छत्रपती शिवाजी राज्यांच्या हिंदवी स्वराज्याचा आपण चुकीचा अर्थ लावलाय
छत्रपती शिवाजी राज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले : आपण हिंदवी चा अर्थ चुकीचा घेतला
माझ्या समझदार देशवासियांनो आपण बऱ्याच गोष्टींचा आपल्या बुद्धीप्रमाणे चुकीचा अर्थ लावून सर्व समाज आणि आपले जीवन संकुचित करून टाकत आहोत. मला अशा च काही गीष्टींवर प्रकाश टाकावा असा वाटतोय. कारण माझा उद्देश केवळ मानवात निव्वळ माणुसकी निर्माण करण्याचा आहे. जी आज माणूस विसरलाय. मी या महान भारतभूमीत जन्माला आलो; आणि त्यातल्या त्यात रयतेचा खरा विचार करणाऱ्या राज्यांच्या स्वराज्यात जन्मलो हे माझे सद्भाग्य. परंतु माझ्या राज्यांनी दिलेल्या स्वराज्याच्या शिकवणीतून आम्ही फार काही घेवू शकलो नाही. आणि थोडीशी हाताशी सापडलेली चिंधी घेवून शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे वारसदार बनायला निघालो हीच मोठी शोकांतिका आहे.
महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कुठेही जात किंवा धर्म आडवा येतांना दिसत नाही. मग आम्ही माणसात आणि धर्मात भेद पाडून एकमेकांच्या जीवावर उठलो आहोत; याचा आपल्याला काय अधिकार ? "मानव तितुका एकची मानावा" ही संतांची शिकवण नुसती कागदावर भिनलेली ठेवून कशी चालायची ?
अरे बाबांनो ! शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात अठरा पगड जाती, बारा बलुतेदार अन सर्व धर्माचे लोक एकत्रित रित्या आनंदाने वास करत होते. त्यांना या लोकांविषयी किंचितही द्वेषभाव नव्हता. मग हा द्वेषभाव निर्माण झाला कसा ? कोणी केला ? याला जबाबदार कोण ? माझ्या तमाम बांधवांनो / बघिनिंनो "हिंदवी" या शब्दाचा अर्थ हिंदुस्थानातील स्वतःचे राज्य, जेथे त्या राज्यात राहणारा प्रत्येक जन या राज्याचा राजा असेल असे स्वतःचे राज्य .असा अपेक्षित आहे. तो केवळ हिंदूंचे राज्य, मराठ्यांचे राज्य, मुस्लिमांचे दुश्मन, ठराविक धर्माचे प्रणेते असा मर्यादित, संकुचित अर्थ नाही. अगदी बाराव्या शतकात भारतात स्थायिक झालेले तुर्की मुसलमान सुद्धा) त्यांच्या विरोधात एका स्थानिक शक्तीने उठवलेला आवाज म्हणजे हिंदवी स्वराज्य. हिंदू आणि हिंदवी शब्द एकसारखे वाटत असले तरी ते वेगळे आहेत. थोडक्यात हे दोन शब्द एकाच नाण्याच्या दोन (पण वेगवेगळ्या) बाजू आहेत. न्यायालयीन निकालाप्रमाणे: सिंधु चा अपभ्रंश हिंदु हाही एक आधार आहे . सिंधु नदिच्या आसपास विकसित झालेली संकृती ती हिंदु संस्कृती. त्यामुळे माझे मत विचाराल तर हिंदवी स्वराज्य हे मुळच्या लोकांचे राज्य त्याला धर्म जात पात कसलेही बंधन नाही . आणि विशेषतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणुन आपण शिवाजी महाराजांच जे स्वराज्य आहे ते त्याचे उत्तम उदाहरण आहे . शिवाजी महाराज कोण्या धर्माविरुद्ध लढले नाहीत तर परकीय शक्तींविरुद्ध लढले . हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या स्वराज्याचा अपमान करायला नको. त्यांनी दिलेल्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावायला नको. हे एक उदाहरण देवून पटवून देता येईल. कारण असे अनेक शब्दांचे चुकुचे अर्थ आपण घेतले आहेत. 'वेदांमध्ये ३३ कोटी देवदेवता असा उल्लेख आला आहे. येथे काही महा पंडितांनी / भाषांतरकारांनी चुकीचा अनुवाद केला आहे. आणि त्यांनी आपल्या वर्णनात कोटी या शब्दाचा अर्थ करोड असा घेतला आहे. जो सर्वथा चुकीचा आहे. दिसायला व सरळ अर्थी जरी दोन्ही शब्द सारखे वाटत असले तरी त्यात खूप फरक आहे. ३३ कोटी या शब्दाचा अर्थ आहे कि ३३ प्रकारचे उच्च / महान देवदेवता. ज्यात आठ वसु , अकरा रुद्र, बारा आदित्य आणि दोन अश्विनीकुमार (काही ठिकाणी याचा उल्लेख इंद्र व प्रजापती असा आहे ) यांचा समावेश आहे. असेच हे हिंदवी स्वराज्याचे आहे. आहे त्यापेक्षा दुसरा अर्थ घेवून सारे फिरताहेत. काही राजकारणासाठी त्याचा उपयोग करताहेत. आणि आंधळी प्रजा या धूर्त राजकारण्यांच्या जाळ्यात अडकत चालली आहे. ज्यांना रयते पेक्षा आपली खुर्ची प्रिय आहे. ज्याला आपल्या प्रजेसाठी आपला प्राण देण्याची त्यागी भावना, प्रजेच्या रक्षणाची खात्री देतो तो खरा राजा. त्याला इतर आश्वासने देवून आणि लालच दाखवून निवडून येण्याची गरज च नाही. प्रजा त्याची निवड न सांगता करेल. पण तुमच्यात तेवढी लायकी आहे का ? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
महाराजांनी शत्रूला सुध्दा मित्रत्वात रुपांतर केले. रयतेला शिस्त लावली. एक श्रेष्ठ राज्य निर्माण केले. आपण म्हणजे सध्याच्या राजकारण्यांनी आणि प्रजेने इतिहासातील काही गोष्टीचा बोध घेवून आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उज्वल करून घ्यायला हवा . तरच नवीन स्वराज्य निर्माण होऊ शकते अन्यथा फक्त बोंबलत बसण्याखेरीज काहीच उरणार नाही. मायमाउलींनी काही संस्कृतीचे बंधने ठेवावीत. मी असे म्हणत नाही कि त्यांनी चूल आणि मुल सोडून काही करू नये. पण प्रत्येक बंधू आणि बघिनींनी आपली मर्यादा पाळावी हीच अपेक्षा! आपण रस्त्याने चालतांना माय नजरेला पडावी, मादी नाही. एवढे प्रकाशित व्हावे की आपल्याल्यामुळे एखाद्याला त्याच्या अंधारमय जीवनात प्रकाश पसरवा. आणि एवढ तप्त पण व्हावे की हात लावला तर हाथ जाळून खाक व्हावा. हे ज्यादिवशी माउलींना जमेल त्यादिवशी प्रकाशाचा सूर्य उदय होण्याशिवाय राहणार नाही.
माझ्या शिवाजी राज्यांच्या शिकवणीचा एक जरी मुद्याचे पालन केले तर सुराज्य आणि स्वराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. मला आशा आहे की आपण माझ्या विचारांवर नक्की विचार कराल. हिंदवी चा योग्य अर्थ समजाल. राज्यांच्या योग्य नीतीचा आणि धर्मनिरपेक्षतेची योग्य शिकवण घ्याल. उद्याचा शिवराय आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी आजची जीजाऊ आणि शहाजी राजे निर्माण व्हायला अन करायला विसरू नका. याला तुमच्या सर्वांची मदत नक्की लागणार आहे. तुम्ही ते करू शकतात जे जगात इतर कोणी करू शकत नाहीत. जय शिवराय !
- योगेश जाधव
शिक्षक, लेखक, कवी. ब्लॉग राईटर, युट्युबर
टीप : आपले वैचारिक मतभेद असल्यास योग्य शब्दात कमेंट करून कळवावे.
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या