Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 online form : maharashtra
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : महाराष्ट्र
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवक, वारकरी, अल्पसंख्याक सर्वच वर्गांसाठी घोषणा केल्या. अशातच अर्थसंकल्पात सरकारनं महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे, 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' (Chief Minister Ladki Bahin Yojana). या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासूनच राज्यभरात याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. त्यानंतर अनेक त्रुटी दूर करून नव्या बदलांसह या योजनेचे निकष पुन्हा जाहीर करण्यात आले. आता या योजनेसाठी नव्या नियमानुसार अर्ज करायचे आहेत.
अनेक महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नाही, तर काही जणींकडे जन्म दाखला नसल्यानं अर्ज करता आलेला नाही. पण आता चिंता करण्याची गरज नाही. सरकारकडून अटी-शर्थी बदलण्यात आल्यामुळे या कागदपत्रांऐवजी इतर ओळखपत्र आणि कागदपत्र देऊन तुम्ही झटपट आणि अगदी सहज या
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहात.
अर्ज करण्याची मुदत :
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत वयवर्ष 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात. या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
योजनेतील काही महत्त्वाचे बदल :
- 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
- 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, मात्र कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही.
- या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वर्ष अशी करण्यात आली आहे.
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
- या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे.
- महत्त्वाची बाब म्हणजे, मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे.
योजनेसाठीची पात्रता :
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
योजनेसाठी कोण पात्र नाही :
- 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
- घरात कोणी Tax भरत असेल तर
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
- कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
अर्ज भरताना लागणारे कागदपत्रे :
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचं प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज कुठे आणि कसा भरायचा?
योजनेसाठीचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅप /सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना फॉर्म व हमीपत्र : click here
अन्य सरकारी योजना :
- (45 से 65 के व्यक्ति ) भरे 8 साल 16 लाख और पाए 52 लाख + अपने भरे हुए 16 लाख वापस टेक्स फ्री |
- साल का 1 लाख प्रीमियम भरो 23 साल और 23 लाख के साथ आगे जब तक जिओगे तब तक पाए हर साल 2 लाख. (लगबग 2 करोड़ )
- प्रधानमंत्री उज्वला गैस योजना
- आयुष्मान भारत कार्ड योजना
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लोन
- प्रधानमंत्री मुद्रा लोन
- सुकन्या समृध्दि योजना
- किसान सम्मान निधि योजना
- सोलर रूफटॉप योजना
- Gujarat Public Schemes : સરકારની જાહેર યોજનાઓ
- શિક્ષણ વિભાગની મહત્વની યોજનાઓ pdf
Home Page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
टिप्पण्या