मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

MAHAJYOTI ONLINE FREE TRANING : TAIT- 2025-26

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता योजनेचा तपशील

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने

योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया :-

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.

2. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांचे वय 40 वर्षे पेक्षा जास्त असू नये.

3. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा असावी

4. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण 2018/प्र.क्र.397/टीनटी-1. दि.07 फेब्रुवारी 2019. शासन शुद्धीपत्रक 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019, 12 जुन 2019 तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अहंताप्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरीता पात्र राहील,

5. TET/CTET Paper-I/II/B.Ed मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरीटद्वारे खालील निकषांनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

6. वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे:-

7. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप :-

1. विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरुपात देण्यात येईल.

2. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 04 महिन्यांचा असेल.

आरक्षण :

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2. दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे.

3. अनायांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः

1.आधार कार्ड

2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)

3. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

5. उच्च प्राथमिक (इयत्ता 12 वी ची गुणपत्रिका

6. पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका

7. B.Ed. D.Ed B El Ed BA. Ed B.Sc. Ed उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रिका

8. TET CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल गुणपत्रिका

9. दिव्यांगाचे प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)

10. अनाथ असल्यास दाखला

अर्ज कसा करावा ?

1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for Application for Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT)-2025-26 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

3. उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरीता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही.

अटी व शर्ती :

1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 20/04/2025 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. विद्यार्थ्यांनी पुरविलेली कोणतीही माहिती चुकीची आढळुन आल्यास सदर योजनेच्या लाभाकरीता विद्यार्थ्यांचे अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.

4. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

5. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा उमेदवाराने यापूर्वी महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या 'सारथी 'या संस्थे मार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.

6. सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपाचे असून याकरीता कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही, सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

7. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.45 ते सांय. 6.15 वाजता पर्यंत) महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा.

संपर्क क्र. 0712-2870120 / 21

E-mail Id: mahajyotihelpdesk@gmail.com

संस्थेचे संकेतस्थळ (Website): CLICK HERE 

रजिस्ट्रेशन लिंक : click here 

Home page  : click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here


Whatsapp channel : click here


Follow on twitter : click here


टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा