आजच्या आंदोलनाचा नेता उद्याच्या खुर्चीची व्यवस्था करतोय
आजच्या आंदोलनाचा नेता उद्याच्या खुर्चीची व्यवस्था करतोय
मित्रांनो,आजपर्यंत कित्येक आंदोलने आणि संप झाले असतील. काहींनी राजकीय दृष्टीकोनातून तर काहींनी इतर काही कारणास्तव या संपाना व आंदोलनांना पाठिंबा दिला. काहींनी आगीत तेल ओतले तर काहींनी ही आग विझवण्याचे सोंग केले. माझ्या अनुभवाप्रमाणे आणि अभ्यासानुसार आजपर्यंत ज्याही राज्यात आणि प्रदेशात अशी आंदोलने आणि संप झाले त्या प्रत्येक आंदोलनाचा नेता हा भावी खुर्चीच्या शोधातच असतो हे निश्चित !
कित्येक नवे चेहरे आले आणि गेले. पण थोडं मागे वळून पाहिल्यास लक्षात येईल की जी भाषा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणारा वापरत होता ती भाषा खुर्ची मिळाल्यानंतर बदलली हे सत्य नवे नाही. तरीसुद्धा आम्ही मात्र अशा नेत्यांच्या मागे लागून आपली कामे सोडून फुकट हिंडतो यापेक्षा मूर्खपणा दुसरा कोणता असेल ? एखाद्या प्रश्न उभा करायचा, त्या प्रश्नावर लोकांना पेटवायचे , आपण त्याचा पुढाकार घ्यायचा, प्रत्येक तालुक्याला - जिल्ह्याला - गावाला सभा घ्यायची, थोड प्रसिध्द व्हायचे, मग लगेच भावूक करून आपणच त्या समाजाचे तारणहार आहोत असे भासवायचे, खुर्ची मिळवायची, अन आपल्या पुढच्या सर्व पिढ्यांच्या उध्दार करून घ्यायचा . हे समीकरणच झाले आहे. खरे पाहता कोणाला देशाची , समाजाची , नात्यांची कशाचीही पर्व नसते.
बरे, सत्तेवर आल्यानंतर योजनांचा पाढा वाजवायचा, त्यासाठी अमाप पैसा उकळायचा. बाकी खिसे भरायचे, अन अजून पुढच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची. हे राजकारण ठरलेले आहे. खरे राजकारण व समाजकारण कोणाला करायचे नाही. योजनांचा पाढा वाचला तरी ते स्वतःच्या घरून द्यायचे नाहीत. मग त्यासाठी देश विकावा लागला तरी चालेल.
ही सत्तेची गणिते सोडतांना भुकेची गणिते कशी बाजूला केली जातात ? हे समजण्याजोगे आहे.
- योगेश जाधव
शिक्षक, लेखक, कवि, ब्लॉग राईटर, यूट्यूबर
हे पण वाचा :
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
Follow on twitter : click here
टिप्पण्या