मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

विरोध व विरोधाचे प्रकार

नमस्कार मित्रांनो, विरोध, बंड, अन्यायाविरुद्धचा लढा, पेटून उठणे इ. अनेक शब्दप्रयोग जणू आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनून गेला आहे. परंतु आपल्याला पेटवतं कोण आणि गंमत पाहतो कोण? पेटून उठणारे कोणाच्या बुध्दीने पेटतात किंवा चालतात? हा आजही निरूत्तरीत प्रश्न आहे. पेटून उठणे चुकीचे नाही. प्रवाहाच्या दिशेने जाणे चुकीचे नाही.  परंतु तो प्रवाह अथवा त्या प्रवाहाची दिशा कोणती हे पाहणं खुप गरजेचे आहे. 

सध्या समाजात प्रत्येक गोष्टीला विरोध होतांना दिसत आहे. पण हा विरोध का? कशासाठी? याचा परिणाम काय? हे विचारात घ्यायला कोणाला वेळ नाही. विरोध म्हणजे काय? आपल्या मनाच्या विरूद्ध एखादी गोष्ट घडली तर तिच्या विरोधात उभी राहिलीलेली परिस्थिती म्हणजे विरोध होय. कोणीतरी सांगितले आणि मग आपण ते केले की काही वेळा ते आपल्या मनाविरुद्ध असते. मग आपल्याला कोणीतरी सांगतं हा अन्याय आहे. मग आपण पेटतो आणि वस्तुस्थिती न समजता बदलायला निघतो. हे लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक वेळी परिस्थिती बदलली जात नाही; त्या परिस्थिती प्रमाणे स्वतःला बदलवून घेणे फायदेशीर ठरते. शेवटी सर्व आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. 

कोणत्याही गोष्टीसाठी विरोध होऊ नये या मताचा मी नाही. पण प्रत्येक गोष्टीचा बाऊ करून ती ताणत नेण्याची बाजूही माझ्या जमेची नाही‌. अन्यायाचा विरोध व्हावा. परंतु त्याची व्यापकता व दिशा त्या त्या परिस्थिती वर ठरवावी. आपण आपल्या डोक्याने चालावं हे महत्त्वाचे आहे. काही गोष्टी एखाद्या वेळी त्रासदायक वाटत असल्या तरी त्या पूर्ण करणं आवश्यक आहे. कारण नंतर त्यामुळे अनेक गोष्टी सुकर होऊ शकतात. 

विरोधाचे अनेक प्रकार दिसतात. त्यापैकी काही खालील प्रमाणे: 

  • खरोखरच अन्याय झाला तर केलेले बंड 
  • दुसरे सर्व विरोध करतात म्हणून मी का नको?
  • आपल्या मनाला न आवडणाऱ्या गोष्टीला विरोध 
  • आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी धुर्त पणे पेटवणे. 
  • आपला माणूस/ नेता म्हणून इच्छा नसताना केलेलं बंड 
  • आपली भूमिका ऐकून घेण्याचा अट्टाहास 
  • एखाद्याचा सूड घेण्यासाठी रचलेले कटकारस्थान 

अशा अनेक प्रकारांच्या विरोधांनी आपण परिचित आहात. आपण कोणत्या विरोधाचे शिकार आहात माहीत नाही. पण एवढं मात्र सांगू शकतो की, प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.

नव्याचा स्विकार करून आहे त्या  परिस्थितीशी अनुकुलन साधणं गरजेचे असते. नको ती नकारात्मकता डोक्यात भरुन आपण आपल्याला नको त्या ठिकाणी नेऊन साडतो. अशाने नव्या उगवत्या किरणांचा प्रकाश मार्ग कसा दिसेल? अडचण प्रत्येकाला असते. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शक्ती व्यय व्हायला हवी. ती विरोध करण्यासाठी वाया गेली तर तुमच्या प्रश्नाचे नियोजन कोण करणार? प्रत्येक ठिकाणी विरोधकाची भूमिका घेणे, आपला आपणच नाहीसा अथवा अडथळीत करण्यासारखे आहे. 

हे ही वाचा : 21 व्या शतकातला शिक्षक अपूर्ण कसा ?

काडी करूनी मोडीत गेला

मग स्वतः काय सोडीत बसला?

कोळ्यांच्या जगात दडला 

परि मुक्ती पथ विसरला.


अमावस्येच्या रात्रीत प्रकाशाची बघ वाट

नको ते बंड सोडूनी चढून बघ थोडा घाट 

क्षितिजावरती मात करण्या पाहा धुळीचे थाट 

मर्दानी ची नसे ताकद रोखण्या ही त्सुनामी लाट


शतका मागून शतकं गेली नाविन्याची 

परिवर्तन हीच गरज होती या युगाची 

झटकून टाक दुषणे लपलेल्या मनाची

उभारत राहा इमारत येथे आदर्शाची !


नकोत आयुष्याला नुसत्या भिंती, तावदाने 

स्वैर गीत गात जा स्वरा-स्वराने 

थांबला तो संपला हेच राहू दे तराणे 

विश्व ही नमन करेल तुला प्रेमाने!!

लेखन - योगेश जाधव 

शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राईटर, यूट्यूबर

www.yogeshjadhave.com

हे पण वाचा :
Home page  : click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here 


Whatsapp channel : click here


Follow on twitter : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा