MPSC मधील काळा बाजार : उमेदवारा व त्यांच्या समस्या
MPSC ही महाराष्ट्र शासन व्यवस्थेतील क्लास १ अधिकारी पुरवणारी अथवा निवडणारी महत्वाची संस्था. परंतु या परीक्षेच्या नोदानिपासुंचा भोंगळ कारभार पहिला की असे वाटते शासनाला नोकर्या द्यायच्या नाहीत अथवा उमेदवारांना फक्त अडचणीत टाकून काही ना काही कारणानिमित्त फक्त फक्त पैसा गोळा करण्यात रुची आहे. महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही पोर्टलवर खूप काही समस्या येतात. या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नीट काम करत नाही. कोणताही फोन वेळेवर लागणार नाही. कोणताही रिप्लाय दिला जाणार नाही. मग अशा सोयीस्करपणे उमेदवारांच्या संध्या त्याला न कळू देता काढून घेतल्या जातात. महाराष्ट्रातील हुशारी फक्त खुर्च्या ओढन्यातच वापरले जात आहे. अथवा तशी शासनाची इच्छा दिसत आहे.
MPSC मार्फत काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी मी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीपासूनच एवढ्या समस्या आहेत की तीन ते चार दिवस पासून प्रयत्न करून फॉर्म भरला जात नाहीय. MPSC विभागाला कॉल आणि इमेल ने संपर्क करून देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग ही व्यवस्था उभी का केली आहे? हे शासनाला हे ही चालवणे जमत नसेल तर खाजगी कंपन्याना याचाही कंत्राट देऊन टाका. म्हणजे तुमचे खिशे कोणत्यातरी कारणानिमित्त पूर्ण भरतील.
कॉन्स्टेबल पदाच्या २४३६९ जागांवर भरती प्रक्रिया शुरू.
MPSC पोर्टलवर येणाऱ्या समस्या अथवा त्रुटी :
- उमेदवाराला तुमचे लहानपणाचे नाव काय ?, तुमच्या माध्यमिक शिक्षकाचे आडनाव काय ? यांसारखी फालतू माहिती विचारली गेली आहे. ज्याचा नियुक्तीशी कोणत्याही टप्यावर काहीही सबंध नाही.
- इमेल वरचा ओटीपी लवकर येत नाही. येतो तर स्पाम विभागात येतो. शासकीय पोर्टल असून वेबसाईट सुरक्षितता व डाटा गोपनीयतेची भीती आहे.
- दिलेल्या फॉर्म मध्ये विकल्प सिलेक्ट होत नाहीत. दोन तीन वेळा प्रयत्न करावे लागतात.
- शिक्षणक्रमातील काही युनिव्हर्सिटी / विद्यापीठांचे / विभागाचे नाव दिलेले नाहीत.
- उमेदवाराला गोंधळात टाकणारी माहिती आहे.
- टक्केवारी / CGPA लिहितांना दशांश चिन्ह येत नाही. अथवा सिस्टम त्याला परवानगी देत नाही. मग दशांश रुपात असलेले CGPA कसे लिहावेत ?
- एकदा क्लिक केल्यावर पर्याय सिलेक्ट होत नाही. आणि जर चुकीचा पर्याय सिलेक्ट झाला तर तो बदलत नाही.
- पेमेंट करतांना तांत्रिक अडचणी खूप येतात. कधी मध्येच पेमेंट कट होऊन जाते. तर कधी पेमेंट केल्याची स्लीप जनरेट होत नाही. पेमेंट स्टेटस अद्ययावत लवकर होत नाही.
- जाहिरातीत पूर्ण माहिती दिली जात नाही. या पत्रकानुसार त्यानुसार असे शब्दप्रयो वापरून अजून गोंधळ केला जातो.
- संपर्क केल्यावर तो होत नाही. अथवा कोणताही रिप्लाय मिळत नाही.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या