मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी : 2025-26

संदर्भ दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)


१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.

२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.

४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक १५.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २५.०४.२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.

६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

  • गट क्र. १- प्राथमिक गट (इ.१ली ते ४ थी, इ.१ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ. १ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)
  • गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)
  • गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)
  • गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट

मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.

७) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी.

८) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ / सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.

९) शालार्थ / सेवार्थ/ बीएमसी प्रणालीवर अद्ययावत करावयाची माहिती खालील प्रमाणे

• स्वतःचे नाव (देवनागरी लिपी)
• लिंग
• जन्म दिनांक
• पदनाम
• Udise No.
• जिल्हा
• तालुका
• शाळा व्यवस्थापन प्रकार
• नियुक्ती दिनांक
• शाळेचे नाव
• मुख्याध्यापकाचे नाव
• मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक
• व्यावसायिक अर्हता (सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास)
• शैक्षणिक अर्हता (सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास)
• मोबाईल क्रमांक
• ई-मेल आयडी

१०) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ/सेवार्थ/बीएमसी ID, ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

११) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.

१२) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ व निवड) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.

१३) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

१४) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.

१५) इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट/डेबिट कार्ड/ UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल.

१६) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.
१७) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थीना लागू राहतील याची नोंद घ्यावी.

१८) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल.

१९) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२०) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय. डी. वर संपर्क करावा.

२१) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.maa ac.in हे संकेत स्थळ पाहावे.

२२) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.

रजिस्ट्रेशन लिंक : click here  ( प्रशिक्षण नोंदणी दिनांक १५.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरु होईल )

Home page  : click here  

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here


Whatsapp channel : click here


Follow on twitter : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा