वाचन पुस्तके
पुस्तक हे लिखित, छापलेल्या व कोऱ्या कागदापासून व चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्रित संकलन असते.त्याच्या एका बाजूस बिजागऱ्यागत सांधा असतो. पुस्तकाच्या एका तावास वा कागदास पान म्हणतात. तर त्या पानाच्या पुढच्या बाजूस मुखपृष्ठ असे म्हणतात. इलेक्टॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात. इजिप्त मध्ये अलेक्झांड्रिया येथे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे. साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात
पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांपासून वेगळे करण्यासाठी 'मोनोग्राफ' म्हणण्यात येते. पुस्तकांसह सर्व लिखित स्वरूपात असलेल्या कामांना साहित्य म्हणतात. मोठ्या कादंबऱ्यांमध्ये पुस्तकाचे अनेक भाग पाडण्यात येतात. (त्यांना प्रकरण-१,प्रकरण-२,प्रकरण-३ अशी, भाग-१, भाग-२, भाग-३ अशी किंवा खंड १, २, ३ अशी नावे देण्यात येतात.) पुस्तकांवर अतिप्रेम करणाऱ्यास पुस्तकी किडा असे म्हणतात. जेथे पुस्तके विकत मिळतात त्या जागेला पुस्तकाचे दुकान म्हणतात. पुस्तके [[ग्रंथालय| वमाणसांचे राहणीमान सुधारते.पुस्तक हा मानवाला शिकावान्रा गुरू आहे. याला कशाचीही मर्यादा नाही. आपण कोणत्याही ठिकाणी बस्डून ज्ञान घेऊ शकतो.त्याचप्रमाणे, लॅटिन शब्द कोडेक्स, ज्याचा आधुनिक अर्थ हा पुस्तक असा होतो,(वेगवेगळ्या पानांचे व बांधणी केलेले) त्याचा मूळ अर्थ "लाकडाचा ठोकळा" असा आहे.
आधुनिक जगातील पुस्तक निर्मिती :
१५व्या शतकापासून २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुस्तकांची छपाई व बांधणी ही मूलतः तशीच राहिली. फक्त त्यात बरेचसे यांत्रिकीकरण आले. गुटेनबर्गचे संशोधन हे हाताळतायेण्याजोगे टंक होते. ते एकमेकांना जोडून शब्द, वाक्य व पाने तयार करून मग छपाई होते. लेटरप्रेस छपाईच्या पद्धतीत शाई ही जोडलेल्या टंकांवर पसरवून मग ती छपाईदरम्यान कागद त्यावर दाबला गेल्यामुळे कागदावर लागत होती. अद्यापही ही पद्धत सुरू आहे.
आजकाल, जास्तीत जास्त पुस्तके ही ऑफसेट लिथोग्राफी पद्धतीने छापली जातात. या पद्धतीत छपाई हवी असलेल्या साहित्याची छायाप्रत ही एका पातळ धातूच्या पत्र्यावर अंकित केली जाते. नंतर ती डेव्हलप केली जाते. त्यात अंकन व इतर भाग अश्या तऱ्हेने तयार केले जातात की ते पाणी व शाईतला फरक जाणू शकतात. छपाई दरम्यान, त्या पत्र्यावर पाणी पसरविले जाते. जेथे अंकन केलेया गेले असते ते क्षेत्र पाणी बाजूस सारते. तेथे शाई लागते. ती शाई मग एका रबरी साहित्यावर पाठविली जाते. त्यावरून मग कागदावर छपाई होते. जेव्हा एखाद्या पुस्तकाची छपाई होते तेव्हा पुस्तकाची पाने अशा प्रकारे ठेविली जातात, की जेणेकरून त्या तावाची घडी केल्यावर पानांचा क्रम योग्य तऱ्हेने येईल. पुस्तके ही आजकाल एका विशिष्ट आकाराचीच असतात.
कापणी/कटाई ही कागदाच्या वरच्या व खालच्या बाजूने सुमारे १/८" जागा मोकळी सोडून होते. घड्या कापल्या गेल्याने पाने सुटी होतात. पुस्तकाचे आकारमान हे छापला गेलेला व मग घडी केलेला ताव कापल्यावर जसा उरतो त्यावरून ठरते. गेल्या २०० ते ३०० वर्षांत हे आकारमान बदललेले नाही.
पुस्तकाच्या मापाची काही उदाहरणे:
4-1/4” x 7” (rack size कागदी बांधणी)
5-1/8” x 7-5/8” (डायजेस्ट मासिकाचे माप कागदी बांधणी)
5-1/2” x 8-1/4”
5-1/2” x 8-1/2”
6-1/8” x 9-1/4”
7” x 10”
8-1/2” x 11”.
ही मापे छापखान्यानुसार व कटाईच्या अचूकतेनुसार थोडीफार बदलू शकतात. वर दिलेले आकार बदलून कोणी थोड्या वेगळ्या पण मिळत्याजुळत्या आकाराची पुस्तके पण छापतात. ब्रिटनमध्ये ही मानके वेगळी आहेत.
All 1300+ math formulas Ebook free
वेब प्रेस मध्ये छपाई ही एक कागदाची सलग गुंडाळी(रोल) वापरून करतात. त्यात कमीतकमी वेळात जास्तीतजास्त प्रति छापल्या जातात. शीट फेड प्रेसमध्ये कागदाची एक थप्पी मशीनच्या दुसऱ्या बाजूस असते. त्यातील एकेक ताव दोन्ही बाजूस छापला जाऊन मग बाहेर निघतो. हे छापलेले ताव मशीनद्वारेच घड्या करून कापले जातात. यातून ३२ पाने निघतात, पण कधी-कधी १६, ४८ किंवा मग ६४ पानेही असू शकतात. ती पाने मग क्रमाने रचली जातात. प्रत्येकातून एक संच घेऊन मग पुस्तक बनते. या घडी केलेल्या एका संचास 'सिग्नेचर' म्हणतात. या पद्धतीने छापताना-कापताना काही पाने खराब होतात व बिघडतात. म्हणून पुस्तक छापतांना जास्तीचे संच तयार करण्यात येतात. खराब छपाईची पाने वगळून आवश्यक तेवढीच पुस्तके तयार होतात. छपाईच्या वेळेस योग्य बिनचूक छपाई सुरू होईपर्यंत अचूकता बघण्यासाठी काही ताव वाया जातात.
मग ते पुस्तक बांधणीस जाते. काही कंपन्या फक्त बांधणीच करतात, तर काही छपाई व बांधणी. आजकाल, यांत्रिकीकरणामुळे मानवी पुस्तक बांधणीची ही पद्धत कमी होत आहे. पुस्तकबांधणीत मुखपृष्ठ व मलपृष्ठ यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते. जाड कागद वा खर्डा. जाड कागदाच्या पुस्तकबांधणीत कागद हा पानांच्या आकाराचाच असतो. खर्डा वापरून केलेल्या बांधणीत, तो पानाच्या आकारांपेक्षा १/८" इतका सर्वबाजूंनी जास्त असतो. बांधणीचे वेळी एक जास्तीचा कोरा कागद पुस्तकाच्या पुढे व मागे जोडला जातो. पुस्तकाच्या पानाच्या जाडीपेक्षा हा जास्त जाड असतो. मशीनने केलेल्या खर्ड्याच्या बांधणीत, पुस्तकाची उघडी उजवीकडची बाजू रोलरने दाबली जाते. त्याने त्या पुस्तकास त्या बाजूस अंतर्वक्र ब बांधणी असलेल्या बाजूस बहिर्वक्र आकार येतो. याच रीतीने कापडि बांधणी व चामड्याची बांधणीपण होते.
यामधील क्रम थोडा बदलू शकतो. यात घडी केलेले ताव एकत्र शिवलेही जाऊ शकतात. याने पुस्तकास मजबुती येते. यात अनेक प्रकार आहेत. यांत 'स्मिथ' प्रकाराने व 'मॅकेन' प्रकाराने शिवण्याचा अंतर्भाव आहे. शाळेची पुस्तके वरून खालपर्यंत छिद्र पाडून शिवली जातात. एया पुस्तकांचा जास्त जीवनकाल हवा असतो वा जी जास्त हाताळल्या जातात ती शक्यतोवर संच शिवून बनतात. मग पुस्तके खोक्यात टाकून हवी असतील त्या ठिकाणी पाठविली जातात.
पुस्तकांच्या निर्मितीत नुकताच झालेला बदल म्हणजे डिजिटल छपाई हा आहे. पुस्तके ही कार्यालयात असलेल्या कॉपियर यंत्रासारखीच छापली जातात. त्यात शाईऐवजी 'टोनर' वापरला जातो. एकएक करून ताव किंवा 'सिग्नेचर' तयार न करता, संपूर्ण पुस्तकच एकदम छापले जाते. यात अत्यंत कमी प्रमाणात पुस्तके छापता येतात व तावांची नासाडी होत नाही. वेब प्रेस मध्ये २००० च्या वर, शीट फेड प्रेस मध्ये २५० ते २००० पुस्तके तर डिजिटल छपाईत २५० पेक्षा कमीही पुस्तके छापली जाऊ शकतात .अर्थात हे आकडे अंदाजी आहेत. पुस्तकाच्या गुणधर्मानुसार व पुरवठादारानुसार ते बदलू शकतात. 'मागणीनुसार छपाई' हे तत्त्व डिजिटल छपाईने शक्य होते. ग्राहकाची मागणी (ऑर्डर) मिळाल्यावरच छपाई सुरू होते.
डिजिटल छपाईची सुरुवात
ई-पुस्तक हा शब्द इलेक्ट्रॉनिक पुस्तक या शब्दाचे लघुरूप आहे. ते म्हणजे पारंपरिक पुस्तकाचे डिजिटल संस्करण होय. या प्रकारचे पुस्तक हे इंटरनेट, सी.डी. वगैरे स्वरूपातही मिळू शकते. ते फक्त संगणकावर वाचले जाई शकते. ई-पुस्तकांची नकल करून वाचक जमा करून ठेवू शकतात व सवडीने वाचू शकतात. यांत अनेक कंपन्यांची वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे उपल्ब्ध आहेत. ही उपकरणे छापलेले पुस्तक पाने उलटून वाचण्याचा अनुभव देतात. २०व्या शतकात,गंथालयांनी पुस्तक प्रकाशनांची जास्तीत जास्त गती नोंदविली आहे. यास कधीकधी माहितीचा स्फोट असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक प्रकाशन व आंतरजालामुळे अनेक नवीन माहिती ही पुस्तकांत छापली जात नाही. तर ती डिजिटल ग्रंथालयांद्वारे ऑनलाइन स्वरूपात किंवा सी.डी.वर वा ई-पुस्तकाद्वारे उपलब्ध केली जाते. ऑनलाइन पुस्तक हे एक प्रकारचे ई-पुस्तकच आहे. हे आंतरजालाद्वारे ऑनलाइन उपलब्ध होते.
जरी अनेक पुस्तके ही डिजिटल स्वरुपात उपलब्ध होतात, तरी त्यातील अनेक पुस्तके सामान्य जनतेस मिळत नाहीत. म्हणून कागदी पुस्तक प्रकाशनाचे प्रमाण कमी झालेले नाही..सार्वजनिक स्वरूपात असलेल्या पुस्तकांना डिजिटल संस्करणात बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनिर्बंध पुनर्वितरण व प्रचंड उपलब्धताही आहे. या उपक्रमात, गुटेनबर्ग प्रकल्प अग्रेसर आहे तर, जगभर विखुरलेले टंकमुद्रणशोधक सामील आहेत.पुस्तक प्रकाशनाच्या तंत्रात नवीन विकास झाला आहे.मागणीप्रमाणे छपाई याद्वारे एक लाख पुस्तके एका वेळेस छापता येतात. याने स्वयंप्रकाशन हे सोपे व परवडणारे झाले आहे. प्रकाशकांचा गोदामांचा खर्च कमी झाला आहे. कमी विक्री असलेली पुस्तके 'छापलेली नाहीत' असे कळविणे यापेक्षा ती छापणे शक्य झाले आहे. ग्रंथ असेही म्हणतात .
वाचन पुस्तके भाग : १
1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24. तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जंजिरा
33. राजगड
34. रायगड
35. लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38. शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..
तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल
https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr
search your book here
टिप्पण्या