मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

आरक्षण सोबत या प्रश्नांची उत्तरे पण सरकारने तयार ठेवावी

 आरक्षण सोबत या प्रश्नांची उत्तरे पण सरकारला तयार ठेवावी लागतील

महाराष्ट्र सोबत संपूर्ण देशात आरक्षण हा मुद्दा चांगलाच गाज्तांना दिसून येतो. काही वेळा तर त्याचा सरकारी कामकाज व भरती प्रक्रियेवर खूप मोठा परिणाम होतांना दिसतो. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला हा मुद्दा खूप चिघळतांना दिसत आहे. सरकारने आरक्षण देतांना सर्व मुद्द्यांवर विचार करूनच निर्णय घ्यावा. फक्त मराठा आरक्षण देवून सर्वत्र शांतता होईल या भ्रमात सरकारने राहू नये. कारण त्यासोबत इतर बरेच समाज घटक आंदोलनाची किंवा लढण्याची तयारी करत आहेत. म्हणून सरकारने खालील काही प्रश्नावर विचार करावा. 

आरक्षण सोबत निर्माण होणारे प्रश्न :

  • मराठा व कुणबी हे शब्द मुलखाच्या व कामाच्या प्रकारातून जन्म घेणारे शब्दप्रयोग आहेत. तर याधारे आरक्षण नियम ठरवलेले योग्य आहेत का ?
  • फक्त श्रीमंताला व नेत्याला पाहिजे ते जातीचे प्रमाणपत्र कसे आणि कोणत्या नियमाने मिळते ?
  • खोटे प्रमाणपत्र देण्यात जर सरकार माहीर असेल तर आरक्षण नावाखाली सर्वसामन्याला आपसात भांडत का ठेवले जाते ?
  • पैस्यांवर जातीचे व शैक्षणिक प्रमाणपत्र मिळत असेल तर नियमांचा जांगडगुत्ता का?
  • जर सरसकट आरक्षण द्यायचे असेल तर ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना कसे आरक्षण देणार ? कारण ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही. पण ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना सरसकट आरक्षण कसे देणार ?
  • सरसकट आरक्षण दिले तर उद्या उठून कोणीही कोणत्याही जातीचे आरक्षण मागतील ते सरकार देणार का ?
  • आरक्षण प्रमाणपत्र देवूनही सरकारी योजना  गरजवंतापर्यंत पोहोचत नाहीत. मात्र टेबलाखालून देणार्यांच्या नावे सर्व कामे होतात. याला सरकार काय म्हणेल ?
  • आरक्षण नेमके कोणाला पाहिजे आहे ?
  • सर्व आरक्षण रद्द करून नवीन एकच नियम लागू करता येईल का ?
  • जर कोणी टेक्स भरला नाही तर तो इन्कम टेक्स च्या रडारवर दिसतो. मग रोज जो मारतो, जो खर्च गरजवंत आहे, जो उपाशी मरतोय, जो सरकारी योजनांपासून वंचित राहतो, त्याच्या वाट्याच्या योजना बलवानांच्या घशात किंवा सत्ताधार्यांच्या घशात पडतात ते सरकारला का दिसत नाही?
  • जात पोट भरत नाही साहेब. पण जातीच्या नावाखाली सरकारी योजनांचा लाभ दिला जात नाही. का ? येथे त्या व्यक्तीची हलत का पहिली जात नाही ?
  • शिक्षण हा मुलभूत अधिकार केला तरी शाळेत प्रवेश घेतंना पहिले जात सांगावी लागते. मग शालेय पुस्तकांतून समानतेचे मुली का शिकवले जाते ? ते कितपत कोनात रुजू शकते ?
  • महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त भ्रष्ट्राचार वाढत चालाल आहे. प्रत्येक ठिकाणी वशिला काम करतो. ह्या अदृश्य शक्तीचे हात कोणाचे आहेत ?
  • हजारो लेकरे काहीना काही करणा निमित्त हुशारी असून सुध्दा मागे राहत राहतात. याला कोणती व्यवस्था कारणीभूत आहे ?
  • जातीयता , धर्मिक गोष्टीत सर्वांना गुंतवून , ऐनवेळी पैस्यांनी मतदार खरीदी करून, तरुणांना दारूच्या नादात अन नाचण्यात गुंतवून निवडणुका लढवणे कितपत योग्य आहे ? हा पैसा कुठून आला ? याची चौकशी का होत नाही ?
  • खुर्चीचे राजकारण सोडून महाराष्ट्राने केले काय ?
  • वर्तमानात दिलेले आरक्षण हे नव्या वादाला जन्म देणारे नसावे. असा सरकारचा काही समझोता सरकार कडे तयार आहे का ?
  • ह्या हातावरची तुरी त्या हातावर असे सर्व अशांतता निर्माण करणारे प्रश्न सरकार कधी मार्गी लावणार आहे ?
  • राज्यात दंगे भडकवणारे, आंदोलनांना हिंसक वळण लावणारे कोण याची यादी सरकार कडे आहे का ?
  • राज्याकडे पैसे नसतांना नवीन कर्ज करून योजना जाहीर करून आपले सरकार किती चांगले असे दाखवण्याचा प्रयत्न सरकार का करत आहे ?
  • फक्त महाराष्ट्रातच का आरक्षण हा मुद्दा व धर्म हा मुद्दा जास्त गाजतो ? याला खतपाणी घालणारे चोर कोण ?
  • कोणत्याही जातीतील व्यक्ती असो त्याची आर्थिक सक्षमता पाहून त्याचे जातीय आरक्षण काढता/ कमी करता येईल का ?
  • सर्व माहिती जर सरकारकडे जमा असते तर योजनामध्ये सेटिंग होणारे प्रकरण सरकारला का दिसत नाही ?
  • जात हीच जर त्या माणसाची ओळख असेल तर त्याची हुशारी व कौशल्याचे मोल काय ?
  • समजा जर आरक्षण दिले तर त्यांचे जात प्रमाणपत्र व्हेलीडेशन कसे होणार? जर ते सरळ रित्या मान्य केले तर बाकी जातींचे प्रम्न्पात्र काढतांना एवढे हेलपाटे का ? एकाच देशात नागरिकांसाठी असे वेगवेगळे नियम कसे लागू होतील ?
  • महाराष्ट्रात प्रत्येक छोट्या गोष्टीवर राजकारण होते. हे भडकवणारे महाराष्ट्र द्रोही कोण ?
हे आणि असे कित्येक प्रश्नावर मला वाटते सरकारने पुन्हा विचार करून आरक्षण हा मुद्दा कायम साठी बंद करावा. त्यावर समाधनाचा तोडगा काढावा.

-योगेश जाधव 
[ शिक्षक , लेखक , कवी, ब्लॉग राईटर , युट्युबर , CSC ओनर ]

Home page  : click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 


Whatsapp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा