Maharashtra Pavitra Portal login : Merit list जाहिराती
Maharashtra Pavitra Portal Registration : महाराष्ट्र शिक्षक भरती 2023, पसंतीक्रम, जाहिराती.
महाराष्ट्र शिक्षक भरती 2023 पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरु :
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून साडेपाच वर्षांनंतर शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये आठ ते दहा हजार जागांची भरती होणार आहे. राज्यभरात जिल्हा परिषदांच्या जवळपास ७० हजार शाळा असून त्याअंतर्गत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत म्हणून 'शिक्षण सारथी' योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण, आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणतः ऑक्टोबरअखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
तत्पूर्वी, जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल. सध्या 'पवित्र'वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यात त्यांना प्राधान्यक्रम, प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होऊन उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील, असे भरतीचे टप्पे आहेत.
महत्वाची सूचना : पवित्र पोर्टल आज दि. ०७/०२/२०२४ रोजी दुपारी ४.०० ते ६.०० पर्यंत मेंटेनन्स मुले उमेदवारांना उपलब्ध होणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी सूचना :
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ ही ऑनलाईन दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे..
२. या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या
पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे..
३. उमेदवारांना स्व प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
४. सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका (Sump) क्र ४४३४ / २०२३. १८२४/२०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३ / २०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास • आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेश पत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते, असे असतानाही काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ते सहभागी करून घेता येणार नाही. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
६. उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक १५/०९/२०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ :
राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नाही तसेच दिनांक १४/०९/२०२३ रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नाही, तसेच टीईटी घोटाळ्यातील काही प्रकरणांवर निर्णय यायचा बाकी आहे. ही बाब विचारात घेता स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०६/१०/२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच हे प्रमाणिकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. त्यास यथाशीघ्र उत्तर देण्यात येईल यासाठी कोणाही कर्मचारी अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये.
वर नमूद केलेल्या कालावधीत जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत..
७. ज्या उमेदवारांच्या TET /CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, ओळखीच्या पुरावा व सबंधित कागदपत्रे यासह संपर्क साधावा.. सदरची सुविधा लवकरच देण्याबाबत स्वतंत्रपणे पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल..
८. सन २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत दिनांक ९/८/२०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार यांचे जागी पुढील उमेदवारांसाठी यादी प्रसिद्ध करावयाची आहे, त्यासाठी जिल्ह्याकडील माहिती प्राप्त झाली आहे, त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यासाठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करणेसाठी आवश्यक कागदपत्राची यादी :
1. उमेदवाराने TAIT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र.
2. उमेदवाराने TAIT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी,
3. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
4. जातीचा दाखला/ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5. जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
6. समांतर आरक्षणासाठी
A) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
B) माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
C) पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
D) प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
E) भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
F)प्राविण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे बाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचेपडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती (लागू असल्यास)
G) अनाथ असल्याचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
7. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका
8. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
9. शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
10. शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
11. पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत डीएड / डीटीएड / डीएलएड / टीसीएच इ. बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास).
12. पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत बीएड/बीएएलएड/बीएससीएड/बीपीएड/बीपीई इ. बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास).
13. पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत एमपीड इ.बाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास).
14. बीपीएड उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे (लागू असल्यास).
15. शिक्षक पात्रता परीक्षा (राज्य (केंद्र) अर्हताबाबत प्रमाणपत्र ( लागू असल्यास).
16. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
17. स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
18. 1991 चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) 19. 1994 चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
टीप- 1. छायाचित्र व स्वाक्षरी ही .jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 100 kb मर्यादेत साईज आवश्यक आहे.
2. इतर सर्व कागदपत्र/ प्रमाणपत्राकरिता .pdf/.jpg/.jpeg या फॉरमॅटमध्ये कमाल 500kb मर्यादेत साईज आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी सूचना : दिनांक ०४/०९/२०२३
१. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली आहे. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक १५/०९/२०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
२. TET/CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉगीनवर Request for Change in Data या मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.
३. उमेदवार सदर तफावत दूर करण्यासाठी आपली TET/CTET मधील माहिती नोंद करून ती Approve करण्यसाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्हाकडे पाठवावी.
४. ज्या उमेदवारांच्या TET/CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, TET/CTET गुणपत्रिका व प्रमाणपत्र प्रत, TAIT आवेदनपत्र / प्रवेश पत्र/गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी बाबत कागदपत्र घेऊन यासह संपर्क साधावा.
५. दिनांक ४/९/२०२३ ते दिनांक १४/९/२०२३ या दिलेल्या कालावधीत तफावत दूर करण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या सूचना : click here
२०१८ च्या टीईटी / TAIT मध्ये गैरप्रकारात सापडलेले उमेदवार, ज्यांची भरती प्रक्रियेतून कायमस्वरूपी उमेदवारी / संपादणूक रद्द केली आहे : click here
नवीन सूचना :
संप असल्या कारणाने बरेच प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना उशीर झाला होता. हि बाब लक्षात घेवून ३१ मार्च नंतर चे मिळालेले कागदपत्रे शिक्षक भरतीत चालणार आहेत. फक्त शैक्षणिक कागदपत्रे ३१ मार्च च्या पहली असावीत असा नियम कायम आहे.
📌 31 मार्च नंतर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता सोडून बाकी सर्व कागदपत्रे चालतील (संप काळात कागदपत्रे उमेदवाराना भेटली नाहीत)
📌 क्रीडा,कार्यानुभव पैकी फक्त क्रीडा शिक्षक पदे पोर्टलवर येतील
📌 खासगी अनुदानित रोस्टर तपासणी आदेश दिले आहेत
📌 सद्यस्थितीत जी उपलब्ध कागदपत्रे आहेत ती अपलोड करा
📌 काही कागदपत्रे नसतील तर नियुक्तीच्या वेळी ती सर्व कागदपत्रे लागतील तसे हमीपत्र स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करा
📌 मोबाईल नंबर चुकीचा टाकला असेल तर त्याची सुविधा प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे
📌 पदवीच्या शेवटच्या वर्ष टक्केवारी टाका
📌 tet 2019 परीक्षा परिषदे कडून 5%ews सूट मिळवून घेणाऱ्या उमेदवारास उपलब्ध असेल
📌 दिव्यांग ओपन ची माहिती सेव्ह होत नव्हती तो देखील प्रॉब्लेम लवकर सुटेल
📌 12वी सायन्स जे माध्यम निवडले आहे तेच राहुद्या मराठी/इंग्रजी काही अडचण नाही
📌 नवीन शैक्षणिक पात्रता शासन निर्णय येईल 10वी माध्यम पकडले जाईल
📌 एखादे कागदपत्र नसेल तर हमीपत्र जोडा नियुक्ती वेळी सर्व कागदपत्रे लागतील
📌 196 संस्थांची यादी लवकरच प्रसिद्ध होईल,त्यानंतर रिक्त अपात्र राऊंड होईल तो टॅब लवकरच eo कडे जाहिरात अपलोड करण्यासाठी देण्यात येईल
📌 त्यानंतर1ते 5चा राऊंड होईल
📌 TET च्या घोटाळ्यातील बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई न्यायालयाने दिलासा दिला आहे. यातील जे उमेदवार ctet परीक्षा पास असतील त्यांना संधी देण्यात आली आहे.
नवीन जाहीर झालेले नियम : 15/09/2023
📌ज्या उमेदवारांनी एकाच वेळी म्हणजे एकाच वर्षाच्या TAIT परीक्षा एकापेक्षा जास्त वेळा देवून मार्क मिळवले असतील अशा सर्व एका पेक्षा जास्त वेळा TAIT देणाऱ्या उमेदवारांना पवित्र पोर्टल वर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यांना या भरतीत भाग घेता येणार नाही. उच्च न्यायालयाने हा प्रतिबंध योग्य असल्याचे म्हटले आहे.
📌CTET अपिअर उमेदवारांच्या बाबतीत अजून निर्णय आला नसल्याने त्यांच्या बाबतीत अजून संभ्रम आहे. हा निकाल आल्या नंतर त्यांच्या बाबतीत निर्णय जाहीर होईल.
18/09/2023 चे उमेदवारांसाठी नवीन सूचनापत्र : click here
Published On : 31-Oct-2023 : रिक्त जागासांठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबतीत परिपत्र : फक्त २०१७ भरती संदर्भात उमेदवार, २०१९ ची TAIT पास झालेले.
२०१७ च्या पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याचे चालू आहे. याची मुदत वाढवून ०७/११/२०२३ करण्यात आलेली आहे. सदरील प्राधन्यक्रम लॉक केल्यानंतर आपल्याला मेसेज किंवा कॉल लेटर आलेले असेल त्या शाळेशी संपर्क करवा. किंवा अधिक गोंधळ असल्यास पोर्टलवर हेल्पलाईन वर संपर्क करावा.
लोगिन ला जाहिराती केव्हा दिसतील ?
अंदाजित शेड्युल प्रमाणे आज ५ फेब्रुवारी २०२४ ला संध्याकाळ पर्यंत जाहिराती येवून जातील. बाकी काम पूर्ण झाले असून जाहिराती लवकरच येतील. त्यामुळे वर्षभराची प्रतीक्षा आता संपणार आहे. जर काही कारणास्तव विलंब झाला किंवा आज जाहिराती येवू शकल्या नाहीत तर उद्या ६ फेब्रुवारी ला जाहिराती नक्की येतील. काही अडचण आल्यास जाहिराती न दिसल्यास त्या केव्हा येतील याचे अपडेट केले जाईल. वेबसाईट पाहत राहावी.
कोणत्या उमेदवारांना जाहिराती दिसतील ?
पवित्र पोर्टल वर ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्या सर्वांना जाहिराती दिसतील.
आपल्या लोगिन ला किती आणि कोणत्या जाहिराती दिसतील ?
आपल्या लोगिन ला पवित्र पोर्टल आपल्याला आपला जात प्रवर्ग, आरक्षण घटक, आपले शिक्षण या बेसिस वर जाहिराती दाखवेल. आपला जात प्रवर्ग व आरक्षण लक्षात घेवून त्याप्रमाणे उपलब्ध जाहिराती दिसतील. प्रत्येक आरक्षित प्रवर्गाला अनआरक्षित (ओपन) च्या जागा देखील दिसतील. त्यामुळे फोरम जरी आरक्षण प्रवर्गात भरला असेल तरी ओपन च्या जागांना प्राधान्यक्रम देवू शकतो.तुम्ही ज्या जागांवर पात्र नाहीत त्या जागा तुम्हाला दाखवल्या जाणार नाहीत. सर्व माध्यामच्या जाहिराती दिसतील. आपल्या लोगीनला फक्त आपल्या माध्यमाच्या जाहिराती दिसतील. पात्रतेनुसार जाहिराती दिसतील. म्हणून जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही.
जाहिराती TET / CTET / TAIT च्या मार्कांवर आधारित दाखवल्या जातील का ?
नाही, जाहिराती दाखवतांना आपला कोणताही स्कोर लक्षात घेतला जाणार नाही.
पसंतीक्रम कसा द्यावा ?
आपली शैक्षणिक पात्रता लक्षात घेवून दाखवण्यात आलेल्या जागांवर आपल्याला पसंतीक्रम द्यायचा आहे. यात दाखवलेल्या जागांचा पूर्ण अभ्यास करून तुम्ही कितीही जागांवर पसंतीक्रम देवू शकतात. पसंतीक्रम देतांना सुरुवातील उच्चतम शैक्षणिक पात्रता, माध्यम लक्षात घेवून पसंतीक्रम द्यावा. उदा. उच्च माध्यमिक - माध्यमिक - उच्च प्राथमिक (६ ते ८) - प्राथमिक (१ ते ५) असा क्रम ठेवावा. हा क्रम आपण बदलवू इच्छित असाल तर बदलवू शकतात. त्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे.
पसंतीक्रम देतांना काय लक्षात घ्यावे ?
- पसंतीक्रम देतांना सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याला प्राधान्य द्यावे.
- नतर जवळचा जिल्हा व नतर आपली इच्छा असेल तो जिल्हा निवडावा.
- विवाहित स्त्रीया / मुली यांनी आपला निर्णय पूर्ण पक्का असेल कि मी येथे जाईल तरच पसंतीक्रम द्यावा.
- जेथे आपल्याला नोकरीला जायचे नाही तेथे पसंतीक्रम देवू नये. ती जागा दुसऱ्या गरजवंताला मिळू शकते. एवढ पुण्य करावे.
- नको तेथे प्राधान्यक्रम देवून जागा अडकवू नये.
- आपण त्या जागेची शैक्षणिक पात्रता पूर्ण करत अस्सल तरच प्राधान्यक्रम द्या.
- आपल्याला मुलाखत आणि बिना मुलाखत अशा दोन्ही जागा दाखवल्या जातील. त्यामुळे हेही पूर्ण पाहून घ्यावे.
- माध्यम व्यवस्थित निवडावे.
मला TAIT मध्ये कमी मार्क आहेत. मी पसंतीक्रम देवू शकतो का ?
तुम्हाला किती मार्क आहेत हा विचार न करता सर्वांनी पसंतीक्रम द्यावयास हरकत नाही. पसंतीक्रम दिल्यानंतर मेरीट याद्या लागतील तेव्हा त्याचा विचार होईल. परंतु आता पसंतीक्रम देतांना हा विचार करू नये, कि मला कमी मार्क आहेत मग माझा नंबर लागेल का ?
पवित्र पोर्टलवर रजिस्टर उमेदवार किती आहेत ?
स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार पवित्र पोर्टलवर एकूण १ लाख ६३ हजार उमेदवार आहेत.
पसंतीक्रम केव्हा द्यावा ?
जाहिराती आल्यानंतर लगेच तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी लोगिन लिंक उपलब्ध होईल. हि लिंक उपलब्ध झाली कि प्रथम सर्व जाहिराती पीडीएफ डाऊनलोड करावे. नंतर त्यातून योग्य पसंतीक्रम निश्चित झाल्यावर दुसऱ्या दिवशी पसंतीक्रम देण्यासा हरकार नाही.
किती जागांवर पसंतीक्रम देवू शकतो ?
आपण आपल्या लोगिन ला उपलब्ध किती जागांवर पसंतीक्रम देवू शकतो यावर बंधन नाही. तुम्ही कितीही जागांवर पसंतीक्रम देवू शकतात.
पोर्टलवर जाहिरात कशी पहावी ?
पोर्टल ओपन करा - पवित्र पोर्टल शिक्षक नियुक्ती 2022 वर क्लिक करा - न्यूज बुलेटिंग वर क्लिक करा - डाऊनलोड वर क्लिक करा - मुलाखत श आणि बिना मुलाखत जाहिरात डाऊनलोड करा.
पोर्टलवर लोगिन केव्हा करता येईल ?
पोर्टलवर लोगिन लिंक उपलब्ध करून देण्यात येईल तेव्हाच लोगिन करता येईल.
पोर्टलवर माझा लोगिन आयडी काय असेल ?
पोर्टलवर लोगिन आयडी म्हणून तुमचा TAIT रोल नंबर अथवा रजिस्ट्रेशन नंबर असतो.
पवित्र पोर्टलवर लोगिन साठी पासवर्ड काय असेल ?
रजिस्ट्रेशन करतांना तुम्ही जो पासवर्ड बनवला असेल तो टाकावा. माहित नसल्यास फोर्गेट पासवर्ड करावा.
पवित्र पोर्टल वर प्रेफरन्स असे द्यावेत (प्रत्यक्ष डेमो) : युझर गाईडलाईन
दि. ६/०२/२०२४ चे प्राधान्यक्रम देण्याविषयीचे परिपत्र : click here
दि. ०७/०२/२०२४ चे प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते त्याबद्दल परिपत्र : Click here
शिक्षक भरती पात्रता निकष विषय शासन निर्णय (GR)
- ७ फेब्रुवारी २०१९ चा पात्रता GR : Click Here
- २५ फेब्रुवारी २०१९ चा पात्रता GR : Click here
- १२ जून २०१९ चा पात्रता GR : Click here
- १ ऑगस्ट २०२३ शिक्षक पात्रता व विषय स्पष्टीकरण पत्रक : Click Here
पवित्र पोर्टलवर उपलब्ध जागांचा तपशील :
- अनुसूचित जाती :-3147
- अनुसूचित जमाती :-3542
- विमुक्त जाती अ :-862
- भटक्या जमाती क 582
- भटक्या जमाती :-ड 493
- विशेष मागास प्रवर्ग290
- इतर मागास प्रवर्ग 4024
- आर्थिक दुर्बल घटक2324
- खुला 6170
गट निहाय रिक्त पदे
- 1ली ते5वी10240
- 6वी ते 8वी 8127
- 9वी10वी 2176
- 11वी 12वी 1135
माध्यम निहाय रिक्त पदे
- मराठी 18373
- इंग्रजी 931
- उर्दू 1850
- हिंदी 410
- गुजराती12
- कन्नड88
- तमिळ8
- बंगाली4
- तेलगू 2
📌मुलाखतीशिवाय 16799
📌 मुलाखतीसह 4879
📌 प्राधान्य क्रम ०८/०२/२०२४ तारखे पर्यत देता येतात ,लॉक करण्याची अंतिम मुदत ०९/०२/२०२४ आहे
📌 प्राधान्य क्रम डिलीट करून जास्तीत जास्त 3 वेळेस देता येतात
लॉगइन करण्यासठी येथे क्लिक करा : click here
नवीन काहीही अपडेट आल्यास या वेबसाईट वर अपडेट केले जाईल. त्यामुळे दररोज वेबसाईट चेक करावी. या साईट वरचा सर्व मजकूर आपण आपल्या भाषेत वाचू शकतात. त्यासाठी साईट वर उपलब्ध ट्रान्सलेटर चा उपयोग करावा.
Apply Online : Click Here
Home page : click here
शिक्षक भरती विषयी अजून नवीन काही सूचना आल्यास या साईट वर अपडेट करण्यात येतील . कृपया त्यासाठी खालील प्लेटफोर्म वर मला फॉलो करा. जुडून राहा अपडेट मिळत राहील.
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Follow on google news : click here
टिप्पण्या