महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा पेपर्स
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय परीक्षा होत असतात. या परीक्षांची योग्य तयारी करण्यासाठी त्यांचा योग्य अभ्यासक्रम माहित असणे गरजेचे असते. हा अभ्यासक्रम माहित झाला कि मग त्या अभ्यास्क्रमची तयारी करत असतांना आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि प्रश्नपत्रिका कश्या असतील ? या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या वेब पोर्टल च्या माध्यमातून होईल.
नागरी सेवा परीक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारत सरकारच्या उच्च नागरी सेवांमध्ये भरतीसाठी घेतली जाते. या सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय पोलीस सेवा यांचा समावेश होतो. याला यूपीएससी परीक्षा म्हणून संबोधले जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते: पूर्व परीक्षा ज्यामध्ये दोन वस्तुनिष्ठ-प्रकारचे पेपर असतात (सामान्य अध्ययन पेपर I आणि सामान्य अध्ययन पेपर II ज्याला सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट किंवा CSAT म्हणूनही ओळखले जाते) आणि पारंपारिक (निबंध) प्रकारच्या नऊ पेपरचा समावेश असलेली मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेत दोन पेपर पात्रतेसाठी आहेत आणि सात पेपरचे गुण मोजले जातात, त्यानंतर व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) घेतली जाते.[१] एका यशस्वी उमेदवाराला सुमारे एक वर्षाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ३२ तास परीक्षेला बसावे लागते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: Maharashtra Public Service Commission; संक्षिप्त: MPSC/ एमपीएस्सी) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, [[पोलीस-उपअधीक्षक}}, [[तहसीलदार}}, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी]], मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ची पदे भरली जातात. केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.
'स्व'-रूपवर्धिनी ही पुण्यात काम करणारी सामाजिक संस्था आहे. १९७९ साली किशाभाऊ पटवर्धन यांनी स्व'-रूपवर्धिनीची स्थापना केली. आर्थिक दुर्बल गटातील मुलांसाठी बालवाडी वर्ग, वस्तींतील शालेय मुलांसाठी दैनंदिन शाखा, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र, स्त्रियांसाठी बचत गट व प्रशिक्षण केंद्र असे संस्थेच्या कामाचे स्वरूप आहे.
परीक्षेच्या विविध प्रश्नापत्रीकांसाठी येथे क्लिक करा :
view papers
टिप्पण्या