योजना जाहीर करण्याअगोदर हिशोब द्यायला हवा
नमस्कार मित्रहो, मी नेहमी वास्तवता व सत्याच्या बाजूने आहे. मी कोणत्याही पक्षाचा वा राजकीय नेता नाही. कार्यकर्ता नाही. सध्याचे राजकारण पाहून मनात अनेक प्रश्न पडतात. कधी कधी असे वाटते कि आपण निर्जीव माणसांच्या जगता तर वावरत नाहीत? कारण, सर्वांना फुकट पाहिजे आहे पण; काम नकोय. ते विकत घेण्यची ताकत नकोय. ते फुकट देतांना सरकार कुठून आणि कसे देणार आहे? हे कोणी चौकशी करत नाही. कोणतेही राज्य असू द्या, ते राज्य कोणत्याही एकट्या राज्यकर्त्याच्या बापाचे नसते. किंवा कोणत्याही राजकीय पार्टीची वैयक्तिक मालमत्ता नाही. जी आपली खुर्ची वाचण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी वापरू शकतात.
निवडणुका तोंडावर आल्या की, प्रत्येक राज्यात योजनांचा जणू पाउस पाडला जातो. जेणेकरून लोकांना याचा भास व्हावा की वर्तमान सरकार किती चांगले आहे. पण एकही पक्ष याचा हिशोब जाहीर जनेतेला सांगत नाही की या योजनेसाठी निधी कुठून आणि कसा येणार आहे ? कोणताही राज्यकर्ता योजनेचे पैसे घरून देत नाही. मग सार्वजनिक मालमत्ता वापरतांना ती कुठे व किती वापरली याचा हिशोब द्यायला नको ?
हे ही वाचा - माझं नेमकं चुकते कुठे ?
कोणीही येतो आणि आपला मोठेपणा गाजवतो. विरोध कोणत्याही राजकीय पक्षाला नाही. व्यक्तिगत नाही. पण महाराष्ट्र सारख्या राज्यावर लाखो कोटींचा बोज असुनंही योजना जाहीर केल्या जात आहेत. ज्या योजनांचा लाभ ज्याला गरज नाही तो हिसकावत आहे. मग योजना जाहीर कोणासाठी आणि कश्यासाठी ? सर्व सामन्यांच्या खिशाला का चटणी देत आहेत. एकीकडे योजनेतून फुकट दिल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे तेच काहीतरी कारण दाखवून मिळवायचे हा लपंडाव किती दिवस खेळणार आहात? तुम्ही जाणार आहात पण हा देश, हे राज्य राहणार आहे प्रत्येक गोष्टीचे साक्ष.
जो राजनेता एखाद्या पक्षाच्या जोरावर मोठा होतो. आणि खुर्ची मिळाली म्हणून दुसऱ्या पक्षाच्या चटया उचलतो तो या देशाशी किंवा राज्याशी किती एकनिष्ठ राहू शकतो? याचा जरा थंड डोक्याने विचार करायला हवा. प्रत्येक नेता खुर्ची साठी जगतो आहे, जनता फुकट मिळावे म्हणून प्रयत्न करते आहे पण; असे फुकट न कमवता घर किती दिवस चालेले ? आपण घरी न काम करता नुसते आहे ते खात बसली तर किती दिवस खाणार ? शेवटी भिक मागावी लागेल? म्हणून माझ्या देशाच्या सुज्ञ बांधवांनो जरा मनापासून विचार करा की, फुकट खावून भिकारी व्हायचे की ते विकत घेण्याची टाकत मागून स्वाभिमानी व्हायचे !
लेखन - योगेश जाधव
शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राईटर, यूट्यूबर
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
Follow on twitter : click here
टिप्पण्या