रमाणे द्या


भारत हा एक विशाल देश आहे. आणि विशेष म्हणजे येथे लोकशाही अस्तित्वात आहे. या देशाच्या कुशीत अनेक जाती धर्माचे लोकं राहतांना दिसतात. येथील संस्कृती फार प्राचीन आहे. परंतु अनादिकालापासून धर्म, जात यात कुठेतरी नेहमी संघर्ष होताना दिसत आहे. हा संघर्ष घडवून आणला जात आहे कि तो आपसातच लोकं निर्माण करत आहेत हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आली. या वेळी जी सद्य स्थिती होती ती व भविष्यातील वेध लक्षात घेवून येथील विचारवंतांनी राज्यघटना रचना केली. यात विविध जाती-धर्माच्या ,तळागाळातील लोकांना सर्वसामान्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण नावाची एक वेगळी व्यवस्था केली गेली. त्यांच्या साठी विशिष्ट तरतूद केली गेली. हि तरतूद बहुजन वर्गाचा विकास व्हावा या हेतूने करण्यात आली होती. 
             बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केली गेलेली ही तरतूद नक्की कौतुकास्पद होती. परंतु त्यात एक तरतूद असायला हवी होती; ह्याची जाणीव आज होतांना दिसत आहे. ही तरतूद म्हणजे "आर्थिक परिस्थिती पाहून आरक्षण अथवा सरकारी योजनांचा लाभ देण्याची." कारण कोणताही समाज असो पूर्णतः गरीब पण नाही आणि पूर्णतः श्रीमंत पण नाही. प्रत्येक जातीत श्रीमंत आहेत आणि प्रत्येक जातीत गरीब आहेत. आर्थिक नियम लागू नसल्याने एखाद्या समाजातील त्या सबंधित व्यक्तीचा विकास झाला असला तरी त्याची पुढची पिढीही त्याच आरक्षणाचा लाभ घेवून अजून श्रीमंत होतात. पण जे दलित अथवा बहुजन समाजातील व्यक्ती आर्थिक सक्षम नाहीत त्यांना मात्र कुठेतरी आरक्षणाच्या अथवा आर्थिक मजबुरीने मागे राहावे लागते. परिणामी गरीब अधिक गरीब होत जातो. त्याच्या उन्नतीचे सर्व मार्ग बंद होतात. ज्याच्या कडे गुणवत्ता आहे तोच पुढे जाईल हा मार्ग अवलंबायला हवा. यात गुणवत्ता धरण करण्यात जर कोणी असक्षम असेल तर त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. त्याच्यासाठी विविध योजनाच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था करून द्यावी. शासन तुमच्या दारी हे फक्त कागदपत्री असू नये. त्याला प्रत्यक्ष अमलात आणावे. 
             शासन तुमच्या दारी हा उपक्रम एकीकडे आणि दुसरीकडे मात्र सर्व नोकर भरतीचे खाजगीकरण हे दुतोंडी धोरण राबवून शासन फक्त लोकांची फसवणूक करत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर लोकांना फक्त आपसात लढून स्वतःचे खिसे भरतांना दिसत आहे. धर्म , जाती, आरक्षण हेच मुद्दे हाताशी घेवून निवडणुका लढवल्या जात आहेत. याचा कुठेतरी अंत होणे आवश्यक आहे. 

आरक्षण देण्यासाठी खालील नियम करायला हवेत : 

  • आरक्षण देण्यासाठी स्त्री-पुरुष व गरीब-श्रीमंत ह्या बाबी लक्षात घ्याव्यात.
  • गरीब-श्रीमंत ह्या व्याख्येत नेमके कोण? याची निश्चित व्याख्या करण्यात यावी.
  • गरीब या गटात येणाऱ्या वर्गाच्या आवक मर्यादा निश्चित करण्यात याव्यात.
  • संपत्ती असतांना गरीबिचीचा देखावा करून योजना आपल्या पदरात पाडून घेणाऱ्यांसाठी कठोर कार्यवाही करण्यात यावी.
  • बहुजन समाज जो खरच आरक्षणाचा मानकरी आहे त्याला या नियमांनी आरक्षण देण्यात यावे.
  • गुणवत्ता हा मुद्दा शिक्षण व भरती प्रक्रियेत प्राधान्याने विचारात घ्यावा.
  • विविध धर्म जाती यांच्या साठी स्वतंत्र विचार न करता वरील प्रमाणे सर्वांसाठी सारखा नियम लागू करावा.
  • यासाठी जातीच्या प्रमाणपत्र एवजी ठराविक प्रमाणपत्रांचा विचार करण्यात यावा.
  • डोंगरी, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग वैगरे प्रकारातील राखीव जागा जशा आहेत तशा ठेवाव्यात.
  • आजच्या जगात सर्वच गोष्टी पैशांनी विकत घेतल्या जातात. हा मुद्दा लक्षात घेवून भविष्यातील सर्टिफिकेट देतांना प्रत्यक्ष पाहणी अथवा अन्य प्रमाणाची तरतूद करावी. त्यासाठी पुरेशी व्यवस्था उभी करण्यात यावी.
  • देश व राज्य यांतील आरक्षण नियम एकच असावेत. जेणेकरून सर्व राज्यात विविध पदासंठी उमेदवार अर्ज करू शकतील. 
  • सद्य स्थितीत एका राज्याचे जातीचे प्रमाणपत्र दुसऱ्या राज्यात मान्य धरले जात नाही. हा नियम बदलून एक राष्ट्रीयकृत सर्टिफिकेट देण्याची तरतूद करण्यात यावी. जे सर्व राज्यात मान्य असेल.
  • ज्या पदात स्थानिक भाषेची अट असेल फक्त त्याच पदांत स्थानिक उमेदवारांना प्राथमिक क्रम व इतर सर्व पदांत समान आरक्षणाने भरावेत. 
           वरीलप्रमाणे आरक्षणाच्या तरतुदीत बदल करून देशाला अथवा देशाच्या नागरिकंना बाधा ठरत असलेला आरक्षण या मुद्याला पूर्ण विराम देण्यात यावा. 

Home page : click here

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here 


टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा