भडकवणारे आणि भडकणारे यांच्यातील भेद लक्षात घ्यायला हवा
भडकवणारे आणि भडकणारे यांच्यातील भेद लक्षात घ्यायला हवा
राजकारण म्हटले म्हणजे तिथे दोन जमात अवश्य येतात. एक भडकणारी आणि दुसरी भडकवणारी ! भडकणारे स्वतःचे डोके दुसऱ्याकडे गहन ठेवून असतात तर भडकावणारी चार भिंतींच्या बंगल्यात सुरक्षित एशोआरामात जीवन व्यतीत करत असतात. हा पूर्वापार चालत आलेला इतिहास आहे. सध्याचं महाराष्ट्राचे राजकारण याचे उत्तम उदाहरण आहे. एक खुर्चीवर आला कि दुसरा त्याला त्रास देण्यासाठी नवीन कुरापत्या काढतो. पण हे करत असतांना तो नेहमी शोषित वर्गाचा उपयोग करतो. कारण त्याला माहित आहे थोडसं तुकडा फेकला कि हे भडकावून उठतील. ज्यात त्याची पोळी आरामात भाजली जाईल. जेल मध्ये जाईल तर भडकणारा जाईल. उलट भडकावणारा त्याला मी काही तुला असे करायला सांगितले होते का ? असे म्हणेल. तरीसुद्धा आमचे डोके ताळ्यावर येत नाही याला आपल्याशिवाय जास्त जबाबदार कोण ?
आरक्षण , धर्म हा मुद्दा नेहमी राजकारण्यांचा आवडीचा विषय आहे. कारण हेच शस्त्र घेवून प्रत्येक गोष्टीला वेगळे अलं लावले जाते. अगदी माणूस मेला तरी त्याचे राजकारण होते. आरक्षण आणि धर्म हा मुद्दा कायमचा संपुष्टात येवू दिला जात नाही. किंवा संपवला जात नाही. जातीय आरक्षण पुढे करून जे हिंसाचार माजवले जातात, त्यातून होणारे नुकसान ह्याला जबाबदार कोण ? राजकारण्यांच्या बापाचा पैसा तर यात जात नाही.
सध्याच्या सर्व जातीय आरक्षणे काढून आर्थिक सबळता, आवक लक्षात घेवून आरक्षण निश्चित करावे. घटनेपुढे जर सर्व समान असतील तर विविध जाती आणि धर्म साठी वेगळे नियम बनवण्याची गरज काय ? कोणत्याही जातीत सर्व गरीब नाहीत अन कोणत्याही जातीत सर्व श्रीमंत नाहीत. आरक्षणाचे नाव पुढे करून ज्याला अक्कल नाही तो देश चालवायला निघतो यात कोणत शहाणपण आले? देशाचा विकास करायचा असेल तर हे सर्व बाजूला ठेवून मग निवडणुका लढवाव्यात. पैसे दवून खरीदी केलेल्या लोकमतावर आपला विजय प्राप्त करणारा देश विकणारा नाही याची काय शाश्वती आहे ? सर्व ठिकाणी सेटिंग काम करते मग निपक्ष शासन हे फक्त पुस्तकात वाचण्यासाठी ठेवले आहे का ? जे माझ्या शाळेत शिकवले जाते ते माझ्या समाजात घडत नाही. आणि जे माझ्या समाजात घडते ते माझ्या शाळेत शिकविले जात नाही. जर हाच ताळमेळ अजून बसला नाही तर, अवकाशात उद्या हाणणे देशाच्या कितपत हिताचे आहे ? याचा विचार ज्याच्याकडे डोके आहे त्याने करावा.
जो भारतात राहतो तो भारतीय आहे . मग त्याला जातीची ओळख का सांगावी लागत आहे. तुम्हाला जातीने परदेशात कोणी ओळखतो का ? फक्त एकच भारतीय असे प्रमाण देवून त्याला त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रयत्न करण्यास का सांगितले जात नाही ? आज ज्याच्याकडे पैसा आहे तो त्या जातीचा नसून सुध्दा त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र देणारा कोण ? ते का दिले गेले ? कारण एक सर्वसामान्य माणूस काही प्रमाणपत्र काढायला गेला तर त्याला एवढी कागदे जमा करावी लागतात कि ते नकोसे वाटते. मग असे खोटे प्रमाणपत्र कसे दिले जाते ? प्रत्येक ठिकाणी पैसे देवून काम होत असतील तर सरकारी विभाग शो पीस म्हणून उभे केले आहेत का ?एक साधा १२ वी पास तलाठी एका कागदावर सह्या करायला पैसे घेतो किंवा लवकर करत नाही त्याला नोकरी देवून काय फायदा ?
राहिला प्रश्न लोकतंत्र व्यवस्थेचा तर कोणतेही आंदोलन करण्याची गरज नाही. सर्व सामानुय नागरिकांना वेठीस धरण्याची गरज नाही. असे केल्याने मागणी लाख मोलाची आणि खरी असेल पण आंदोलन कर्ते सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांचे दुष्मन होतात. स्वतःचे घर , गाडी , सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान , जाळपोळ, व्यवसाय बंद पाडणे, आत्महत्या करणे इत्यादी अनेक वस्तू केल्याने काही होणार नाही. सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन कर्त्यांच्या बापाचे काहीच बिघडवले नसते. त्यांचे नुकसान करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे ? तुमची मागणी सर्वसामान्य नागरिक पूर्ण करून देणार आहे का ?मग अशा वाऱ्याला लाथा मारून काय उपयोग ? त्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला पुराव्यानिशी संघटन बनवून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. सत्ताधार्याला वेठीस धरले पाहिजे. सार्वजनिक नुकसान केल्याने काही होणार नाही. उलट देशाच्या प्रगतीमध्ये तुम्ही अडथळा निर्माण करत आहेत. औद्योगिक, आर्थिक, मानसिक वृद्धीचे विनाशाचे कारण बनण्यापेक्षा देशाच्या विकासाचे भागीदार व्हा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपणच निर्माण करायचा आणि पुन्हा प्रश्न निर्माण करायचा कि जग खूप असुरक्षित आहे. पहिले आपण देशासाठी सुरक्षित आहोत का याचा विचार करणे गरजेचे आहे.
मित्रहो भडकवणारे गुपचूप आग लावतात आणि पेटून उठले कि परत विझवण्याच्या अविर्भावात उभे राहतात. म्हणजे पेटवणारा मी नाही असे भासवतात. डोके पेटवणारा तर वापरतो पण पेटणारा वापरतो कि नाही यात शंका आहे. समजून घेणे गरजेचे आहे. आणि विचार करणेही गरजेचे आहे.
-योगेश जाधव
[ शिक्षक , लेखक , कवी, ब्लॉग राईटर , युट्युबर , CSC ओनर ]
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या