मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

राज्य वीज वितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागा

राज्य वीज वितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागा


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील "विद्युत सहाय्यक" पदाची वेतनगट -४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. "विद्युत सहाय्यक" या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना "तंत्रज्ञ" या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. 

विद्युत सहाय्यक पदांच्या ५३४७ जागा :

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी/ तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCVT) यांनी विजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिक सेक्टर) प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

वयोमर्यादा -  उमेदवाराचे वय २९ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई. डब्ल्यू. एस.)/ खेळाडू / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग / माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष सवलत आहे.)

फीस - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये तसेच मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ई. डब्ल्यू. एस.)/ खेळाडू / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२५/- रुपये (जीएसटी वेगळी) फीस आकारली जाईल.

मानधन:-

  • निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल.
  1. प्रथम वर्ष - एकूण मानधन रुपये १५,०००/-
  2. द्वितीय वर्ष - एकूण मानधन रुपये १६,०००/-
  3. तृतीय वर्ष - एकूण मानधन रुपये १७,०००/-

  • उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.
  • "विद्युत सहाय्यक" या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना "तंत्रज्ञ" या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०- ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.
महत्वाच्या तारखा :
  • ऑनलाईन अर्ज सादर करण्यायची शेवटची तारीख (मुदतवाढ) - 20/05/2024
सविस्तर जाहिरात : Click Here 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : Click Here 

Home page  : click here 
                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here


Whatsapp channel : click here


Follow on twitter : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा