मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

21 व्या शतकातला शिक्षक अपूर्ण कसा ?

नमस्कार शिक्षक बंधू - बघिनिंनो ! मी सुद्धा एक शिक्षक आहे. पण मी आज शिक्षकावर बोलणार आहे. जी आजची गरज मला वाटते. २१ व्या शतक म्हणजे केवळ बोटांच्या इशाऱ्यावर येवून ठेपले आहे. या जगात वावरत असतांना आपल्यालाही त्या प्रवाहात सामील व्हावे लागेल. अन्यथा आपण या प्रवाहातून बाजूला फेकले जावू . आणि काळाच्या पडद्याआड होवून दिसेनासे होवू. माझा अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी सबंध आला. मला शिक्षण क्षेत्रात आज १० ते ११ वर्ष झालीत. या सर्व प्रवाहात मला अनेक अशी शिक्षक बंधू -बघिनी भेटले. त्यातील काही खूप हुशार आणि २१ व्या शतकाला शोभेल अशी व्यक्तिमत्वे भेटली. आणि काही असेही व्यक्तिमत्व भेटले जे दिसायला फक्त सुंदर पण या २१ व्या शतकातली आव्हानांपैकी त्यांना १० टक्के आव्हानेही पेलता येत नाहीत. अगदी साध्या -साध्या गोष्टी त्यांना माहित नसतात. अर्थात जे या जगाची गरज बनली आहे त्यापासून तुम्ही स्वतः किती दूर पळणार आहेत ? 

२१ वे शतक म्हणजे नव्या कल्पनांचे माहेर घर ! येथील तरुणाईला नेहमी आव्हान देणारे, त्यांना सतत कार्यतत्पर ठेवून नवीन काहीतरी शिकायला लावणारे ! नेहमी नवी दिशा दाखवणारे ! अशा सुंदर पण तेवढ्याच आव्हानात्मक युगात वावरणारा शिक्षक एवढा अनभिज्ञ, निरक्षर, अडाणी राहून कसा चालेल? 

मी शिक्षकावरच का एवढे बोलतो आहे? कारण या शतकातील सर्वात जास्त जबाबदारी शिक्षकावर आहे. उद्याच्या नव्या पहाटेची दिशा काय असेल ही भविष्यवाणी जरी तो करू शकत नसला तरी ते संकट आल्यावर नेमके काय केले पाहिजे याचा आकृतिबंध तयार करून उद्याच्या भावी पिढीच्या गळी उतरवू शकतो. याचा मला ठाम विश्वास आहे. शिक्षकासारखा दुसरा कोणताही तेजस्वी व्यक्ती नाही जो हे जग उलटवण्याची ताकद ठेवत असेल. आजच्या सर्वच आव्हानांवर उत्तर देणारा हा एका शिक्षाच्या हातातून शिकून मोठा झाला आहे हे विसरायला नको. म्हणून मला मनापासून वाटते की आजचा शिक्षक हा परिपूर्ण असावा. अर्थात या जगात कोणीही १०० टक्के परिपूर्ण नाही. परंतु मला हे जमत नाही हे  सांगणारा तरी नसावा असे मला वाटते. येत नाही ते शिका, अडले ते शोधा, मिळत नाही ते निर्माण करा, आहे त्याचा सद्पयोग करा हेच मला सांगायचे आहे. या जगात काहीही अशक्य नाही. फक्त ते शोधण्याची अथवा निर्माण करण्याची ताकद आपल्यात असायला हवी. तुम्ही सर्व सुज्ञ, सुशिक्षित आणि प्रत्येक विषयात तज्ञ आहात यात शंका नाही. परंतु जर खरच तुमच्यात काही कमतरता असेल तर शिकून ती कमतरता पूर्ण करा. उद्याचे भविष्य तुमच्या हातात आहे ते असे वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या शाळेतील निरागस बालके हेच आपले दैवत आहेत. त्याची नित्योपासना योग्य रित्या करा. हीच विनंती. 

एक शिक्षक म्हणून आपल्याला खालील काही गोष्टी आल्या पाह्जेत. नसतील येत तर काही हरकत नाही. परंतु अवश्य शिकले पाहिजे. 

  • आपल्या विषयाचे पूर्ण ज्ञान असावे. त्यातील अडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कुठून मिळतील हे माहित असावेत.
  • आपल्या विषयासाहित इतर विषयांचेही ज्ञान असायला हवे. बऱ्याच ठिकाणी बहुवर्ग अध्यापन अथवा एका वर्गाचे पूर्ण विषय शिकवावे लागतात. तेथे तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान नाही करू शकत.
  • शालेय व्यवस्थापनाची पूर्ण अथवा / थोडी तरी माहिती असायला हवी.
  • संदर्भ ग्रंथ माहित असावेत. माहित नसतील तर पर्यायी व्यवस्थेने ते मिळवण्याचे ज्ञान असायला हवे.
  • संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक आहे. त्यामुळे हे आपल्याला आलेच पाहिजे.
  • एका शिक्षकाकडे व्यवस्थितपणा, शिस्त, नीटनेटकेपणा, स्वच्छ चारित्र्य, पवित्रता, प्रामाणिकता यांसारखे गुण असायला हवेत.
  • विद्यार्थ्याला काय प्रश्न पडू शकतात याचे ज्ञान शिक्षकला असावे.
  • शालेय पोर्टलची, (UDISE, SARAL वैगरे ) माहिती असायला हवी.
  • ऑनलाईन आपल्याला माहिती कुठून व कशी योग्य रित्या मिळते हे माहित हवे.
  • ऑनलाईन सुरक्षितता माहित असायला हवी.
  • whatsaap, gpay,phone pay , email,gmail, वेबसाईट, यांसारख्या दैनंदिन गोष्टी माहित असाव्यात.
  • वर्ड, एक्सेल , पावर पाॅइंट, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही याची पूर्ण माहिती असावी.
  • दैनंदिन व ऑफिशियल कामाची सवय करुन घ्यायला हवी.
  • जबाबदारी झटकून दूर पळण्याएवजी स्वतः जबाबदारी घेवून ते शिकले पाहिजे.
  • नवीन काहीतरी शिकण्याची तीव्र भूक असायला हवी.
  • स्वतःची वेबसाईट, युट्युब चेनेल अथवा इतर कोणतेही एक ऑनलाईन स्वतःचा प्लॅटफॉर्म असायला हवा.
  • साधी साधी गोष्ट आपल्याला परत परत का विचारावी लागते याचे मुल्यांकन केले पाहिजे.
  • आपल्यला चांगले बोलता आले पाहिजे. लिहिता आले पाहिजे. आपले मत इतरांना पटवून देता आले पाहिजे.
  • आपल्यातला शिक्षक नेहमी जागे ठेवता आला पाहिजे. कारण शिक्षक बनून चालत नाही. तो जन्माला यावा लागतो.
  • प्रादेशिक भाषा, व्यवहारी भाषा, जागतिक भाषा यांचे ज्ञान असायलाच हवे.
  • भाषा येत नसेल तर गुगल ट्रान्सलेशन वापरून समस्या सोडवू शकतात.
  • कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गुगल असिस्टंट ला विचारू शकतात.अथवा आज भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. ती शोधा मिळवा.
  • पूर्ण रस्त्यावर कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चपला घालणे अधिक सोयीचे असते. हे स्वतःला पटवले पाहिजे.
  • सहकार्य वृत्ती असायला हवी. समजूतदारपणा हवा. आणि काही गोष्टी सोडून द्यायला हव्यात.
  • शिक्षक कधीच साधारण नसतो. तो प्रलय ही आणू शकतो आणि विकास ही घडवू शकतो. हे समजून घेतले पाहिजे. 
  • जिथे गरज आहे तिथे उत्तर म्हणून स्वतः उभ राहिले पाहिजे.
  • सर्वात महत्वाचे आपण आपल्या पायावर उभ राहायला आणि स्वतःच्या डोक्याने चालायला सक्षम बनले पाहिजे. कारण आई देखील मुल चालायला लागले की मांडीवरून दूर सारते. प्रत्येक गोष्ट ठराविक वेळेसाठीच असते हे समजले पाहिजे. जेव्हा मिळाली तेव्हा त्याचा सदुपयोग  करून सक्षम बनले पाहिजे. कोणीतरी गरजेवेळी बोट धरून नेईल, अगदीच अशक्य असेल तर कडेवर उचलून नेईल. पण असेच कडेवर छान वाटते म्हणून इच्छा ठेवणे कितपत योग्य होईल ?
  • वरील काही गोष्टी न शिकल्यास तुम्ही वर्गाला नाही पण वर्ग तुम्हाला कंट्रोल करेल. जे योग्य नाही.
               मित्रहो यांसारख्या अनेक गोष्टी शिकणे गरजेचे आहे. मी ही शकत असतो चालता, बोलता, उठता, बसता. आपण ही अपडेट राहा. या जगात वावरण्या इतपत सक्षम राहाल तरच आपला टिकाव लागणार आहे. शिक्षक म्हटले तर त्या पदाला शोभणारे व्यक्तिमत्व दृष्टीस पडावे असे मला वाटते. आपल्या प्रत्येक कृतीतून ते दिसले पाहिजे. आपण कोणाचा तरी आदर्श बनले पाहिजे. असे मला मनापासून वाटते. जास्त काही लिहिले  असेल आणि त्यामुळे कोणाच्या भावना दुखल्या असतील तर क्षमस्व ! योग्य भाव समजून आपल्यात बदल कराल ही अपेक्षा. आपले विचार कमेंट मध्ये नोंदवू शकतात.  धन्यवाद !

शैक्षणिक व इतर सर्व अपडेट साठी, शैक्षणिक साहित्य व इतर सर्व गोष्टी साईटवर उपलब्ध आहेत. 

लेखन - योगेश जाधव 

शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राईटर, यूट्यूबर

www.yogeshjadhave.com

हे पण वाचा :
Home page  : click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here 


Whatsapp channel : click here


Follow on twitter : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा