मराठा समाजाला दिलेले आरक्षण नव्या आंदोलनाला जन्म देणारे नसावे
मराठा समाजाला दिलेले आरक्षण नव्या आंदोलनाला जन्म देणारे नसावे.
महाराष्ट्रात सध्या मागणी होत असलेले मराठा आरक्षण खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षणावर खूप काही चर्चा विचारणा होतांना दिसत आहे. परंतु भविष्यातील एक भीती हि समोर येतांना दिसते. ती म्हणजे जर मराठा आरक्षण दिले तर पुन्हा ज्या गटातून आरक्षण दिले त्या गटाचे पुन्हा नवे आंदोलन उभे राहण्याची. महाराष्ट्राच्या राजकारणातील ढवळाढवळ आणि सामाजिक अशांतंता जर पहिली तर नवा विकास बाजूला राहून फक्त वादच निर्माण होतांना दिसत आहे. मराठा आणि कुणबी या दोघ शब्दांचा जर शब्दशः विचार केला तर महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठा आहे. म्हणजे मराठा हा एका विशिष्ट इलाख्यात राहणाऱ्या माणसांसाठी रूढ झालेला शब्द आहे. तर कुणबी म्हणजे शेती आणि शेती आधारित उद्योग करणारा समुदाय आहे. म्हणून हे दोघाही शब्द जाती दाखवत नाहीत. ते एका समुदायाचे नेतृत्व करतात. आणि ज्यावेळी संपूर्ण समाजाचा विचार असेल तिथे समानतेच्या नियमाने सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत.
महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या स्थापनेचा जर इतिहास पहिला तर सर्व राज्य भाषेच्या आधारावर विभक्त झाली असून त्यांच्या स्थापनेचा तो मुल आधार दिसून येतो. मग एकाच गटात येणाऱ्या समाजाला पुन्हा नवीन दिशा दाखवून नवे वळण देवू नये. दोन समाज एकच असतांना आपसात त्यांना भांडायला लावणे म्हणजे मणिपूर वैगरे राज्यात झालेल्या प्रकाराला पुन्हा नवी उजळणी करून देणे होईल.
इंग्रजांनी जातांना देश स्वतंत्र झाला असे तर जाहीर केले पण धर्माच्या नावाखाली फोडले आणि त्यानुसार स्वतंत्र देशांची निर्मिती केली. पुन्हा देशात हस्तक्षेप चालू राहावा व अशांतता कायम राहावी जेणेकरून देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण व्हावा या हेतून केलेले हे विभाजन आजही त्रासदायक आहे. हा इतिहास पुन्हा त्याच रीतीने लिहिण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे ....
गोरे हकीम चले गए
अब आए हकीम काले
जहर तो वही है, लेकीन
बदल गए प्याले |
दोन समाज , दोन धर्म ,पंथ जाती आपसात लढवून चालवलेल्या हिंसाचाराला कोणत्या नव्या राजतंत्राचे उदाहरण म्हणता येईल बरे ?
हे ही वाचा : भडकणारे आणि भडकवणारे यांच्यातील भेद ओळखा.
मराठा आरक्षण देण्यासाठी काय करता येईल ?
सध्या महाराष्ट्रात पुढीलप्रमाणे आरक्षण आहे...
• अनुसूचित जाती (SC) (13%)
• अनुसूचित जमाती (ST) (7%)
• इतर मागासवर्ग (OBC) (19%)
• विशेष मागासवर्ग (SBC) (2%)
• भटक्या जमाती – A (विमुक्त जाती) (3%)
• भटक्या जमाती – B (2.5%)
• भटक्या जमाती – C (धनगर) (3.5%)
• भटक्या जमाती – D (वंजारी) (2%)
• आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS) – 10%
महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ६२ टक्के आरक्षण आहे.
याच आरक्षणात जर मराठा समाज बसवायचा असेल तर त्यांना ओबीसी मध्ये गणण्यात यावे. इतर आरक्षणातील काही अंश टक्के कमी करून ते ओबीसी मध्ये वाढ करावी. आणि नवीन त्यात हा समाज सामावून घ्यावा. हि टक्केवारी कमी जास्त करतांना सामाजिक समुदायाची संख्या विचारात घ्यावी. दुसरे म्हणजे आज त्यांना ओबीसी आरक्षण मिळाले असे जाहीर केले तर त्यात हि सर्वांना मिळाले आरक्षण असे म्हणता येत नाही. कारण जातीचे प्रमाणपत्र त्यांनाच मिळणार आहे जे ते सिद्ध करू शकतात. म्हणजे आज हि काही लीकांनी फक्त पुरावे दाखवले याचा अर्थ सर्व समाज त्यात बसतो असा होणार नाही. म्हणून इतर आरक्षण जातींनी हा गैसमज करून घेवू नये कि ते धोक्यात आले आहेत. म्हणजे हा मुद्दा कायमचा जर संपवायचा असेल तर सर्व पक्षीय गटाने एकत्र येवून याबाबतीतले सत्य समाजापुढे मांडावे आणि हा प्रश्न कायचा शांत करावा. जेणेकरून महाराष्ट्र उद्योग आणि विकासाच्या कामात लागेल. खिशात नाही आणा आणि योजनांचा दे दणाणा. हे पराक्रम करून आमचे सरकार किती चांगले हे दाखवण्याचा प्रयत्न राजनेत्यांनी करू नयेत. राजनेते किती सामान्य माणसाचे आहेत हे त्यांनी आधीच सिद्ध केल्यामुळे नवीन काही करण्याची गरज आहेच नाही. त्यांनी फक्त राज्याच्या विकासात लक्ष घालावे. खुर्चीच्या नादात आधीच महाराष्ट्राची वाट लावली आहे तेवढी पुरे !
खरे वास्तव म्हणजे हे आरक्षण मिळाले तरी त्याचा फायदा सर्वसामान्य गोरगरिबांना फायदा कमी आणि राजकारणी व श्रीमंतांना जास्त होणार आहे. आजवरच्या सर्व आरक्षण इतिहासाचा यासाठी संदर्भ घेवू शकतात.
-योगेश जाधव
[ शिक्षक , लेखक , कवी, ब्लॉग राईटर , युट्युबर , CSC ओनर ]
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या