डिग्री सर्टीफिकेट मिळण्याबाबत ऑनलाईन अर्ज : NMU Degree certificate form 2023
डिग्री सर्टीफिकेट मिळण्याबाबत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३२ व्या पदवीप्रदान समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी / पदवीका, तसेच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) धारक विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत त्यांनी १९ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.
विद्यापीठातर्फे डिसेंबर, २०२२ आणि एप्रिल/मे/जून-२०२३ तसेच त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पीएच.डी. धारकांकरिता, पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत आहे. उत्तीर्ण वर्षापासून पाचवर्षाच्या आत पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ५००/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रुपये १३००/- भरावे लागतील. तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २० ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत आहे. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड / नेट बँकिग द्वारे ऑनलाईन भरावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश नारायण पाटील यांनी केले आहे.
विद्यापीठाच्या विविध पदव्या घेत्लेलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अच्चूक माहिती भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करून आपले डिग्री फॉर्म भरावयाचे आहेत. आपला PRN नंबर , युझर आयडी पासवर्ड,आपले शेवटच्या वर्षाचे ओरीजनल मार्कशीट, आधार कार्ड, फोटो वैगरे माहिती फॉर्म भरतांना जवळ ठेवायची आहे.
महत्वाच्या लिंक :
फोर्म भरण्यासाठी : click here
होम पेज : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Follow on google news : click here
टिप्पण्या