मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

लेखी परीक्षेचा पेपर कसा लिहावा ?

 परीक्षेत पेपर कसा लिहावा ?

          वरील प्रश्न सोपा तेवढाच कठीण वाटणारा प्रश्न आहे. बरेच मुले पेपर लिहितात परंतु त्यांना आपण कसे लिहिले म्हणजे आपल्याला चांगले मार्क मिळतील याची उत्सुकता असते व तेवढाच संभ्रम ! काही मुले अगदी पेपर चांगला दिसावा म्हणून त्याला एवढे सजवतात कि मग त्यात लिहिलेले सुध्दा त्या शिक्षकाला शोधावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेवूनच आपल्या चुका सुधारून चांगल्याप्रकारे पेपर कसा लिहायचा यासाठी खालील सुचना वाचाव्यात :

* पेपरच्या डाव्या बाजूला व उजव्या बाजूला योग्य समास सोडून योग्य रीतीने पेपर पेपर पेन्सिलने आखून घ्यावा.

*लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पेपर आखण्याचे नाही तर त्यात लिहिलेल्या उत्तराचे मार्क मिळणार आहेत. म्हणून जास्त नक्षीकाम न करता योग्य तेवढ्याच रेषा ओढून पेपर आखावा.

*या कामासाठी आपल्याला उत्तरपत्रिका अगोदर मिळते त्यामुळे त्या वेळेतच पेपर आखण्याचे काम पूर्ण करावे.

*नवीन विभाग किंवा नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरु करावा. उपप्रश्न मात्र एकाखाली एक लिहून प्रत्येक उत्तरात एक रेषा सोडावी किंवा रेषा ओढावी.

*उत्तरे मुद्देसूद व सांगितलेल्या सूचनेप्रमाणे लिहावे. उदा. एका वाक्यात उत्तरासाठी जास्तीचे परिच्छेदाचे उत्तर अपेक्षित नसते.

*योग्य मार्क पाहूनच उत्तर लिहावे नाहीतर वेळ वाया जाईल याची काळजी घ्यावी.

*उत्तरातील भाषा योग्य असावी. त्यात स्पष्टोक्ती असावी. विचार करायला लावणारी किंवा द्विअर्थी भाषा प्रयोग टाळावा. अन्यथा त्याचा तुमच्या मार्कांवर परिणाम होईल.

*अक्षर सुंदर असावे. जास्तीची खाडाखोड नसावी. 

*जास्तीची डिझाईन अथवा वैयक्तिक कोणतीही माहिती अथवा विनंती पेपरमध्ये करू नये.

*वेळेचे बंधन लक्षात घेऊनच प्रत्येक प्रश्नाला योग्य वेळ द्यावा. व तेवढ्या वेळेतच तो प्रश्न सोडवावा.

*यासाठी पेपर पूर्वीच योग्य सराव करावा. पेपर १० मिनिट अगोदर होईल व नंतर आपण लिहिलेली उत्तरे, प्रश्न क्रमांक तपासण्यासाठी वेळ मिळेल याची काळजी घेऊनच नियोजन करावे.

*प्रश्न पूर्ण वाचून त्याचा अर्थ समजल्याशिवाय उत्तर लिहायला सुरुवात करू नये.

*नुसत्या पुरवण्या लावून पेपर मोठा करण्यापेक्षा त्यातील उत्तरे अचूक व मोजक्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करावा.

*प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहिण्याच पुरेपूर प्रयत्न करावा.

*अगोदरच अभ्यास केलेला असल्यामुळे न घाबरता पेपर लिहावा व कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

*प्रश्नाचा अर्थ न समजल्यास परीक्षकाची मदत घेऊन तो अर्थ आपण जाणून घेऊ शकतो, याचा अर्थ व्यर्थ बडबड टाळावी.

*परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य स्वतःचे व योग्य स्थितीत आहे कि नाही याची परीक्षेपूर्वीच खात्री करून घ्यावी.

*परीक्षेचा वेळ पूर्ण झाल्यावर पेपर परीक्षाकडे जमा करावा. तो जमा करतांना खात्री करून घ्यावी की आपण योग्य उत्तरवहीच जमा करत आहोत.

*आपण पेपर कसा लिहावा यासाठी खाली दोन विषयांचा पेपर लिहून नमुना म्हणून दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करावा व तसे लिहिण्याचा प्रयत्न करावा:

पेपर १ :


पेपर २ :


               वरील माहिती विद्यार्थी हित लक्षात घेवून प्रसारित केलेली असून विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल अशी आशा करतो. नवीन अपडेट साठी या ब्लॉगला सतत भेटी देत राहा. धन्यवाद !

योगेश जाधव सर
उच्च माध्यमिक शिक्षक व लेखक.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा