Swift Chat (VSK) chatbot
Swift Chart हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. ज्यावर आपल्याला आपल्या शालेय स्तरावरून दैनंदिन उपस्थिती, विविध चाचणीचे मार्क, निपुण अध्ययन स्तर अशा विविध नोंदी करता येतात. हे अतिशय सोपे व्यासपीठ आहे परंतु बऱ्याच जणांना यात अनेक तांत्रिक अडचणी येतात. म्हणून याठिकाणी Swift Chat विषयी माहिती देण्यात आली आहे. माझी काह्त्री आहे की हे निश्चितच आपणास उपयुक्त ठरेल. अशाच विविध शैक्षणी कामांसाठी व इतर साहित्यासाठी, अपडेट माहिती साठी आमच्या www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला नियमित भेट देत राहा.
Swift Chat वर मार्क कसे भरावे :
- प्रथमतः Swift Chat app डाउनलोड करा. अथवा https://web.convegenius.ai/ यावर click करा. अथवा www.yogeshjadhave.com या वेबसाईट वर जावून chatbot पर्याय निवडा.
- app किंवा chatbot उघडा. तुमचा मोबाइल नंबर व ओटीपी टाका.
- login झाल्यावर ज्याचे मार्क भरायचे आहेत ते संकेत शब्द सर्च करा. उदा. PAT महाराष्ट्र.
- प्रथमतः hi असा मेसेज करा. खाली एका कोपऱ्याला दिसणाऱ्या / मेनूबार मधील home मेनूवर क्लिक करा.अथवा
- तुमच्या शाळेचा UDISE कोड टाका. व शाळेची माहिती तपासा.
- शिक्षक कोड / shalarth आयडी प्रविष्ट करा.
- समोर दिसणारी शिक्षकाची महिती खात्री करा.
- Record Student Performance वर क्लिक करा / पर्याय दिसत नसल्यास होम बटनवर क्लिक करून सुरु होते.
- इयत्ता, परीक्षा, विद्यार्थी नाव निवडा.
- आता समोर दिसणारी माहिती एकदा तपासा व नेस्ट बटन वर क्लिक करा.
- विद्यार्थ्यचे नाव निवडल्यानंतर तो हजर की गैहजर ते निवडा.
- आता त्या परीक्षेचे प्रश्न व त्याचे मार्क दिसतील. त्या प्रश्नासाठी मिळालेले गुण क्रमांक फक्त क्लिक करा.
- मार्क अपोआप सबमिट होऊन दुसरा प्रश्न समोर दिसेल.
- त्या पेपरचे प्रश्न पूर्ण झाले की दुसऱ्या विद्यार्थ्यचे नाव निवडून पुन्हा मार्क वरीलप्रमाणे भरावे
- विद्यार्थी निवडा हा पर्याय दिसत नसेल तर होम मेनुच्या सहायाने आपण निवडू शकतात.
मार्क चुकीचे भरले गेल्यास ते नवीन कसे भरावे :
- वरीलप्रमाणे chatbot चालू झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क चुकीचे भरले गेले असतील तर ते पुन्हा भरण्यासाठी विद्यार्थ्याचे नाव सिलेक्ट करा.
- समोर एक' या विद्यार्थ्याचे मार्क नवीन भरायचे आहेत का ? असा पर्याय येईल . तो हो म्हणा.
- वरीलप्रमाणे पायऱ्या वापरून मार्क पुन्हा भरा. भरता येतील.
माझी इयत्ता दिसत नसल्यास इयत्ता कशी समविष्ट करू?
- chatbot उघडा.
- आपली इयत्ता दिसत नसेल तर होम बटन वर क्लिक करा.
- edit रजिस्ट्रेशन पर्यायवर क्लिक करा.
- तुमच्या शाळेच्या udise सह विचारलेली माहिती भरा.
- तुमची माहिती तपासा.
- record student performs वर क्लिक करा.
- क्लास निवडा.
- आता तुम्हाला पाहिजे ती इयत्ता निवडून मार्क भरता येतील.
swift chat वर माध्यम कसे बदलता येईल ?
- एका कोपऱ्यात दिसणाऱ्या मेनूबार वर क्लिक करा.
- माध्यम बदला ह्या पर्यायावर क्लिक करा.
- योग्य ते लागू असलेले माध्यम निवडा.
chatbot (VSK) वर निपुण महाराष्ट्र चे अध्ययन स्तर कसे भरावे ?
- chatbot उघडा.
- PAT महाराष्ट्र या पर्यावर क्लिक करा.
- तुमची माहिती चेक करून हो पर्यावर क्लिक करा.
- record student performs वर क्लिक करा.
- वर्ग निवडा.
- ASSESSMENT पर्यावर क्लिक करा. (दिलेल्या वेळेप्रमाणे assessment क्रमांक अपोआप दिसेल . मागच्या assesment चे मार्क वेळ गेल्यानंतर भरता येब्णार नाहीत. म्हणून वेळेत स्तर भरावेत )
- दिलेली माहिती तास व हो या पर्यायावर क्लिक करा.
- विद्यार्थ्याचे नाव निवडा.
- हजर किंवा गैहजर निवडा.
- समोर एक एक पर्या दिसत जातील अध्ययन स्तर क्रम्मंक टाईप करून सबमिट करा. अपोआप पुढचा पर्याय दिसेल.
- एका विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर भरला गेल्या नंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव निवडा.
- नाव निवडणे पर्याय दिसत नसल्यास होम मेनुपासून सुरुवात करून विद्यार्थी नाव निवडता येईल.
शासन निर्णयान्वये, दि.०५ मार्च २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धींगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद दिनांक २० मार्च, ०५ एप्रिल, २० एप्रिल, ०५ मे, २० मे, १५ जून व ३० जून २०२५ या तारखांना VSK च्या Bot वर कराव्यात.
वरील प्रमाणे chatbot वर / VSK वर गुण / स्तर भरणे अतिशय सोपे आहे. एकदा स्वतः प्रयत्न करा. तुम्हाला नक्की येईल व एकदा करून पाहिल्यास सोपे ही वाटेल. आपले अधिक काही प्रश्न असल्यस कमेंट मध्ये नक्की कालवा. आणि आमच्या वेबसाईट लां अश्या प्रत्येक सोल्युशन साठी नक्की फॉलो करा.
मार्गदर्शन व्हिडीओ :
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
Follow on twitter : click here
टिप्पण्या