माझं नेमकं चुकतं कुठे ?
माझं नेमकं चुकतं कुठे ?
मित्रहो, अलीकडे स्त्रींवरील /मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. या सर्व घटना मनाला खूप दुःख देणाऱ्या असतात. एवढा आदर्शवत समजला जाणारा माझा भारताचा समाज एवढा खालच्या दर्जाचे वर्तन कसे करू शकतो? हा एक विचारणीय प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. या सर्वच घटनांमागे काय सत्य परिस्थिती असते? खरोखरच या घटना जसे दिसतात तशा असतात की; त्यांचे वास्तव वेगळेच असते या घटनांना जबाबदार कोण आहे? यात समाज कुठे चुकतो? मुलं कुठे चुकतात? मुली कुठे चुकतात? हा सर्व बारीक अभ्यासाचा विषय आहे. आणि ज्यावेळी आपण याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेला सर्वच रोगाचे माहेर आपण स्वतः आहोत हे आपल्या निश्चित लक्षात येईल. हे ऐकायला जरी कडवट वाटत असलं तरी सुद्धा ते तेवढेच कटू सत्य आहे हे विसरायला नको. अशा या घटनांमागील अनेक कारणांचा आणि आपण कसं वागलं पाहिजे? किंवा मी कसं वागू? हे प्रश्नाचे उत्तर आपल्याला या दिव्यांची मिळेल अशी आशा आहे. म्हणून आपण सर्वांनी हे पूर्णतः विचारपूर्वक आणि योग्य दिशा , शांत डोके ठेवून वाचावे व मनन करावे आणि त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. समाजात योग्य बदल व्हावा आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षिता अबाधित व्हावी हाच एक मूळ विषय डोळ्यासमोर ठेवून हे लिखाण केलेले आहे.
मुलींनी कसे वागावे ?
गाव म्हटलं की त्याला वेशी येतात. गावाच्या वेशीवर एक मंदिर असतं. ज्याला आपण ग्रामदेवता असे समजतो. गावात एक प्रथा असते की संध्याकाळी दररोज गावातील लोक श्रद्धेनं आपल्या ग्रामदेवतेला दिवा लावण्यासाठी जातात. तिथे एक मोठं समई असते. त्या समय मध्ये सर्वजण येऊन थोडे थोडे तेल घालतात. ग्रामदेवतेला नमस्कार करून माघारी फिरतात. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की, त्या ठिकाणी ते लोक त्या समई तेल टाकतात ती समय तेवत राहते. कशासाठी? कारण मंदिरातील भगवंत सर्वांना दिसावा हे त्यांचे प्रामाणिक अपेक्षा असतेल; परंतु, तो दिवा तेवत असताना जर आपण त्याला त्याच्या ज्योतीला मुठीत घेण्याचा प्रयत्न केला तर तो विझेल आणि यामुळे दोन परिणाम होतील एक तर हाताला चटका लागेल आणि दुसरं म्हणजे तो दिवा ती समई बंद होईल आणि मंदिरातील भगवंत कोणालाही दिसणार नाही. अगदी तसं मुलींनी देखील, स्त्रियांनी देखील एवढे प्रकाशित व्हावं, स्वयं तेजस्वी व्हावं की आपल्यामुळे समोरच्याला रस्ता दिसला पाहिजे. मार्ग दिसला पाहिजे. पण, जर आपल्याला मुठीत घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचा हात जळाला पाहिजे. एवढं तुम्हाला जमलं तर या जगात कोणीही तुमच्या वाट्याला येणार नाही. आणि कोणीही, कोणतीही अत्याचार तुमच्यावर करणार नाही याची गॅरंटी आहे. परंतु, आपण ती वस्तू किती प्रामाणिकपणे करतो? अथवा त्या समई प्रमाणे आपल्या जर गुण असतील तर कोणतीही वाईट प्रसंग तुमच्याजवळ कधी येणार नाही.
मुलींनो चालताना असं चाला की, समोरच्याला आई किंवा बहीण नजरेत पडावी. चालताना त्याच्या नजरेला एक मादी नजरेस येऊ नये याचं भान ठेवा. समोरच्यालाही भावना असतात आणि आपण त्याच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग नियमाप्रमाणे दोघांच्या हातातून काहीतरी वेगळं घडणार आणि त्याला समाज वेगळे नाव ठेवेल. तुम्ही या जगात राहावं की जावं? या प्रश्नाचे उत्तर शोधत फिरणार. मुलगा असो की मुलगी निसर्गात: त्याच्यात परिपक्वता येते. विभिन्न लिंगाची आकर्षकता निर्माण होते आणि निसर्ग नियमाप्रमाणे आपल्या शरीराची भूक भागवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात यते/असते. म्हणून आपण कोणाचा मुलगा असो की मुलगी आपण चालताना, बोलताना, बसताना, उठताना कोणाच्या लैंगिक अथवा नैसर्गिक भावना दुखावल्या जाणार नाहीत अथवा त्या उत्तेजित होणार नाहीत याप्रमाणे वर्तन ठेवल्यास आपण कोणतेही वस्त्र धारण केलं अथवा आपण कोणत्याही ठिकाणी गेला तरी कोणत्याही पद्धतीचा वाईट कृत्य तुमच्या सोबत कधीही घडणार नाही.
जर मुलींना जर तुम्ही सर्व नीटनेटके राहून देखील जर तुमच्या सोबत असा काही प्रसंग घडत असेल तर, त्या वेळेला हे सुद्धा लक्षात ठेवा; एखाद्या मुलगा तुम्ही न पाहता किंवा दुर्लक्ष करता देखील तुमच्याकडे परत परत पाहत असेल अथवा वाईट दृष्टिकोन तुमच्यावर त्याचा असेल तर फक्त वर नजर करून एकदा त्याच्याकडे पूर्ण भर नजरेने पहा आणि त्याचे मान जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत त्याच्याकडे पहा. त्याने एकदा मान खाली घातली तर गॅरंटी देऊन सांगतो आयुष्यभर तो तुमच्यासमोर येताना कधीही मान वरून करून येणार नाही. पण यात जर तुम्ही स्वतः हसलात अथवा तुम्ही स्वतः त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर मात्र चूक त्याची नाही तुमची आहे हे लक्षात ठेवा.
गुड टच बॅड टच :
मुलींनो तुम्हाला स्पर्श करणार्याचा भाव व स्पर्श कसा आहे. व तुमचे मन त्यावर कसा विचार करते यावर हे अवलंबून असते. शिक्षक, जेष्ठ लोक, पालक यांचा स्पर्श सहसा वाईट नसतो. त्यातील भाव हा चांगला असायला हवा. परंतु जर तुम्हाला यात काही वेगळे जाणवले तर जोरात ओरडणे, त्याचा प्रतिकार करणे, स्प्रे मारणे, मिरची पावडर फेकणे, प्रसंगी शारीरिक कराटे फटके मारणे इत्यादी उपयोग करून आपली सुरक्षा करावी. घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या पालकांना न घाबरता सांगावी. आपल्या सांगण्यात वास्तवता असावी. आपल्या माहितीसाठी येथे काही स्पर्श दिले आहेत ते पहा :
मुलींच्या चुका :
- नको त्याच्याशी मैत्री करणे नको. त्या ठिकाणी प्रेमाचे धडे गिरवणे.
- सुट्टीच्या दिवशी क्लासचे नाव सांगून आपल्या मित्रांसोबत वेळ वाया घालवणे.
- मित्रांसोबत हॉटेल, बगीचे इत्यादी ठिकाणी मनसोक्त वावरणे.
- अनावश्यक साहित्य किंवा व्हिडिओ आणि अपूर्ण माहिती घेऊन त्याच्या उत्सुकतेपोटी काहीतरी चुकीचे शोधणे.
- घरात आपल्या आई-वडिलांशी मनमोकळे न बोलणे.
- चांगले आणि वाईट समजत असताना देखील त्या रस्त्याला जाणे.
- ज्या दिवशी आपल्या घरी आपले खरे स्वरूप कळते त्या दिवशी आपण स्वतः काहीच केले नाही असा देखावा करणे.
- आपल्यामुळे दुसऱ्या मुलांचे आयुष्याचे वाटोळे करणे.
- मी स्त्री आहे आणि माझ्याच बाजूने कायदा लागू होईल त्यामुळे मनसोक्त वावरणे. परंतु कायद्याने तुमच्यासोबत इतर सर्वांना संरक्षण दिले आहे याचा विसर पडणे.
- कायद्यांचा चुकीचा वापर आणि समज मनात ठेवून पटेल किंवा वाटेल तसे वागणे.
- इतर अनेक चुका आपल्या हातून नकळत होतात. जे इथ सांगणे योग्य वाटत नाही.
पालकांच्या चुका :
- मुलींच्या/मुलांच्या वह्या, मोबाईल, त्यांनी घालवलेला वेळ या मागचा मागवा न घेणे.
- सुट्टीच्या दिवशी कोणता क्लास व कुठे चालू असतो याचा तपास न करणे.
- वहीच्या शेवटच्या पेजवर कोणता अभ्यास केलेला असतो ते न पाहणे.
- मोबाईल मध्ये सांकेतिक भाषेमध्ये सेव असलेले नंबर कोणाचे ते न तपासणे.
- आपला मुलगा/मुलगी मोबाईल अथवा इतर सोशल मीडियामध्ये कसा वावरतो ते न पाहणे.
- मला काही येत नाही माझ्या मुलाला खूप येतं असं सांगून त्यांच्या हातात सर्रास मोबाईल अथवा इतर गोष्टी मनमोकळेपणाने देणे.
- मुलांना आवश्यकतेपेक्षा जास्त लाड करणे.
- प्रत्येक वस्तू वेळेच्या आधी उपलब्ध करून देणे.
- शैक्षणिक महत्त्व न पटवून देणे.
- शाळेत शिक्षा झाल्यावर मुलांसमोर शिक्षकांना ओरडणे.
- मुलांच्या वाईट कृत्यांवर आळा घालण्याऐवजी त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन देणे.
- पती-पत्नी भांडणातील अनावश्यक परिणाम.
- आई-वडील यांच्या वैयक्तिक हालचाली अथवा बोलणे याचे भान न राहणे आई-वडिलांचे प्रायव्हसी नसणे.
- मुलांना आपल्या जवळ घेऊन त्यांच्या लैंगिक अथवा सामाजिक भावना न समजणे.
- आपल्या मुलांशी मित्रत्वाचे संबंध नसणे.
- मुलांसाठी पुरेसा वेळ न देणे.
- कौटुंबिक वातावरण प्रेमाचे अथवा भावनिक नसणे.
- घरातील जेष्ठ व्यक्तींचा अथवा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष.
- मुलांच्या आधुनिकतेवर लक्ष नसणे.
- मुलं लहान असताना छोटे कपडे नीट दिसतात. पण ते जसे मोठे होतात तसे त्यांचे कपडे छोटे होतात. त्यांना वयानुरूप त्याचे महत्व न पटवून देणे.
- आई-वडिलांनी अशा गोष्टीना सर्रासपणे पाठबळ देणे आणि त्याला आधुनिकतेचे नाव देणे.
- आपल्या मुलांचे हेअर स्टाईल त्याचे राहणं, बोलणं इत्यादींवर अंकुश नसणे.
- आपल्यासमोर मुलांना फोनवर बोलता येत नाही. पण आपल्या मागाहून ते तासनतास फोनला चिटकून असतात नेमका फोन कोणाचा आणि काय हे पाहायला वेळ नसणे.
- नको त्या ठिकाणी काही पालकांचा अति शंकेखोर स्वभाव.
मुलगा समोरून एकाएकी मुलीला कधीही विचारणार नाही अथवा तिचे नाव घेण्यास विचार करेल. परंतु मुली मात्र सर्रासपणे मुलांजवळून जाताना अथवा आपल्या मनमानीने वागताना दिसतात. आणि त्यातून पुढे ते प्रेम संबंध मित्र संबंध इत्यादी वस्तू निर्माण होतात. आणि घरी माहिती पडले तर मात्र मुलगी अल्पवयीन ठरते हे समाजातील एक विघातक सत्य आहे. मी उच्च माध्यमिक चे आठ वर्ष वर्ग सांभाळले त्यामुळे हे अनुभवले आहे. बर्याच गोष्टी घरी माहितच नसतात. पण पालक आमची मुले तशी नाहीत असे ठासून सांगतात. मुलाबरोबर फिरणे, हॉटेलला जाणे, बगीच्यात फिरणे, त्याने दिलेल्या वस्तू मैत्रीनीने दिलेल्या आशा सांगून घरी पोहोच करणे, खर्चायला पैसे मिळवणे, रिचार्ज मारून घेणे अशा सर्व गोष्टी आपल्याला चालतात. मग ज्यावेळी या गोष्टी घरात अथवा समाजाला माहिती होतात त्यावेळेला आहे तशाच जर सांगितल्या तर अनेकांचे आयुष्य वाचेल. आणि समाजातील हिंसक वृत्तीतून काही अंशी मुक्तता मिळेल. आपल्यामुळे जर कोणाचा जीव जात असेल आणि जर तुम्हाला त्याचा आनंद होत असेल तर आयुष्यात लिहून ठेवा तुम्ही कधी सुखी होऊ शकत नाहीत. प्रेम आणि हिंसा या दोघे विरुद्ध गोष्टी आहेत. जिथे प्रेम असते तिथे हिंसा होऊ शकत नाही. जे हिंसा व्हायला किंवा घडायला तयार होते ते प्रेम असू शकत नाही. म्हणून प्रेमासाठी काही पण हा फुकटचा दावा कधीही करू नये. अथवा वाईट रस्ता कधी धरू नये. तुम्ही स्वतःमध्ये एवढं स्किल निर्माण करा की तुमच्या प्रेमात जग पडले पाहिजे. तुम्ही जगाच्या प्रेमात पडले नाही तरी चालेल. जेव्हा करिअर करण्याचे आयुष्य, वेळ असते तेव्हा नक्की करिअर करा मित्रांनो. फुकटचे मार्ग पकडून आपल्या आयुष्याच्या वाटोळे करू नका. कारण दिवसेंदिवस परिस्थिती खूप वाईट येणार आहे आणि यात जर तुम्हाला टिकायचं असेल तर फक्त आणि फक्त आपला मार्ग आपण शोधा. इतर काय करतायेत याकडे दुर्लक्ष करा. आपल्याला ते मार्ग आकर्षक करत असले तरीसुद्धा त्याकडे जाऊ नका. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून तुमचा मार्ग निश्चित कराल तेव्हाच तुम्ही या जगात यशस्वी व्हाल. जगामध्ये तुम्ही किती कोटी रुपये कमावलेत किती? बंगले बांधलेत? हे जगाच्या नकाशात कुठेही दिसत नाहीत. जर दिसत असेल तर तसं मला सांगा. परंतु मित्रांनो तुम्ही जे काही कराल त्या कर्तृत्वातून जे व्यक्तिमत्व विकास होईल, ते व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यातून नक्की दिसेल हे निश्चित! म्हणून जगात जे संपते, दिसतच नाही त्या संपत्तीसाठी हेवेदावे, हिंसा, दुःख करू नका. परंतु जे संपत्ती या जगामध्ये दिसणार आहे त्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा तुम्हाला जग शोधायला जायची गरज नाही, जग तुम्हाला शोधत तुमच्याकडे येईल हे लक्षात ठेवा. आयुष्य एकदाच मिळतं मनसोक्त जगा आनंदी जगा. आयुष्याची जी वर्ष मेहनत करण्याचे आहेत त्यात पुरेपूर मेहनत करा. नंतर तुम्हाला बाकीचे आयुष्य रडत काढण्याची गरज पडणार नाही. अन्यथा जे आयुष्य तुम्ही मेहनत करण्यात घालवायचं होतं त्याच आयुष्यात तुम्ही असे रिकामे काम करत बसणार तर पुढचे वर्ष कसे जातील? हे मोजायला देखील कोणी उरणार नाही हे लक्षात घ्या. आणि शेवटी कितीही सांगितलं तरी तुम्ही जे मनाला पटणार ते नक्कीच करणार परंतु माझी सर्वांना विनंती आहे की, आपण या सर्व गोष्टीमुळे एकदा विचार करा की आपण म्हणता; आम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, आम्ही आमचा जीवनसाथी निवडू शकतो, आम्हाला ते निवडण्याचा हा अधिकार आहे, न्यायालयही त्याला प्रतिसाद देत की मुलं 18 व 21 वर्षाची झाली की त्यांच्या साथीदार निवडतील. यात आई-वडिलांचा हस्तक्षेप देखील घेतला जात नाही किंवा परवानगी सुद्धा घेतली जात नाही. (अलीकडच्या काळात हा बदल होतोय - आईवडिलांची परवानगी आवश्यक ) तुम्ही नक्कीच निवडू शकतात परंतु तुम्हाला ज्या आई-वडिलांनी त्या 21 वर्षापर्यंत पोसले, त्यांनी जी हाडाचे काड केली, त्यांनी जी मेहनत केली, ज्या मेहनतीतून तुम्हाला मोठं केलं, ज्या घासातून घास तुम्हाला भरवला, त्याची किंमत तुम्ही त्यांना खाली मान घालून मोजायला लावतात हे कितपत योग्य आहे? जसं तुम्ही म्हणतात की, आमच्या आयुष्य ठरवणारे ते कोण? तसं तुम्हाला त्यांचा आयुष्य वाटोळा करण्याचा अधिकार कोणी दिला? तुमच्या अगोदर ते जन्माला आले होते. त्यांनी तुमच्याहून चार पावसाळे जास्त काढलेले आहेत आणि शेवटी तुम्ही त्यांचे मुलं आहात. ते तुमचे कधीही वाईट चिंतनार नाही याची खात्री ठेवा. ज्या गोष्टी पटत नसतील त्या सरळ त्या ठिकाणी त्यांना कशा योग्य आहे ते सांगा. वादविवाद, तडजोड या गोष्टी होत असतात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत तडजोड नसली की ते वादाच्या भवऱ्यात सापडतं आणि त्यातून वाद निर्माण होऊन हिंसा उत्पन्न होते. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीशी कुठेतरी तडजोड करायला शिका. वास्तवात काय चांगलं किंवा वाईट काय हे मनस्वी स्वतःच्या मनाला विचारा आणि नंतरच पुढचा पाऊल उचला. तुम्ही एकदा टाकलेला पाऊल मागे न घेतल्यास ते तुम्हाला चुकीच्या ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवेळल. बोलताना विचार करा कारण धनुष्यातून निघालेला बाण परत येत नाही. तसा तोंडातून निघालेला शब्द परत तोंडात घेऊ शकत नाही. याची एक काळजी घ्या मित्रांनो. चालताना असं चाला की दोन लोकांनी तुम्हाला रामराम घातली पाहिजे. बसताना असे बसा की कोणाला तरी जवळ येऊन बसावं असं वाटलं पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्यांनी ऐकलं त्याच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. तर तुमचं जगणं सार्थक होईल. अन्यथा या जगात येऊन काही उपयोग नाही.
आपण माझे लेखन वाचनास वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद! या सर्व विषयांवर अक्की विचार करा. आपल्याला काय वाटत्ते ते कमेंट करून नक्की कळवा.
लेखन - योगेश जाधव
शिक्षक, लेखक, कवि, ब्लॉग राईटर, यूट्यूबर
हे पण वाचा :
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
Follow on twitter : click here
टिप्पण्या